रविवार, ३० जानेवारी, २०११

मंतरलेले दिवस - १५


एक अनोखी साहित्यसहल..

२०११  सुरु  झालं... नवीन  वर्षाची  सुरुवात  एका चांगल्या ट्रिप ने करावी  अशी  माझी  फार  इच्छा  होती.. मैत्रीणीना  विचारलं  , नेहमीप्रमाणे  कोणालाही  वेळ  नव्हता.. घरच्यानाही  जमलं  नाही.. त्यामुळे  मला  थोडं  बोर  होत  होतं.. पण  आता  कसलाही  अट्टहास  करायचा  नाही  असा  माझा  नवीन  वर्षाचा  संकल्प  असल्याने  मी  शांत  होते.. hahaha.. अशातच   दीपालीचा  फोन  आला  'शिरीष  पैना  भेटायचा  बेत  चालू  आहे,येणार  का.. थोडं  हो  नाही  करत  एकदाचं  पक्कं  ठरलं..

शुक्रवारी  रात्री  बरीच  फोनाफोनी  झाल्याने  शनिवारी  पाहते  मी  कशी  उठणार  हा  प्रश्न  होता.. पण  अशा  वेळेस  गजर होण्या आधी  आपोआप  जाग  येते.. :) रिक्षा  घेऊन  दीपालीच्या  इथे  जायचे  होते.. पण  रिक्षावाल्यांशी  माझं  कधीही  पटत  नाही  ना  कधी     पुढे   पटेल.. सकाळी  ६च्या सुमारास  दीडपट  भाडं  का  म्हणून  द्यायचं.. एरवी  मी  बसने  गेले  असते  पण  आम्हाला   जरा  लवकर  पोहचायचा  होतं.. शेवटी  एक  रिक्षा वाला  meter च्या  भाड्याने  तयार  झाला.. वाटेत  शीतल  थांबली  होती.. तिचं  parcel मुंबईला   पोहचवायचं   होतं.. काही  खास  निरोप  द्यायचाय का तिकडच्याना  असं  तिला  म्हणल्यावर ती  गोड  लाजली.. :) पुढे  दीपालीला  घेऊन  रिक्षा  स्टेशन  कडे  निघाली.. रिक्षेने  थोडा  त्रास  दिल्याने  आम्ही  वेळेवर  निघूनही  जरा  उशीर  झाला.. वैद्य  सर, अंजली  ताई  हे  आधीच  येऊन  थांबले  होते.. लगेच  ७ च्या  बसने  आमचा  'पुणे  मुंबई  पुणे ' प्रवास  सुरु  झाला.. 

हा  प्रवास  खूप  वेगळा  होता.. माझ्यासोबत  सगळे  थोर  मंडळी  होते.. वैद्य  सर  (रमेश  वैद्य ) हे  जेष्ठ  कवी, त्यांची  पुस्तक ,कार्यक्रम  तर  होतातच  शिवाय  ते  दरवर्षी  काव्य सप्ताह आयोजित  करतात.. ते  इतके   मोठे  असूनही एकदम  साधे  आहेत,कुठलाही  दिखाऊ पणा नाही.. वैद्य  सर  आणि  शिरीष  ताईंचा   जुना  परिचय.. त्यामुळे  आम्हाला  त्यांना  भेटण्याची  संधी  मिळत  होती..  अंजली  ताई  (गीतांजली  जोशी) यांच्याशी माझी   ओळख मागे   शब्दवैभव  मंडळात  झाली होती.. त्या  स्वतः  मोठ्या  कवियत्री  आहेतच  आणि त्या  ना  सी  फडके  यांचा  कन्या  आहेत.. पण  त्यांच्याशी  बोलताना  कुठेही  कुठला  अहंकार  जाणवत  नाही.. लोक  जसं  उंचीवर  जातात  तेव्हढ   त्यांचं  मन  मोठं  होत  जातं  असं  म्हणतात.. आणि  दीपाली.. माझी  hsbc मधली  छान  मैत्रीण.. ती  कवितेसाठी  खूप  काही  करत  असते.. तिच्याकडे  बघून  मला  नेहमी  वाटतं  कि  मी  तिच्या  १ /४  पण  काही  करत  नाही.. :( हळू हळू शिकायचं आता तिच्याकडून.. 
तर  असा  आमचा  मस्त  group होता.. बसमध्ये  आम्ही  एका  रांगेत  बसल्याने  बस  कधी  सुटली  आणि  दादरला  कधी  पोहचली  खरच  कळलं  नाही.. ते   तिघं  त्यांच्या  छान  छान  आठवणी  सांगत  होते  आणि  मी  ऐकत  होते.. पूर्ण बसमध्ये  आमचाच  आवाज  होता.. आयुष्यातली  माझी  हि  पहिली  वेळ  असेल   जेव्हा  मी  माझी  माझी  गाणी  ऐकत  बाहेर  बघत  प्रवास  करत नव्हते.. तरुणांना  लाजवेल  असा   आमचा  साहित्यिक  दंगा  चालू  होता.. मध्ये  अधे  खाणं पिणंही  जोरात  चालू  होतं.. :)  फडके  आणि  अत्रे  यांच्यात  पूर्वी  थोडे वाद  होते  पण  त्यांच्या  दोघांच्या  पत्नींची  चांगली  मैत्री  होती  असं  अंजली  ताई  सांगत होत्या.. अशा  बऱ्याच  जुन्या  आठवणी  ऐकण्यात  दादर  कधी   आलं कोणालाच समजलं नाही..
दादरला अमित  (शीतलचा  नियोजित  वर) आधीच येऊन थांबला होता.. त्याची  सगळ्यांशी  ओळख   करून  देऊन त्याला  त्याचे  parcel सुपूर्त केले  आणि  मग  त्याने  आम्हाला  शिरीष  ताईंच्या   घरापर्यंत  सोडलं..  सगळ्यात  जास्त  गोष्ट  मला  जी  आवडली  असेल  ती  म्हणजे  शिरीष  पैंच्या   घराचं  location.. त्यांच्या  घरापासून  समुद्र अगदी  हाकेच्या   अंतरावर.. नंतर  आपण  समुद्रावर  जाऊया  असं  मी  म्हणाल्यावर  सगळे  हो  म्हणले.. मी  लहान  होते  सगळ्यात  म्हणून  माझे  'खिडकीची  जागा, सागर भेट' वगैरे असे  सगळे  हट्ट  पुरवले  गेले.. :) 

सांगितलेल्या  वेळेत  म्हणजे  ११वाजता  आम्ही  शिरीष  ताईंच्या  घरी  पोहचलो.. त्यांच्या  घरी  त्यांची  मुलं,नात ,नातसून  सगळेच  वकील  असल्याने  बाहेर  वकिलांच  office होतं,तिथे  बरीच  गाद्री  होती.. तिथून  आत  गेल्यावर  मोठ्या  दालनात  शिरीष  ताई  बसल्या  होत्या.. मीतर  त्यांना  पहिल्यांदाच  पाहत  होते.. ८०+ वयाच्या  असूनही  एकदम  टवटवीत  हसरा  आणि  तेजोमय  असा  त्यांचं  चेहरा.. त्यांच्या  personality ने  मी एकदम  प्रभावित  झाले.. वैद्य  सरांनी   आमची  सगळ्यांची  ओळख  करून  दिली.. अंजली  ताईंनी  त्यांना  त्यांच्या  कवितेचा  प्रवास  कसा  होता  हे   विचारलं  आणि  मग  गप्पा   खऱ्या  अर्थाने  रंगू  लागल्या..
शिरीष   ताईचं   बालपण  पुण्यात  गेलं.. तेव्हा  शाळेत  लिहिलेल्या पाह्लील्या  कवितेच्या  ओळी  त्यांनी  ऐकवल्या.. आम्हाला  कमाल  वाटली  त्यांच्या  स्मरणशक्तीची.. मग  त्यांनी  अत्रेंबद्दल  सांगितलं.. त्यांच्या  घरी  खूप  मोठ्या  मोठ्या  लोकांच्या  माफिली  कशा  व्हायचा  आणि  त्याचा  परिणाम  शिरीष  ताईंवर  कसा  होत  गेला  हे  त्यांनी  सुंदर रित्या सविस्तरपणे  सांगितला .. college मध्ये त्यांनी  बऱ्याच  कविता  लिहिल्या  होत्या  पण  त्या  कविता  म्हणजे  त्यावेळेच्या गाजलेल्या  कवींची  copy होती  असा  त्या  अगदी  मोकळेपणाने  म्हणल्या.. नंतर  लग्न  झालं ,मुले  झाली.. मुलांचं  संगोपन  करताना  त्यांनी  बालकविता  लिहिल्या  त्या  खूप  प्रसिद्ध  झाल्या.. नंतर  त्यांची  पुस्तके  निघाली.. एकदा केशवसुत  पारितोषिक  त्यांना  आणि सुप्रसिद्ध कवी  कारांदिकाराना  विभागून  मिळालं  अशा  बऱ्याच  आठवणी  त्यांनी   सांगितल्या..त्या  काळात  अत्रे  मराठा  चालवायचे.. त्यांना  किती  अडचणी  आल्या  हे  ऐकताना  आम्हीच  खूप  हळवे  झालो.. आपल्याला  लांबून  वाटतं  ही  मोठी  लोकं,  त्यांचं  सगळं  चांगलं  असतं.. पण  त्यानाही  खूप  सोसावं   लागलंय  हे  ऐकून  कसंतरी  झालं.. 
सगळ्यात  जिव्हाळ्याचा  विषय  होता  तो  'हायकू'.. एकदा  त्यांना  विजय  तेंडुलकरांनी  मुळचा  जपानी  भाषेतलं  हायकूचा  पुस्तक  दिलं  आणि  त्या हयाकुच्या प्रेमातच पडल्या.. मग  त्यांनी  खूप  हायकू  लिहिले.. आम्हाला  हायकुबदल  बरीच  माहिती  मिळाली.. ३  ओळीत   खूप  काही  सांगून  जाणारा  हा  काव्य  प्रकार  खूपच  भावला.. मराठीमध्ये  हायकू  शिरीष  पैनी  आणला  आणि  त्यांच्याकडून  प्रत्यक्ष  हायकू  ऐकायचा  भाग्य  आम्हाला  लाभलं!!! 

इतक्या वेगाने गाडी पुढं गेली
रस्त्यावर उमललेली रानफुलं
डोळे भरून पहातही नाही आली

उदास झालेलं माझ मन
इतकं प्रसन्न कसं झालं 
साधं पाखरू तर बागेत चिवचिवल

उडत जाताना बगळ्यान 
किंचित स्पर्श केला पाण्याला
उठलेला तरंग वाढतच गेला

आम्ही  पुण्याहून  खास  त्यांना  भेटायला  आलो  आहोत  याचा  आमच्यासारखाच  त्यानाही   आनंद  झालं  होता.. कवितेबद्दल  त्यांना   खूप  प्रेम आस्था  आहे  हे  त्यांच्या  प्रत्येक  वाक्यावरून  जाणवत  होते.. आणि  त्यांचं  सगळं  ऐकून  आम्ही  सगळे  खूप  भारावून  गेलो  होतो.. नंतर  त्यांनी  पोहे  दिले  ते  हायकू  एव्हडाच  चविष्ट  होते.. :)) त्यांच्या  मुलांशी ,नातवांशी आमची  ओळख झाली.. 

खाणं  झाल्यावर  त्यांनी  आम्हाला  आमच्या  कविता  सदर  करायला  सांगितल्या.. सर ,अंजली   ताई , दीपालीच्या  कविता  झाल्यावर  मी  त्यांना  म्हणलं  माझं  धाडस  होत  नाही  कविता  वाचायचं  कारण  माझ्या  अगदीच  साध्या  कविता  आहेत.. पण  त्यांनी  ऐकलं  नाही.. आणि  त्या  कविता  खूप  मनापासून  ऐकत  होत्या,काही  कळलं  नाहीतर   पुन्हा  वाचायला  सांगत  होत्या.. अत्रेंच्या  त्या  मोठ्या  वास्तूत  शिरीष  ताईंसमोर  कविता  सादर  करयाण्याचा  अनुभव  काही  वेगळाच  होता.. नंतर  त्यांनी  त्यांच्या  कविता  आणि  हायकू  ऐकवले.. तेव्हा अजून   ऐकतच  राहावं  असे  वाटत  होते.. काही काही हायकू एकदम senti हृदयस्पर्शी होते.. शिवाय त्यांनी जपानी हयाकुंचे भाषांतर केले होते तेही सादर केले त्यांचं   वय  इतकं  होतं  पण  आवाज  आम्हाला  लाजवणारा  होता.. कविता  वाचण्याचा  कौशल्य  अप्रतिम  होता.. शेवटी  मग  त्यांचं  सत्कार  करून  आमची  निघायची  वेळ  झाली.. आठवण  म्हणून आम्ही  त्यांची  स्वाक्षरी  घेतली .. निघताना  त्या  म्हणल्या  कि सुंदर  काव्यमैफल रंगल्याने त्यांच्यासाठीही  हा  दिवस  अविस्मरणीय  होता.. विशेष  म्हणजे  आमची  आठवण  म्हणून  त्यांनी  त्यांचा  'माझे  हायकू' या  पुस्तकावर  आमची  नावे  लिहून  घेतली.. हा  त्यांचा  मनाचा  मोठेपणा  होता बाकी काही नाही.. शेवटी   त्यांचा  आशीर्वाद  घेऊन  आम्ही  निघालो..

ठरल्याप्रमाणे  थोडावेळ  सागर दर्शन केलं.. यावेळेस चक्क  तिकडे  गार  वारं  असल्याने  घाम  घाम  झालं  नाही..  जेवण  करून  लगेचच  आमचा  परतीचा  प्रवास  सुरु  झाला.. पूर्णवेळ  त्या   कशा  आणि  किती  छान  बोलल्या,त्यांचा  कविता ,हायकू  याबद्दलच आम्ही  बोलत राहिलो.. त्यांची 'गाय वाट' ही कविता आम्हा सर्वांनाच अगदी मनापासून लक्षात राहिली..  येतानाही  आम्ही  सगळे  एकत्र  बसल्याने  गप्पांमध्ये  खंड  पडला  नाही.. मला  बाकी  सगळ्यांचा  अतिशय कौतुक  वाटलं  कि  ते  वयाने  मोठे  असून  त्यांच्यात  किती  stamina आहे ,पुणे येईपर्यंत अथक  गप्पा  चालू  होत्या  सगळ्यांच्या.. 

येताना  सगळ्यांच्या  चेहऱ्यावर  एक  वेगळाच  आनंद  आणि  समाधान   होतं,जणू आम्हाला  एक  शिदोरी  मिळाली  होती  आमच्या  पुढच्या  साहित्याप्रवासाठी.. :))


बुधवार, २६ जानेवारी, २०११

श्रीकृष्णार्पणमास्तु!!!




या  हातावर  ओली  मेंदी ..  रंगेल  का रे  कधीतरी..
या  हातात  हिरवा  चुडा..  चढेल  का रे  कधीतरी..

या  अंगावर  पिवळी  हळद..  उठेल  का रे  कधीतरी..
या  कपाळावर  सौभाग्य   कुंकू..  लागेल  का रे  कधीतरी..

या  गळ्यासाठी   काळे  मणी..  ओवेल  का रे  कोणी  कधी..
या  पायात  नक्षी  जोडवी..  घालेल  का रे  कोणी  कधी..

या  हातास  हातात  कोणी..   कायमसाठी  घेईल  का रे  कधी..
या  मनफुलास   हृदयात  कोणी..  धृवपद   देईल  का रे  कधी.

नसेल  असा  जरी  कुठे  कोणी..   हरकत  नाही  खरं  माझी  काही..
तूच  यावे  हरी  माझ्या  घरी..  घेऊन  जावे  मज  तुझ्या  द्वारी.. 
घेऊन  जावे  मज  तुझ्या  द्वारी..!!!

मी

मी नाही सूर्य दिवसाचा
मी नाही चंद्र पौर्णिमेचा
काळोखात साथ देणारी
मी चांदणी रात्रीची..


मी नाही गुलाब बागेतला
मी नाही वेल बहरलेला
साधीसुधी शांत लाघवी
मी तुळस अंगणातली..


मी नाही गारवा थंडीतला
मी नाही ओलावा पावसातला
शीतल गर्द दाटलेली
मी सावली उन्हातली..


मी नाही चतुर व्यवहारातला
मी नाही विद्वान विज्ञानातला
संपता न संपणारी
मी ओंजळ प्रेमाची..


मी नाही सूर गळ्यातला
मी नाही शब्द ओठातला
सहज अशी उमटणारी
मी भावना मनातली..

मंतरलेले दिवस - १४

वि सु: मित्रानो, या लेखात मी एका विशिष्ट वर्गात मोडणाऱ्या मुलांबद्दल लिहिलं आहे..  तरी तुम्ही कोणीही गैरसमज करून घेऊ नये अशी नम्र  विनंती..  आणि इथे जाणूनबुजून  मी खऱ्या  नावांचा उल्लेख टाळला आहे.


माझ्या  account मध्ये  एक  मराठी  channel आहे.. त्यात  या  account मधले  पुणे, बंगलोर, परदेशातले तसेच   infy आणि  बाकी  company मधले  असे  खूप  वेगवेगळे  लोक  आहेत..  दररोज  channel वर  सगळ्या  मराठी  मंडळींचे  जोरदार   chatting चालतं.. एका  मैत्रिणीने  नुकतच  मला  त्यात  आमंत्रित  केला  होतं.. सगळ्यांशी  अनौपचारिकपणे  ओळख  चालू  होती  तेव्हड्यात  त्यापैकी  एकाचं  personal chat invite आलं..


1st chat window:
xyz : hi
मी : hi
xyz : 'वृंदा' नाव  सुंदर  आहे ..
मी : oh thanks
xyz : कुठे  बसतेस?
mi :  B8.. तू?
xyz : मी  पण.. :)
[इथपर्यंत  सगळं  ठीक  होतं!]
xyz : r u single?
mi: :)
xyz : घरी  कोण  कोण  असतं..
बास..


2nd chat windw:
मी : अगं  तो  xyz कोण  आहेगं?
मैत्रीण १ :  इथलाच  आहे तो .. आणि  तो मुलगा नाहीये, मोठा माणूस आहे..
मी : कसा  आहे  तो ?
मैत्रीण १  : काय  झालं ? त्याने  तुला  personal प्रश्न  विचारले  का?
मी  : होय.. काही  ओळख  नसताना  थेट  'single आहेका  ' विचारायला  लागला..
मैत्रीण १  : hmm.. तो  तसलाच  आहे.. reply करू  नकोस  त्याला  नाहीतर  त्याचं  वाढत  जाईल..
मी  : पण  single /married याच्याशी  त्याला  काय  कर्तव्य  आहे?
मैत्रीण १  : अगं  सरळ साधी गोष्ट  आहे.. single मुली  कोणाच्या  तरी  शोधात  असतात.. त्यांना  impress करणं  सोपं  असतं.. मग  काय  तेव्हडाच  tp..


3rd chat window:
मैत्रीण २  : वृंदा, तू  इथे  नवीन  आहेस  म्हणून  सांगते.. त्या  xyz ने  ping केलं  तर  त्याच्याशी  फार  काही  बोलू  नकोस..
मी  : अगं  मैत्रीण १  सोबत  आता  मी  हेच  बोलत  होते..
मैत्रीण २  : तो  तुला  फोटो  मागेल  introduction साठी..
मी  : eee.. काहीही..
मैत्रीण २  : हो .. तो दर रोज सगळ्या  मुलीना  ping करतो.. तुलाही  करेल  बघ  आता.. खडा  टाकून  बघतो,लागला  तर  लागला  नाहीतर  नाही..
मी  : बर


त्या  दिवसापासून  xyz चं   रोज  सकाळी  आणि  संध्याकाळी  नियमितपणे  ping येतं..  अर्थात आम्ही कोणी त्याला  चुकुनही  कधी  reply करत  नाही.. पहिल्या  एक दोन  वाक्यातच  डोक्यात  गेला  तो..  चीड  येते  अशा  लोकांची.. तुम्ही  एकतर  मुलींशी  निखळ  मैत्री  करा.. एखादी  आवडली  असेल  तर  तिच्यापाशी  तसं  मोकळेपणाने  बोला.. पण  असं   एकावेळेस  १० १०  मुलींसोबत  'flirting' करून  मुलींच्या  भावनांशी  का  खेळावं? कॉलेज  किवा  fresher level असेल  तर  समजू  शकतो.. पण  आता  या  वयात  तरी  या  मुलांना  'maturity' कशी  येत  नाही  काय  माहिती.. पूर्वी  मला  वाटायचं  कि  सुंदर  मुलींच्याच   मागे  मुलं  लागतात.. पण  आता  कळून  चुकलं  आहे  कि  tp करण्यासाठी   मुलगी  देखणी  असली  पाहिजे  अशी  अट बिलकुल   नसते.. तशा  मागण्या फक्त  लग्नासाठी  असतात.. लग्न  झालेल्या  मुलींच्या  वाटेला  सहसा हि  अशी  मुलं  जात  नाही.. आताशा  कळतंय  मला  कि  आई  वडिलांना  मुलीच्या  लग्नाची  घाई  का  असते...

समर्थांनी म्हणलं आहे..   घेव ये तेंचि घ्यावें । घेव न ये तें सोंडावें । उंच नीच वोळखावें । त्या नाव ज्ञान ।।

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

नातं तुझं माझं

भूत नाही..  भविष्य नाही..  वर्तमान ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचा..  काळ कोणता आहे बरं..

उंच नाही..  खोल नाही..  सपाट ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचं..  माप  काय आहे बरं..

कृष्ण नाही..  धवल नाही..  रन्गहिन ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचा..  रंग कसा आहे बरं..

कोरं नाही..  मळकं  नाही..  पुसट ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचा..  रूप  कसं आहे बरं..

गोड  नाही..  तिखट  नाही..  कडवट  ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचि ..  चव  कशी आहे बरं..

नाही नाही म्हणलं तरी..   काहीतरी आहे खरं..
तुझ्या माझ्या नात्यावर..   कविता कशी लिहावी  बरं.. ? :-)

मंगळवार, ११ जानेवारी, २०११

मंतरलेले दिवस - १३



बदलत गेलेले नळ.. 

मागची  पाने  उलटत  असताना  शाळेतले  नळ  आठवतात.. आमच्या  शाळेत  एक  मोठी  टाकी  होती.. मधल्या  सुट्टीत  तिकडे  अगदी  मोठ्या रांगा   असायच्या.. खेळून  दमून  त्या  टाकीच  पाणी  पिल्यावर  एकदम  तृप्त  वाटायचं.. पण  तिथल्या  नळाची  खासियत  वेगळीच.. जितकं  दाबू  तितकंच  पाणी..  छोट्या  हातांनी  तो  नळ  दाबावा  का  पाणी  प्यावं  गोंधळ  व्हायचा.. मग  एखादी  मैत्रीण   दाबणार  आणि  दुसरी  पाणी  पिणार  अशी  कसरत  चालायची.. :)
पूर्वी  पाषाण  रस्त्यावर  आईच्या  office च्या कॉलनीमध्ये वास्तव्य  होते.. तिथले   नळ  मधून अधून   गुरगुरायचे.. म्हणजे  नळातून  एक  विशिष्ठ  आवाज  यायचा.. बाहेरच्यांना तो आवाज  नळाचा  आहे  हे सांगून सुधा  खरा  वाटायचं  नाही.. नंतर  engg च्या  वेळेस  त्यामागच  तांत्रिक  कारण  कळलं  होता पण  आता मात्र  फक्त  तेव्हढा  आवाजच  लक्षात आहे..
collage मध्ये आमचं  department चौथ्या   मजल्यावर.. उन्हाळ्यात  इतक्या  वर  पाणी  नाही  चढायचं.. बिचारे ते  नळ  आवासून  निपचित  पडलेले  असायचे.. आणि  आम्ही  पाण्याच्या  बाटल्या  घेऊन  फिरायचो..
रानजाई  मधली  तर  गम्मतच  काही  और.. :) बिल्डर्सने  लावलेले  इथले  नळ  फार  दानशूर.. बास  आता  पुरे  म्हणलं  तरी  नळ  बंद  व्हायचे नाही.. त्याचं   तोंड  बंद  करण्याचं  सामर्थ्य  फक्त  बाबांमध्येच ..
मग  hsbc मधली फजिती.. पहिला  दिवस  अजून  तसाच  आठवतो.. वरून  पाहिलं ,खालून पाहिलं   पण  नळ  चालू  कसा  करायचा  समजत नव्हतं.. hahaha.. कधीतरी  आपोआप  पाणी  सुरु  झालं  पण   कळत नव्हतं  कि  नक्की  कसं  सुरु  झाला.. मग  आमच्यातला उपकरणीकरण अभियंता उर्फ   insutrumentation engg जागा  झाला.. sensor कुठे  आहे  कळलं  आणि  नळाच  रहस्य  उलगडलं.. 
hsbc च्या  नळांची  इतकी  सवय  अंगवळणी  पडली  कि  बाहेर  कुठेही नळ सोडायच्या  ऐवजी  हात  नळाखाली  धरला  जायचा.. पाणी  नाही आल्यावर  मग  लक्षात  यायचं कि   हा  ऑफिसचा  नळ  नव्हे..
आणि  आता  infy मधले  नळ.. वरती  एक  टिचकी  दिली  कि  पाणी  येत  आपोआप.. अशाने पाणी जास्त  वाया  जात  नाही  आणि  फारसे  कष्टही घ्यावे लागत  नाही.. :)

या  नळान्प्रमाणे   मी  आणि  माझ्या  अवतीभोवतीच  जग  कसं  बदलत  गेलं  कळलच  नाही.. 

हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाँव है कभी कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ जी भर जियो
जो है समाँ कल हो न हो

रविवार, ९ जानेवारी, २०११

मंतरलेले दिवस - १२

अगं काय सांगू तुला, कशाला बघ वेळच मिळत नाही.. घरचं आवरून ऑफिस ,नुसती धावपळ.. आईकडे वेगळं असतं ग  पण इथे सासरी सगळं करावंच लागतं.. बरंय तुझं लग्न नाही झालं अजून, मजा आहे एका मुलीची..

एकदा का मुलं झाली कि आपलं स्वतःचं आयुष्य संपतं.. मुलांचे संगोपन , खाणं पिणं, आजारपण.. त्यांच्या शाळा,अभ्यास शिवाय इतर छंद.. दिवस कसा सुरु होतो आणि कधी संपतो कळत सुद्धा नाही.. तुझं बरंय ग  कसलीही  जबाबदारी  नाही.. पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता येतं,मला हेवा वाटतो तूझा..

अगं आपण जसा वरच्या पदावर जातो तसा कामाचा ताण वाढतो.. माझा तर निम्मा दिवस meetings  मध्येच जातो.. आणि खालून व वरून दोन्हीकडून दोर खेचला जात असतो सारखा.. तुझं चांगलंय, आपलं आपलं काम करून निघून जायचं..  मलाही वाटत  उगाच manager झाले मी.. तू मस्त ऐश करून घे आता.. पुढे जायची फार घाई करू नकोस..

पगार झालं काग.. आमचा पगार व्हायच्या आधी संपायचं गणित आखलेलं असतं..  बरंय तुझ्या नावावर कसलंही loan नाही..  त्यामुळे पगाराच तुला tension  नाही.. नाहीतर आमचं बघा, homeloans etc संपता संपत नाही..  EMI च्या तलवारी सतत डोक्यावर असतात.. तुझ्या मागे  असली कटकट नाही मुळी ..

तुमचं बरय बुवा.. दिवसला थोडे defects काढायचे,बास मग आराम.. आमचं तसं नसतं.. coding, deliveries सतत कामाचा ताण..  तुमच्यासारख पाट्या टाकण्याचं काम नाही आमचं.. खुपदा वाटत मी तुझ्यासारखी testing मध्ये हवी होते..

तुम्ही  offshoreवाले लई मजा करता.. इथे आमची वाट लागते..  client लोक कामावर काम  देत राहतात.. तिकडच्या सारखी इथे चैन करता येत नाही.. शिवाय घरच्यांची तर खूप आठवण येत असते.. खूप एकट  वाटतं इकडे.. चालुद्या तुमची हौसमौज अशीच चालुद्या..

तात्पर्य - जगी सर्व सुखी अशी वृंदा आहे !!! :-)


बुधवार, ५ जानेवारी, २०११

मंतरलेले दिवस - ११

आज  कितीवेळ  जागेवरून   हललेच  नव्हते.. शेवटचा  mail करून  जरा  गडबडीतच  निघाले.. थोडी  भूक  लागल्यासारखे  वाटत  होते..  जाता  जाता  कॅन्टीन  मधून  काहीतरी  घेऊन  जावं  म्हणालं.. counter  पाशी बिस्किट घ्यायला   गेले.. बसची  वेळ  होत  होती  आणि  नेमके  सुटते  पैसे  नव्हते.. झालं  मग  काय  तो  कॅन्टीन  वाला  कटकट लागला करायला..  १०  रुपयाच्या  बिस्किटासाठी  १०० ची  नोट  काय देता..  सुट्टे  नाहीयेत नाहीतर दिलेच असते असं म्हणालं तर तो   म्हणे  अजून  काहीतरी  घ्या  वगैरे.. मला  बाकी  घ्यायचे   नव्हतं  त्यामुळे  मी  शेवटचं विचारलं  देताय  का  नाही  तर  राहिल.. मग  तशीच  बाहेर  आले.. बसला  अजून  थोडा वेळ  होता.. बस  थांबतात  तिथेच  एक   दाणेवाला   होता.. दाणे  घ्यावे   का  विचार  करत  अस्नता  तो  म्हणला  'ताई,दाणे  देऊ  का'.. चिल्लर सापडतायत का  बघू लागले  पण  नाहीच मिळाले.. शेवटी  त्याला  म्हणालं  राहूदे ,आता  सुट्टे  नाहीयेत  पुन्हा  कधीतरी  घेईन.. तर  तो  स्वताहून  म्हणला  माझ्याकडे  आहेतना,मी  देतो! :)


तर  हे  असं  आहे  पहा .. त्या  दाणेवाल्याला  गरज  होती  म्हणून  त्याने  ५  रुपयांसाठी  १०० रुपये  सुट्टे  दिले.. आणि  त्या  कॅन्टीन वाल्याला   माझ्या  घेण्या  न  घेण्याने  विशेष  फरक  पडणार  नव्हतं  म्हणून  शेवटपर्यंत  त्याने  काही  सुट्टे   दिले  नाहीत.. असच  असतं ना .. काही  जणांसाठी  आपण just one of d असतो  त्यांना  आपली  मुळीच  गरज  नसते, आपण  असलो  काय अन  नसलो  काय.. मग  ते  लोकं  माज  करतात.. आणि  काही  लोकांसाठी  आपल्या अगदी  किरकोळ  गोष्टीही  विशेष  असतात.. कोणत्या   ना  कोणत्या  कारणाने  त्यांना  आपण  हवे  असतो  म्हणून  ते  आपल्याशी  चांगलं   वागतात..

 वपुंनी  पार्टनर  मध्ये  म्हणालं  आहेना.. "लक्षात ठेव दोस्त,तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस"!!!

सोमवार, ३ जानेवारी, २०११

पाणीपुरी..

पाहिजे  तेव्हा  गोड
पाहिजे  तेव्हा  तिखट
हवी  तश्या  चवीने  खाता  येते
म्हणून  मला  पाणीपुरी  आवडते..


सोबत  असलीतर  ठीक
सोबत  नसलीतरीही  ठीक
हवी  तेव्हा  एकटीएकटी खाता  येते
म्हणून  मला  पाणीपुरी  आवडते..


लहानग्यांना  आकर्षित  करते
मोठ्यानाही मोहित  करते
हव्या  त्या  वयात  खाता  येते
म्हणून  मला  पाणीपुरी  आवडते..


कोणालाही  मागता  येते
कोणालाही  देता  येते
हवी  तितकी  मनसोक्त  खाता  येते
म्हणून  मला  पाणीपुरी  आवडते..


सुखात  खावीशी  वाटते
दुखातही बरी वाटते
क्षणभर स्वतःचा अन जगाचा विसर पाडते
म्हणून  मला  पाणीपुरी  आवडते..!!!