गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - ६

Office च्या पहिल्या दिवशीच त्या दोघींची बस निम्मित्त ओळख झाली होती.. निम्मा महिना तर होऊन गेला होता त्यामुळे बस पास पुढच्या महिन्यापासून मिळणार होता.. पास नसेल तर प्रत्येक दिवशीची नोंद करावी लागते असा नियम होता.. नाही म्हणायला एका दिवसाचं बसचं भाडं थोडं महाग पडत होतं.. पण बसची सोय आहे हि जमेची बाजू होती .. सुरुवातीला दोघी नवीन असल्याने सकाळी बसमधून उतरल्या कि नियमितपणे नोंद करूनच मग पुढे जायच्या.. हळू हळू एकेक गोष्टी कळू लागल्या.. थोड्याच दिवसात जाणवलं कि बसची नोंद केली कि नाही याची कोणी इतकी गंभीरतेने दाखल घेत नाही.. पास क़्वचितच कधीतरी तपासाला जातो.. झालं मग त्यांच्यातल्या पाहिलेने, हुशार so called smart मुलीने नोंद करणं बंद केलं.. कोणी बघत तर नाही उगाच कशाला पैसे घालवायचे.. आणि दुसरी.. फुकट बसने जायचं तिच्या तत्वात बसत नव्हतं.. सुदैवाने त्या दिवसात पास बघितला गेला नाही.. त्यामुळे पाहिलेचे बरेच पैसे वाचले.. दुसरीचे पैसे गेले पण ती स्वतःशी प्रामाणिक होती..



असच होतं ना कित्येकदा.. कधी कधी खोटेपणाने वागल्यावर माणूस लवकर पुढे जातो.. धावपळीच्या शर्यतीत तोच टिकून राहतो.. आणि सरळ मार्गाने प्रामाणिकपणे वागणाऱ्यान्चा फायदा तर सोडा पण खुपदा त्यांना तोटा सहन करावा लागतो.. पण फरक हा असतो कि खोटेपणाने मिळालेलं सुख क्षणिक असतं आणि प्रामाणिकपणे केलेल्या गोष्टींचा समाधान चिरंतन असतं, नाहीका.. म्हणूनच बाकी कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी स्वतःशी प्रामाणिक राहावं असं मला नेहमी वाटतं.. :)



अरे बापरे.. एव्हढ सगळं लिहिल्यावर मला जाणवलं कि हि तर ससा आणि कासवाची गोष्ट झाली.. hahaha...

२ टिप्पण्या:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ म्हणाले...

ससा आणि कासवाने कधी बसने प्रवास केला?
माझ्या कॉलेज मधली एका मुलगी नेहमी WT प्रवास करायची, बसचा कंडक्टर आमचा पास नेहमी चेक करायचा, पण तीने फक्त 'पास' म्हटलं तरी पुरेस व्ह्यायच :(

Sonia म्हणाले...

Hee gost aasel kinva , satya katha aasel but I liked the conclusion . "बाकी कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी स्वतःशी प्रामाणिक राहावं " ...

Pan vrinda, Dusariche paise gele nahit , te yogya karanasathi vaparayache hote te tine vaparale atyant samadhanane. She must be living a calm and fearless life. Ya ulat pahiline kadachit mahinyache hajar rupaye vachaun te shopping madhe kinva hotelling madhe ghalavale aasatil pan manat tension and aparadhipanachi bhavana theun :)
Bus chya pass che paise chukavane hee ek prakare companychi fasaanukach nahi ka.

Mala ithe 3 chorancha Marathi movie aathavala .. saravalya hathanna hi kamp ka sutava .. Ughad dar deva aata ughad daar deva ... :) Hahahah