बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

मंतरलेले दिवस - 2

HSBC सोडून नुकतीच Infy मध्ये भरती.. नवीन जागा,नवे लोक,सगळं कसं नवीन नवीन होतं.. त्यातले काही दिवस अगदी खास होते कारण त्या दिवसात ना HSBC चा रखड़लेला पगार ना Infy चा नवीन पगार.. खात्यात आधीचे थोड़ेफर पैसे शिल्लक होते पण पण.. HSBC GLT 2.0 च्या कॅंटीन मध्ये खाल्यानन्तर जगाच्या पाठिवरचं कोणतही कॅंटीन "BEST' वाटणं यात माझी चूक नव्हति.. :-P
Infy मधले प्रशस्त Canteen आणि मुख्य म्हणजे 'Bench' वरचे दिवस.. त्यामुळे सकाळ दुपार सन्ध्याकाळ आम्ही फक्त चरतच होतो.. हळु हळु जाणवलं की 'bank balance' अधोगतिला जाउ लागला आहे.. तसे माझे वयक्तिक खर्च विशेष नसतात.. मी अज़ून तरी 'free bird' आहे, no committments, nothing.. शिवाय 'home loans','car loans' वग़ैरे मोठ्या लोकांच्या गोष्टी मला लागू पड़त नाही.. असं असलं तरी काहीना काही खर्च तर माणसाला असतोचना.. आजून एक महिना जायचा होता.. याच विचारात गढले असताना अचानक आकाशवाणी झाली.. हाहाहा.. म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्रावरून phone आला.. "तुमचा cheque घेऊन जा!!!" माझ्यासाठी ही आश्चर्याची बातमी होती.. कारण radio वर कविता वाचायची संधी मिळाली हेच खूप होतं त्याबदल्यात पैसे मिळतील हा विचार माझ्या मनाला चुकुनही शिवला नव्ह्ता.. अर्थात ती रक्कम जास्त नव्हती पण माझं बाकी कुठंही अर्थाजन होत नव्ह्तं तेव्हा अगदी त्याच वेळी हा cheque मिळणं हा मोठा योगायोग होता.. देवाचं आपल्याकडे नेहमी लक्ष असतं ,आपण एकटे कधीच नसतो ही गोष्ट मला प्रत्येक घटनेनंतर जाणवते!!! :-)

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

ऋण...




पावसाची एक सर येता,

चटके उन्हाचे विरून जातात..


अन् गंध मातीचा सुटता,


हिरावाईचे गालीचे पसरतात..


मग वळून मागे पाहता,


ऋण त्या उन्हाचे स्मरतात..


ऋण त्या उन्हाचे स्मरतात...!



सुखाचा एक क्षण येता,

क्षण दुखांचे संपतात..


अन् नव चेतना मनास मिळता,


जीवनास सुंदर फुलवतात..


मग वळून मागे पाहता,


ऋण त्या दुखाचे स्मरतात..


ऋण त्या दुखाचे स्मरतात...!

रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

रूक्मिणी स्वयम्वर..

पूर्वीच्या काळी ईच्छित वर प्राप्तीसाठी मुली 'रूक्मिणी स्वयम्वर' पोथी चे वाचन करायच्या.. त्यापद्धतीने एक दिवस माझ्या आजीनेही मला ती पोथी वाचायला दिली.. मला मुळात वाचनाची आवड आहे.. त्यातून हा विषय थोडा interesting होता, म्हणलं वाचून बघावं,काय हरकत आहे.. आतापर्यंत ही गोष्ट इकडून तीकडून ऐकली होती त्यामुळे अगदीच नवीन नव्हती.. पण या पोथितुन बरच खोल वर्णन वाचायला मिळालं..
विदर्भातल्या भीष्मक राजाची 'रूक्मिणी' ही एकदम बुद्धिवान,रुपवान,शीलवान आणि उदार मनाची अशी एकुनति एक कन्या.. त्याच्या राजवाड्यात बरेच सधुसन्त कीर्तन करायला यायचे.. त्यांच्याकडून रूक्मिणिने श्रीकृष्णबद्दल बरच ऐकला होता.. कोणी त्यांच्याबादल सांगायला लागला की तिला अजुन ऐकावसं वाटे.. श्रीकृष्णांच्या किर्ती,रूप, ऐश्वर्य आदी गुणांनी ती खुपच प्रभावित झाली होती.. लग्न करेन तर श्रीकृष्णांशीच असं तिने मनोमानी ठरवलं होतं.. पण तिच्या बंधूंनी तिचं लग्न शिशुपालाशी ठरवून ठेवलं होतं.. रूक्मिणी एक राजकुमारी होती, खंबीर मनाची होती.. तिच्या विश्वासातल्या सुपात्र ब्राम्हणाला तिने एक पत्र लिहून श्रीकृष्णांना सुपुर्त करायला सन्गितलं..
ही कथा वरवर पाहता साधी वाटते.. पण मला रुक्मिणिच्या धाडसाचे फरच कौतुक वाटतं.. त्या काळी मुली उंबरठा ही ओलांडून जात नसत.. तरी खास पत्र लिहून श्रीकृष्णांना निरोप पाठवायचा तिला कसं सुचलं असेल.. त्या ब्राम्हणावर किती विश्वास ठेवावा लागला असेल,त्याने मधेच कुठे बातमी फोडली असती तर.. आणि तो निरोप वेळेत मिळणं खूप मह्त्वाचं होतं.. इकडे रूक्मिणी-शिशुपालाच्या लग्नाची जोरात तयारी चालू होती.. त्या काळात दळणवळणाचं विशेष साधन नव्ह्तं.. विदर्भ ते द्वारका असा प्रवास त्या ब्राम्हणाने खडतर प्रवास कसा संपवला असेल..
शिवाय रूक्मिणिने केवळ श्रीकृष्णांबद्दल ऐकलं होतं.. ते पत्र वाचून श्रीकृष्ण कशी प्रतिक्रिया करतील , ते वेळेत येतील का वगैरे कितीतरी प्रश्‍न तिच्या मनात आले असतील.. तिने पत्रात सरळ सरळ लिहिलं होतं की इथून माझं हरण करून पाणिग्रहण करावं..माझी शिशुपलाशी लग्न करायची मुळीच इच्छा नाही त्या अगोदर इकडे यावं.. एव्हढच म्हणून ती थांबली नव्हती तर कुठून पळवणं सोपं जाईल अशी सोयीस्कर योजना तिने श्रीकृष्णांना पत्रातून सविस्तरपणे कळ्वली होती.. यालाच 'settings' म्हणतात !!! :) त्या काळी लग्नाच्या आधी देवीच्या मंदिरात जायची पद्धत असायची त्या वेळेस त्या मंदिरात तिचे बंधू वगैरे नसतील तर तिथून पळवता येईल अशी बीनचुक आखणी तिने केली होती.. आणि नंतर अगदी तसंच घडलं हे विशेष..
असं म्हणतात की रूक्मिणी लक्ष्मी देवीचा एक अवतार आणि श्रीकृष्णंबद्दल वेगळं काही सांगायला नको.. तरीही त्याकाळात एका स्त्रीने प्रेमात पडून एका पुरुषाला पत्र लिहावं आणि पळून लग्न करायची योजना आखणं याचं मला थोडा जास्तच नवल वाटलं! :))

लहानपण देगा देवा!!! :)

शनिवार संध्याकाळी घरजवळच्या टेकडीवर फिरायला गेले होते.. मनसोक्त भटकून, सूर्यास्त आणि चन्द्रोदयाचे दर्शन घेऊन घरी परतत होते.. त्या टेकडीच्या आसपास नवीन बांधकाम चालू आहेत.. रस्ता छोटा आणि कडेला मोठमोठ्याल्या इमारती.. तिथेच कुंपणापालिकडे बांधकाम करणार्‍या लोकांची वस्ती.. वीकेंड ईव असल्याने साहजिकच रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होती..
एकएकी तारेच्या कुम्पणातुन एक छोटसं गोंडस पोरगं रस्त्यावर धावत सुटलं.. नुकतच चालयलां लागलं असेल कदाचित.. अंगावर एकही कपडा नव्हता,उन्हामुळे काळवन्डलं होतं.. त्याच्याकडे बघेस्तोवर मागून एकदम एक कार जोरात आली.. एव्हद्या लहान रस्त्यावर इतका वेग कसा असा म्हाणेपर्यंत ते छोटासा पोर रस्त्याच्या मधे.. अचानक काय करावं सुचलं नाही.. मग मी त्या गाडीला हात करून थांबवला आणि बाळाचा हात धरून कडेला नेलं.. त्या अवघ्या क्षणात काहीही घडू शकलं असतं,तो कारवाला ही थोडा घाबरला होता.. पण पण याची त्या मुलाला किंचिती कल्पना नव्हती.. त्याला मी धरलं तेव्हा त्याने इतकं गोड स्माइल दिलं की ते आता अठवलं तरी माझया चेहर्यावर आपोआप हास्य खुलत आहे.. :-)
तो मुलगा पुन्हा रस्त्यावरच पळत होता.. त्या कुंपणाच्या पलीकडे झोपडितल्या बाईला म्हणलं मी की या मुलाकडे लक्ष द्या,जोरात गाड्या येत आहेत.. ती बाई चुलीवर भाकरी थापात होती.. जोरात ओरडून बोलली की ‘इसका बाप कूच ध्यान नाही देता,मै कहा कहा देखु..’ तिचा बोलणं ऐकून त्या मुलाचे वडील आले तेही ओरडत की.. ‘एछोकरे रस्तेपे क्यो खेल राहा है..’ त्याने अलगदपणे त्या बाळाला उचलून कुम्पणाच्या आत घेतलं.. एव्हढं सगळं होत असताना त्या बाळाला कशाचही भान नव्हतं.. आई वडील काय ओरडत आहेत किवा रस्त्याच्या जोरात गाड्या या कुठल्याच गोष्टीचा भय नव्हता त्याला..
खरच बालपण सगळ्यात सुखाचा असतंना.. ना कसली काळजी,चिंता,भीती,शंका,संशय, ना कसले प्रश्‍न.. त्याना खेळायला काहीही चालतं.. कुठेही असलेतरी ते आपल्याच विश्वात हरवलेले असतात.. त्या मुलाचा तो निरागस चेहरा अजूनही माझया डोळ्यसमरून हलत नाहीय..!!!:-)

मंतरलेले दिवस - 1..

वाटचाल नवीन आयुष्याची ..

नुकताच पाऊस पडून गेला होता.. काळसर रस्ते ओलसर दिसत होते.. समोरची टेकडी हिरवी शाल अथरून बसली होती.. सभोवताली लुसलुशित गवत पसरलं होतं.. हिरव्यागार पानानवरचे टपोरे थेंब कोवळ्या उन्हात चमकत होते.. लिलीची श्वेतवर्ण फुले लक्ष वेधून घेत होती.. कारंज्याचे तुषार स्वछन्दपणे खेळत होते.. खळखळत्या पाण्याचा नाद चालू होता.. तळयातल्या नितळ पाण्यात लालसर गोटे विसावले होते.. आणि ती, ती तिच्या नवीन आयुष्याची वाटचाल सुरू करत होती.. :)

Give me some sunshine
Give me some rain
Give me another chance
I wanna grow up once again!

केळफा... :)

नुकताच मी 'हरिश्‍चंद्रची फॅक्टरी' मराठी चित्रपट बघितला.. लाई भारी आहे.. सगळ्यांना माहितीच असेल की कथा दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित आहे.. एखादी नवीन वेगळी गोष्टा करायची जबरदस्त इच्छा, त्यासाठी केलेली अतोनात धडपड, प्रचंड आत्मविश्वास, लोकांच्या टिकेला भीक ना घालता कार्याताली सातत्यता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायकोमुलांचा खंबीर पाठिंबा व सहभाग.. मला या गोष्टी फारच भावल्या.. एकवेळ पैशाचे पाठबळ नसेल तरी चालेल,ते मिळवता येतं पण आपल्या जवळच्यांचा आपल्यावरचा विशवस आपल्याला कुठून कुठे न्हेतो हे फाळकेन्च्या कथेतुन स्पष्ट होतं!!! :-)

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०

आताशा मनास..

कधी उन्ह पावसात
कधी पाऊस उन्हात
आताशा मनास,
हे ऋतू कळेनात

कधी सत्य स्वप्नात
कधी स्वप्न सत्यात
आताशा मनास,
या स्थिती कळेनात

कधी जग शून्यात
कधी शुन्य जगात
आताशा मनास,
ही गणितं कळेनात

कधी वाद प्रेमात
कधी प्रेम वादात
आताशा मनास,
हे भाव कळेनात

कधी मी मनात
कधी मन माझ्यात
आताशा मानस ,
ही मने कळेनात

कधी तू.. कधी मी..


कधी तू असतोस,
मी नसते...

कधी तू नसतोस,
मी असते...

कधी दोघं असतो,
वेळ नसते...

कधी वेळ असतो,
नशीब नसते...

कधी नशीब असते,
तो क्षण मी जगते...!

तुझ्या द्वारी..

तुझ्या द्वारी
दर्शनास यावे कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच प्रसन्न मुद्रा उमटावी…

तुझ्या द्वारी
घंटा वाजवावी कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच प्रेमळ साद उमटावी…

तुझ्या द्वारी
नैवैद्य दाखवावा कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच मधुर चव उमटावी…

तुझ्या द्वारी
प्रार्थना म्हणावी कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच करुण आर्तता उमटावी…!

नातं..

नातं नको हिमालयातल्या शुभ् बर्फासारखं,
सुंदर असलं तरी कालांतराने वितळून जाणारं…
नातं असावं ओबाड ढोबड दगडासारखं,
सगळ्या ऋतूंमधे अस्तित्व टिकून रहाणारं…!

नातं नको नदीच्या पात्रासारखा,
पाणी गोड असलं तरी त्याला मर्यादा असलेलं…
नातं असावं विशाल सागरसारखा,
खारं पाणी असला तर अथांग रूप असलेलं…!

नातं नको एखाद्या विद्युत रोषणाई सारखं,
झगमगाट असलं तरी कृत्रिम भासणारं…
नातं असावं देवासमोरच्या समई सारखं,
छोट्या ज्योतिने मन प्रसन्न करणारं…!

प्रवास आसवाचां..

कुठेतरी काळजात काहीतरी बिघडणं
अन् त्याचे पडसाद डोळ्यात उमटणं
क्षणात चंचल डोळ्याचं भरून येणं
त्यातल्या एखाद्या आसावाचं एकदम कडा ओलान्डणं
हळू हळू त्याचं गालावरून घरन्गळणं
मनाचा रंग चेहर्यावर उतरवणं
नशीब असेल तर एखाद्यानं त्याला झेलणं
नाहीतर स्वतहाच्या बोटानीं त्याचं अस्तित्व संपून टाकणं...!

सांजक्षण..

तळपता सुर्य डोंगराआड लपु लागला..

पश्चिमेस केशराचा सडा सांडू लागला..

पक्षांचा थवा घरी परतु लागला..

हवेत सुखद गारवा जाणवू लागला..

रातराणीचा सुगन्ध दरवळु लागला ..

आकाशात एक एक तारा चमकू लागला..

अस्पष्ट आकृत्यांचा खेळ दिसू लागला..

रातकिड्यांचा आवाज घुमू लागला..

देवासमोर तेजोमय दिवा तेवु लागला..

तो सांजक्षण मज चेतवुन गेला...!

तो आणि ती...

तो अफाट गरजता सागर
ती त्यामधे सामावलेली निश्चल सरिता

तो उसळत्या लाटा
ती त्या लाटांचा किनारा

तो एक हिरवगार पान
ती त्यावर पडलेला सुंदर दवबिन्दु

तो विस्तीर्ण शाखा
ती त्यावर पसरलेला नाजूक वेल

ती एक कोमल फूल
तो त्यामधे गुंतलेला भूंगा

तो एक शिंप्ला
ती त्यामधला टपोरा मोती

तो एक शंख
ती त्यामधे लपलेली लाजाळु गोगालगाई

तो एक मजबूत होडी
ती त्या होडीचे शीड

तो एक अटूत दगड
ती त्यामध्ये कोरलेले सुंदर शिल्प

तो मुरलीधरची मुरली
ती त्या मुरलितुन उमटणारे मधुर सूर…!

क्षण...

क्षणात आपण कोणीतरी असतो
क्षणात आपण कोणीच नसतो…

क्षणात क्षणाला अर्थ असतो
क्षणात क्षण निरर्थक असतो…

क्षणात श्वास मोकळा होतो
क्षणात श्वास कोंडला जातो…

क्षणात क्षण क्षणिक ठरतो
क्षणात क्षण निरंतन होतो…!

हरवलं आहे..


फुलांचा रन्ग.. हवेतला सुगन्ध..

निखळ आनंद.. हरवला आहे…

आशेची किरणे.. पोर्णिमेचे चांदणे..

मन्सोक्त हसणे.. हरवले आहे…

पावसाच्या धरा.. लाटांचा किनारा..

भावनांचा झरा.. हरवला आहे..

हे असं ते तसं.. सगळं आहे जसंच्या तसं…

तेव्हडं मन माझं कसं.. हरवलं आहे… !!!

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

'ती' आणि 'तो' ओळखा पाहू ..

ती : आज आपली शेवटची भेट .. पुन्हा काय माहिती कधी भेटू .. इकडे येणं झाला कधी तर मी नक्कीच भेटून जाईन पण पुढचं कोणाला माहिती .. मागचे सगळे दिवस माझ्या डोळ्यासमोर अगदी जसेच्या तसे आहेत अजूनही ... काही चांगलं घडल्यावर मी सगळ्यात आधी धावत तुला सांगायला यायचे .. आणि काहीतरी बिनसलं की मग तुझ्याजवळच यायचे .. माझ्याहातून काही चुकल्यावर तुझ्यापाशी चूक काबुल केली की मला फार बरं वाटायचं .. आणि काही होवो न होवो दर आठवड्यातली आपली भेट तर न चुकता व्हायचीच .. आता पुढे कसा व्हायचं माझं .. तिकडे दुसरीकडे माझं कोणी नसेल .. कोणापाशी मन मोकळं करेन मी काय माहिती .. तू माझ्यासाठी एव्हडं केलस आणि आज तुला द्यायला माझ्याकडे माझ्या असावान्शिवाय वेगळं काहीच नाहीये .. हे खारं पाणी गोड मानून घे तू ..

तो : अगं वेडे, रडतेस काय अशी तू .. इथे येऊन विश्वासाने तुझं मन मोकळं करायचीस .. खरतर तू स्वतःशीच मोकळी व्हायचीस, नाही का ? आपल्या भेटीची ही जागा एक निम्मित्त होतं .. मी तर कायम तुझ्या अंतरंगात असतो .. तू जिथे जशी तिथे मी तुझ्यासोबत आहे .. या ना त्या रूपाने मी तुझ्या सहवासात नेहमीच असेल .. तू जसं मानशील तसा मी आहे .. तू जिथे मानशील तिथे मी आहे .. तू मानलं तरी मी आहे आणि नाही मानलं तरी मी आहे हे कधीच विसरू नकोस तू!!!



माझ्या घराजवळ अगदी लागुनच एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे .. शाळा सुरु वेळ आणि माझी बसची वेळ जवळपास एकच आहे .. साहजिकच मी निघताना त्या परिसरात विद्यार्थांची आणि पालकांची खूप गडबड असते .. मस्तपैकी अवरून आलेले ते छोटे छोटे मुलंमुली माझा लक्ष नेहमीच वेधून घेतात .. आजही तिथून जाताना तिकडे बघत चालले होते ... cars ची एकदम गर्दी झाली होती .. छानशी school bag आणि tiffin bag हातात देऊन पालक मुलांना शाळेच्या दारापर्यंत सोडून टाटा करत होते.. आणि त्याच क्षणी दुसरीकडे त्यांच्याच वयाचा एक मुलगा दुचाकीवरून वृत्तपत्र वाटायला जाताना दिसला.. एकदम साधेसुधे कपडे, जुनी cycle.. डोळ्यात झोप ,नक्कीच त्याच्या घरच्यांनी पाहते उठवून कामाला पाठवलं असणार त्याला.. माझ्या मनात आलं कि त्या छोट्याला शाळेतल्या मुलांकडे बघून काय वाटत असेल.. शाळेतली मुला तयार होऊन आरामात car मध्ये बसून शाळेत जातात आणि मी..??

असा फरक आपल्याभोवती सगळ्याच स्तरांवर दिसतो.. जन्म घेताना कोणाच्या घरी घ्यायचा हि गोष्ट आपल्या हातात नसतेना.. काहीनकडे पैसे ,बुद्धी ,सौदर्य भरुभरून असतं पण त्याचसोबत काहींना अतिशय माज /अहंकार असतो .. काहीजण स्वतःचं हित बघता बघता इतके स्वार्थी होतात की त्यांना आपलं कुठे काही चुकतंयका याचा लवलेशही नसतो .. तर काहींना बरंच काही करायची इच्छा असते पण आर्थिक बळ कमी पडतं किंवा काहींकडे बिलकुल वेळ नसतो .. खरतर आपण कितीही घरे बांधली,bank balance कितीही वाढत गेला तरी शेवटी या जगातून निघून जाता ते सगळा सोडूनच जावं लागतं.. पैसे,रूप,रंग,देह या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या नशिबाने कमी जास्त मिळतात.. पण पुढे आपण कसं जीवन जगायचं ही गोष्ट काही प्रमाणात तरी आपल्या हातात आहेना.. कर्तव्य पार पडता पडता आपण जर आजूबाजूच्या लोकाना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात काही मदत करून किमान दोन क्षण तरी आनंदाचे त्याना देऊ शकलो तर त्यातून मिळणारं समाधान नक्कीच शाश्वत असतं असं मला वटतं.. अर्थात माझ्या या अशा भावना प्रधान स्वभावाला बरेच हित चिंतक नावं ठेवतात,काहीजण फायदा घेतात,कित्येक वेळा मला तोटा ही सहन करावा लागतो.. तरीही मी याबाबतीत तरी स्वताहाला कधी बदलू नये असं मनापासून वततं.. प्रामाणिकपणे आणि शुद्धं भावनेने प्रयत्न करत रहयलं की वेळोवेळी मनाला चान्गलं वळण लागतं.. आणि कुठेतरी हे सगळा 'तो' नक्कीच बघत असतो असा मझा विश्वास आहे.. :))