शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

चिऊताई चिऊताई..

चिऊताई चिऊताई
पहाटे पहाटे इतक्या, तू कशी उठतेस ग
उबदार रजई घेऊन, थोडं लोळावं अजुन, तुला वाटत नाही काग…

चिऊताई चिऊताई
इतकी कशी चिवचिव तुझी, सतत चालू असते ग
थोडा वेळ शांता बस, असा सारखं कोणी, तुला रागावत नाही काग…

चिऊताई चिऊताई
एक एक दाणा खोऊन ,तुझं पोट कसं भरतं ग
बर्फाचा गोळा बघून, रडून हट्टा करावा,तुला वाटत नाही काग….

चिऊताई चिऊताई
इकडे तिकडे उन्च खाली, कशी काय तू फिरतेस ग
शाळा अन् अभ्यासाच्या, नावाखाली सारखं कोणी, तुला रागावत नाही काग…

चिऊताई चिऊताई
तू माझी अन् मी तुझी, जागा एकदा बदलुया काग
रोज तेच तेच करून, वेगळं काही करावं, तुला वाटत नाही काग..

आकाश क्षितिज खरे का खोटे..

आकाश क्षितिज खरे का खोटे..
सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..


स्वप्नात येतात परी..
गोष्टीत येतात राक्षस..
परी, राक्षस खरे का खोटे..
सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..


भीती वाटते भूतांची…
गोष्टी आवडतात देवांच्या..
देव, भूत खरे का खोटे..
सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..!!

आहे काय अन् नाही काय...

रडले काय अन् हसले काय 
भाव माझे, कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय... 

खचले काय अन् सावरले काय 
भोग माझे,कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय... 

हरले काय अन् जिंकले काय 
दैव माझे,कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय... 

तोडले काय अन् जोडले काय 
मन माझे,कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय... 

खोडले काय अन् लिहिले काय 
शब्द माझे,कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय...!!! 

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - ८

नेहमीप्रमाणे आम्ही कॅन्टीन  मध्ये  नाश्ता  करायला  गेलो होतो..  काहीतरी  आणायला  म्हणून  counter  पाशी  गेले  तेव्हा  एक  मुलगा  पुढे  उभा  होता..  जागेवर आल्यावर त्याच्याकडे  सहज  लक्ष  गेलं  तर  तो  त्याच्या  मित्राच्या  आधाराने  चालत  होता..  नीट पाहिल्यावर कळलं  कि  त्याला  अजिबात  दिसत  नव्हतं..   त्याच्या  शेजारी  मी  उभी  होते  तेव्हा हे  मला  चुकूनही  जाणवलं  नव्हतं..  आम्ही  सगळ्याजणी  चाटच  पडलो..  काहीच   दिसत  नसताना  तो  सगळं  कसं  करत  असेल..  प्रत्येक  क्षणाला  त्याला एखाद्याचा  आधार घ्यावा लागत  असेल… campus किती  मोठा  आहे, साधं  canteen मध्ये  जायचं  म्हणालं  तरी  कोणीतरी  सोबत  लागत  असेल..  तो  कोणत्या  प्रकारचं  काम  करत  असेल,कसं  करत  असेल..  तो कुठे  राहत  असेल..  हिंजेवाडीला  इतक्या  लांब  कसा  येत  असेल?

असं  म्हणतात  कि  एखादी  गोष्ट  आपल्याला  कमी प्रमाणात  मिळाली  असेल  तर  देवाने  दुससरी  कोणतीतरी  गोष्ट  भरभरून  दिली  असते  कि  जेणेकरून   सगळी कसर  भरून  निघते..  पण  आपल्याकडे  आहे  त्या  गोष्टींचा  शोध  लागणं  हेच  जरा  अवघड  असतंना..  त्या  मुलामध्येही काही  खास  गुण  नक्कीच  असणार  ज्याने  त्याचा  आयुष्य  सुंदर  होत  असेल..  त्या  मुलाचे,त्याला  आधार  देणाऱ्या  त्याच्या  मित्रांचे, त्याला  प्रोत्साहन   देणाऱ्या  आणि काळजी  घेणाऱ्या  त्याच्या  पालकांचे, त्याला योग्य शिक्षण  देणाऱ्या  शिक्षकांचे  आणि  त्याला  नोकरी  देणाऱ्या  office चे  कौतुक  करावे  तितके  कमी  आहे..

ती  व्यक्ती  अवघ्या  क्षणात  खूप  काही  शिकवून  गेली..  सगळं  चांगलं  असताना  आपला  सूर  बरेचदा  तक्रारीचा असतो..  माझं  हे  असंच  का  आणि  ते  तसंच  का..  पण  आजूबाजूला  बघितल्यावर   कळत  कि  देवाने  जितकं  दिलय  ते  खूप  आहे  आणि  त्यासाठी  आपण  नेहमी  कृतज्ञ व नम्र  राहिलं  पाहिजे..  देवाच्या  कृपेने  आपणास  जे  काही  मिळालय  त्याचा माज न करता  चांगल्या  कारणांसाठी  सदुपयोग  केला  तर  आपल्या  आयुष्याचं  नक्कीच  सार्थक  होईलना! :)

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०

तो आणि ती..

तो अफाट गरजता सागर 
ती त्यामधे सामावलेली निश्‍चल सरिता 

तो उसळत्या लाटा 
ती त्या लाटांचा किनारा 

तो एक हिरवगार पान 
ती त्यावर पडलेला सुंदर दवबिन्दु 

तो विस्तीर्ण शाखा 
ती त्यावर पसरलेला नाजूक वेल 

ती एक कोमल फूल 
तो त्यामधे गुंतलेला भूंगा 

तो एक शिंपला 
ती त्यामधला टपोरा मोती 

तो एक शंख 
ती त्यामधे लपलेली लाजाळु गोगालगाई 

तो एक मजबूत होडी 
ती त्या होडीचे शीड 

तो एक अतुट दगड 
ती त्यामध्ये कोरलेले सुंदर शिल्प 

तो मुरलीधरची मुरली 
ती त्या मुरलीतुन उमटणारे मधुर सूर...! 

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - ७


गोष्ट एका हट्टखोर मुलीची.. :)


त्या   दिवशी  sms आला “moonlight trek over this weekend”..   असे सारखेच काहीना  काही sms  येत असतात..  पण ‘कात्रज –  सिंहगड moonlight trek’  हे  माझं  फार  पूर्वीपासूनचं  स्वप्न होतं  म्हणून  लगेच  फोन   करून  माहिती काढली..  शनिवार,अजून  अवकाश  होता  तोपर्यंत  कोणी  मैत्रिणी  तयार  होतात  का  पाहू म्हणलं..  सगळ्या ‘single’ मैत्रीणीना, अगदी ज्या नेहमी 'नाही' म्हणतात अशांना  देखील  मी  नवीन  उत्साहाने  आणि  आशेने  पौर्णिमेच्या  रात्रीचं  वर्णन  करून trek  बद्दल विचारलं..  पण  सगळ्याजणी ‘नाही’ म्हणाल्या.. ‘नाही’  ऐकायची  आता  सवय   झाली  आहे  त्यामुळे   मी फार  मनाला  लावून  घेतलं नाही..  प्रत्येकाच्या  वेगवेगळ्या priorities  असतात  मी  समजू शकते..  पण  मोठा  प्रश्न हा  होता कि  आता घरच्यांना  कसं पटवायचं! Yes  मग  शनिवारी  सकाळी  आमच्या  घरी रामायण घडलं..  :)

मी: आई,  मी  परवा  म्हणत  होतेना  पौर्णिमेच्या  रात्री moonlight trek आहे..  मला  केव्हापासून  करायचं  तो trek..  मी  जाऊ काग?
आई: हेबघ,  मला  काही  विचारू  नकोस trek  चं वगैरे..  बाबांशी बोल..
मी: बाबा..
बाबा:  रात्रीच्या ट्रेकला  मुळीच  जायचं नाही..  सकाळी  जाऊन  संध्याकाळी यायचं  असेल  तर जा..
मी:  अहो बाबा,  हा  खास  रात्रीचा  ट्रेक आहे..  आणि  वर्षातून  कधीतरीच  हा  ट्रेक असतो..  चांदण्यात  मस्त  फिरत फिरत..
बाबा: काहीतरी काढत  असतेस तू.. आता  तर कोकणात जाऊन आलोना.. सारखं सारखं काय ..
मी: कोकणाचा आणि ट्रेकचा काय संबंध.. तुम्ही  शबाताईला विचारा.. तिने पुर्वी केला होता हा ट्रेक.. सगळेच करतात.. खूप प्रसिद्ध ट्रेक आहे हा..
बाबा: कोण कोण आहे ट्रेकला?
मी: जंगल क्लब ट्रेक ग्रूप.. २०/२५ जण असतील.. 3 अनुभवी लोक ‘लीडर’ आहेत या ग्रूप चे..
बाबा: तुझ्या ओळखीच्या मैत्रिणींपैकी कोणीच नाही?
मी: नाही.. :(
बाबा: नाहीना, मग तुला कसं काळात नाही.. रात्रीच्या ट्रेकला नाही जात नसतात असं ..
(झालं माझ्या  डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या..)
मी: बाकीच्याना मी कालपर्यंत  विचारत होते.. कहीना आवड नाही तर कहीना वेळ नाही.. मी काय करू मग?त्या नाही म्हणतात म्हणून माझं  रद्द  का करू? उद्या त्यांच्याकडे वेळ असेल आणि मझयाकडे नसेल.. सगळ्यामैत्रिणिंची लग्न झाली   किवा ठरली आहेत,त्या व्यस्त आहेत.. मग मी का त्यांच्यावर अवलंबुन राहू..
बाबा: अग तेच तर आम्ही म्हणत आहोत.. सगळ्या जणीन्सारखी तू वाग आता.. लग्न झाल्यावर नवार्‍या सोबत पाहिजे तिथे  वाटेल तितक  फिरायला जा आमची काही हरकत नाही..
मी: याचा अर्थ लग्न होईपर्यंत मी दारं खिडक्या बंद करून घरी बसू का.. या वीकेंड्ला काही plan नाहीतर मग काय हरकत आहे ट्रेकला जायला.. मुली हिमालयात ट्रेकला जातात आणि मी साधं सिंहगडला जाऊम्हणत आहे..  तुम्ही सगळे मला हट्टी म्हणता.. पण मी कोणत्या वाईट गोष्टीसाठी हट्ट करते का.. तुम्ही कोणीसमजून घेत नाही मला..  (गंगा जमुनेला पूर आला)
बाबा: तू  ठरवलं आहेस जायचं तर आम्हाला विचारतेस कशाला..
मी: असं काही नाहीए.. मी तुम्हाला विचारात आहे,जाऊ का म्हणून..  माझं फक्त एव्हाढच म्हणणं आहे की तुम्हीत्या ऑफीस मध्ये  चला,आपण सगळी नीट माहिती काढू मग ठरवू.. म्हणजे मग तुम्हालाही काळजी वाटणारनाही..

अशा रीतीने बाबांकडून परवानगी मिळवली.. ट्रेकला कोण कोण सोबत येणार,किती मुली वगैरे खात्री  करून मग बाबा हो म्हणाले.. ज शुक्रवारी रात्री पाऊस धोधो कोसळाला होता त्यामुळे ट्रेक ‘मूनलाइट ट्रेक’ कसा होणार अशीशंका होती मला.. म्हणलं जाऊन तर बघुया.. शनिवारी नल स्टॉप जवळ पिक अप पॉइण्ट होता.. बस मध्ये लीडर सोबत ओळख झाली.. बाकी सगळे आपल्या आपल्या ग्रूप मधे होते.. बस सुटल्यावर  वाटू लागलं आपणएकटं चाललोय हे बरोबर आहे का वगैरे..  खिडकीतून  बाहेर पाहिलं तेव्हा तो माझा चांदसखा हसत म्हणाला ‘मी अहेना तुझ्यासोबत!’ :) घरी एकदा फोन करून सान्गितलं की ग्रूप चांगला आहे तुम्ही शांतपणे झोपा,सकाळी फोन करेन..
रात्री  १० वाजता आम्ही कात्रज घाटापासून चढायला  सुरुवात केली..  तिथे  पहिल्यांदा  सगळ्यांच introduction झालं..  आम्ही  एकूण २०   जण होतो..  ५/६   मुलींच्या  ऐवजी मी धरून आम्ही तिघीच होतो.. आमच्यातले तिघेजण  थोडे  वयस्कर  काका  होते  पण  त्यांचा  उत्साह  सगळ्यात  दांडगा होता..  एक  इयत्ता  सातवीतला  छोटू होता,सर्वात पुढे पळत होता..   त्याचे  वडील  त्याला  सगळ्या trek ला  आवर्जून  घेऊन जातात..  इतक्या लहान  वयात  त्याचे  बर्यापैकी treks  झाले  आहेत,हे  पोरगं  मोठेपणी  नक्की  मोठा trekker होणार!

सरांनी सूचना आणि घोषणा  देऊन  डोंगरांची  वाट  सुरु झाली ..  डोंगरावर  सर्वत्र गुढघ्याच्या उंची  एव्हढ  वाळलेलं  गावात  पसरलं  होतं  आणि  त्यामधून  एक  छोटीशी पायवाट.. torch  ची  गरज  भासत  नव्हती  इतकं  स्वच्छ  टिपूर  चांदणं  पडलं होतं..  एका  बाजूला  डोंगरांच्या रांगा..  आणि  दुसरीकडे  खालती  कात्रज  घाट  आणि ‘ आमचं पुणं’ दिव्याच्या  प्रकाशात  झगमगत होतं!  उकाडा  जाणवत  नव्हता  ना  थंडी  वाजत  होती  अशी  एकदम  आल्हाददायक  हवा होती.. photos  काढायचे  प्रयत्न  करत  होते  पण  जमलं नाही.. एकतर  रात्रीचे photo  मला  काढता  येत  नाही  किवा  माझ्या   कॅमेराचा problem होता..  आमच्यापैकी  एकजण photography  course  करणारा होता..   तो सगळीकडे  अगदी  stand  काढून  सगळं set  करून photo काढायचा.. त्याला   म्हणलं  मला नंतर  सगळे photos पाठव   आणि  मग  मी कॅमेरा  आत  ठेवून   मोकळेपणाने  ट्रेकचा  आनंद  घेऊ लागले..  आता  सगळे  एका  मागून  एक  चालत  होते  त्यामुळे  एकत्र  झाले होते.. ‘ जगते राहो’ ‘ हर  हर महादेव'  वगैरे  गर्जना  चालू होत्या..  या  सगळ्या  वातावरणात  आपण  अपरात्री  कुठतरी  अनोळखी  लोकांसोबत  भटकतोय  असं  मुळीच  वाटत नव्हतं..

"पर्वतांची दिसे दूर रांग.. काजळाची जणू दाट रेघ !!!"  पहिला  डोंगर  संपला  असं  कळल्यावर  आम्हाला  किती  आनंद  झाला  काय सांगू..  तिथून   पुढे  एकदम  दूरवर  सिंहगड  च्या tower   वरचा  लाल  रंगाचा  दिवा  चमकताना  दिसू लागला..  अरे  बापरे  एव्हढा  लांब  कसा  काय  जाणार आपण  असे   प्रश्न  सगळ्यांनाच   पडू लागले..  ट्रेक  खरतर  अवघड नव्ह्ता..  पण  असे १५   डोंगर  पार  पडायचे  होते  हि  खरी  गम्मत होती..  या  अशा  ट्रेकची  कल्पना  सर्वात  प्रथम  कोणाच्या  डोक्यात  आली  असेल,हि  छोटीशी  पायवाट  कोणी  केली  असेल  असे  असंख्य  प्रश्न  माझ्या  मानता  येत होते..
१२.३०ला    एका  पठारावर break  घेतला  तिथे  आम्ही sandwiches बनवले.. :)  खरतर   रात्री  जेवूनच  आलो  होतो  तरी sandwiches  वर  ताव  मारताना  तसं  काही  जाणवलं नाही ..   माझ्यासोबत  ज्या  दोघी  मुली  होत्या  त्या  त्यांच्या  मित्रांसोबत  आल्या होत्या..  त्यातली  एकजण  मागे  पडत  होती  म्हणून  तिचे  मित्र  तिच्या  सोबत  मागे होते..  आणि  दुसरी  ऋजुता  माझ्यासोबत  पुढे होती..  आम्ही  दोघी  पूर्ण  ट्रेक  एकत्र  होतो  त्यामुळे मी  एकटी  वैगरे   नव्हतेच मुळी.. मध्ये breaks  घेत  पुढे  पुढे  जात होतो..  हजेरी  घेता  घेता   सरांनी   मधेच  एक dialogue  मारला “ आपल्यातली  संख्या  जास्त  तर  झाली  नाहीना  ते पहा ..  रात्र  पौर्णिमेची आहे”   तेव्हा  जाणवलं  कि  आम्ही  असे  एकटेदुकटे  फिरत  आहोत  पण  भूताखोरांचा   विचार  चुकूनही   मनात  डोकावला नाही..  साग्लायचे  काहीना  काही jokes  चालू  होते  अर्थात  मी silent mode  ला होते..  मलाना  किती  आणि  काय  काय  पाहून  घेऊ  असं  होत होतं.. “ चांदण्याचे  कोटी कण,  आठवांचे  ओले सण !”

एका  break  मध्ये  गाण्याचा  कार्यक्रम झाला..  तेव्हा  मी  सगळ्यांची  परवानगी  घेऊनच  मग  माझी  कविता ऐकवली.. ;)  सहसा कवितेमध्ये तेही आमच्यासारख्यांच्या  कवितेमध्ये  फार  कमी  लोकांना  उत्साह असतोना..  पण  ते  बिचारे  दामले  होते  म्हणून  कि काय..  काही  आढेवेढे न   घेता  त्यांनी  कविता  ऐकून घेतली!!  मध्ये  अधे glucose/ लिंबू  सरबताचे  डोस   चालू होते..  मग  यापूर्वी  कोणी  किती trekking  केलं  याबद्दल  जोरात  चर्चा  सुरु झाली..  मधेच  कधीतरी mobile  ची  आठवण  झाली  म्हणून  काढून  पाहिला   तर ४   वाजले होते , वाटतही नव्हतं..  मी  आणि  रुजुताने  सरांना ‘ चहा चहा ’  म्हणून  बराच  त्रास दिला..  सिंहगडावर   चहा  मिळेल  अशी  अशा  दाखवून  त्यांनी  आम्हाला  प्रोत्साहन  दिलं .. ;) नंतर   नंतर  आम्ही  सरांना  विचारायचो  अजून  किती  डोंगर  राहिले  तर  ते  म्हणायचे  तो  काय  दिसतोय न  सिंहगड , आलोच  आता जवळ  आलो आपण.. trekkers  लोकांचा  हा typical dialogue  आहे  हे  मी  जाणून होते..  म्हणलं  तो  चंद्र  पण  जवळ दिसतोय,  जायचा  का तिथे.. ;)  कधीतरी  मधेच वाटलं ..  आपण  कुठे  चाललो आहोत ,कशासाठी..  हे  बरोबरचे  कोण आहेत..  तेव्हा  जाणवलं  कि  आता  आपल्याला  झोप  यायला  लागली आहे .. hahaha..

आता   सिंहगड   थोडा  जवळ  वाटू लागला..  आणि  नेमके  तिथे  थोडे  ढग आले..  बघता  बघता  चंद्र  ढगात  दिसेनासा  झाला  आणि  एकदम  अनाधार पाडला..  इथे torch  ची  गरज पडली..  तेव्हा  मागे  वळून  पाहिलं तर  प्रत्येकच्या torche  चा  प्रकाश  एका  रांगेत इतक a  सुंदर  दिसत  होतं  कि  मला  वाटलं  काश  मी  असं photo  काढू  शकले असते..  त्या  डोंगराच्या  वर येईपर्यंत  चक्क   उजाडला होतं..  आम्हला  वाटलं  आतातरी  आला  पण  अजून ३   डोंगर  राहिलेच होते..  घरी  फोन  केला  तेव्हा  बाबांना  म्हणालं  अजून  आम्ही  सिंहगडला पोहाचायाचोत..  बाबा  म्हणले  रात्रभर  काय  केलं मग .. :)

पण  आता  खरच  बास  वाटू  लागलं होतं..  शेवटचा  टप्पा  नाही  म्हणायला  थोडा  कठीण वाटला ..  अजून  नाही  चालवणार  पुढे  असं  होत होतं..  थोडं  चाललं  कि break  असं  प्रकार  चालू होता..  शेवटी  ८.३०ला  आम्ही  जेव्हा destination  गाठलं  तेव्हा   आम्ही  आनंदविभोर झालो.. :)  यावेळेसची  कांदा भाजी + झुणका  भाकर +  चहा   सगळ्यात बेष्ट होता..  शेवटी group photo  काढून  सगळे  बस  मध्ये  बसले आणि एका  क्षणात  गाढ  झोपून गेले..   अशा  ट्रेक  नंतरची  ती  झोप किती  लई  भारी  असते  हे  अनुभवी  लोकच  समजू शकतात..

घरी येताना मनातून मी आई बाबांचे खूप आभार मानले.. ते हो म्हणाले म्हणून मला इतका छान ट्रेक चा अनुभव घेता आला.. आणि तसही माझे हट्ट आईबाबा नाहीतर कोण पुरवणार!!! :)

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

अजुन काय कशाला...

तुझ्या माझ्या भेटीला   
एक पाऊस पुरेसा   
अजुन काय कशाला...   
  
तुझ्या माझ्या गप्पांना   
एक चहा पुरेसा   
अजुन काय कशाला...   
  
तुझ्या माझ्या क्षणांना 
एक आठवण पुरेशी   
अजुन काय कशाला...   
  
तुझ्या माझ्या वादाला   
एक अश्रू पुरेसा   
अजुन काय कशाला...   

तुझ्या माझ्या आनंदाला 
एक पाणीपुरी पुरेशी   
अजुन काय कशाला...   
  
तुझ्या माझ्या कथेला   
एक कविता पुरेशी   
अजुन काय कशाला... 

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

मी लिहिलं नाही तर.. कोणाला फरक पडतो?
मग मी का लिहाव?

मी लिहिलं तरी.. फरक कोणाला पडतो?
मग मी का लिहू नये??

आशेचा सुर्या मावळतो,
तेव्हा इच्छाशक्तीच्या समईकडून प्रकाश मिळतो…!

समईतील तेल संपत येते,
तेव्हा पुन्हा सूर्योदयची वेळ झालेली असते…!!!


समोरची वस्तू जेव्हा अस्पष्ट दिसते
तेव्हा दोष डोळ्यांमधे असतो..
समोरची वस्तू जेव्हा चुकीची दिसते
तेव्हा दोष मनामध्ये असतो..!!!


मंतरलेले दिवस - ६

Office च्या पहिल्या दिवशीच त्या दोघींची बस निम्मित्त ओळख झाली होती.. निम्मा महिना तर होऊन गेला होता त्यामुळे बस पास पुढच्या महिन्यापासून मिळणार होता.. पास नसेल तर प्रत्येक दिवशीची नोंद करावी लागते असा नियम होता.. नाही म्हणायला एका दिवसाचं बसचं भाडं थोडं महाग पडत होतं.. पण बसची सोय आहे हि जमेची बाजू होती .. सुरुवातीला दोघी नवीन असल्याने सकाळी बसमधून उतरल्या कि नियमितपणे नोंद करूनच मग पुढे जायच्या.. हळू हळू एकेक गोष्टी कळू लागल्या.. थोड्याच दिवसात जाणवलं कि बसची नोंद केली कि नाही याची कोणी इतकी गंभीरतेने दाखल घेत नाही.. पास क़्वचितच कधीतरी तपासाला जातो.. झालं मग त्यांच्यातल्या पाहिलेने, हुशार so called smart मुलीने नोंद करणं बंद केलं.. कोणी बघत तर नाही उगाच कशाला पैसे घालवायचे.. आणि दुसरी.. फुकट बसने जायचं तिच्या तत्वात बसत नव्हतं.. सुदैवाने त्या दिवसात पास बघितला गेला नाही.. त्यामुळे पाहिलेचे बरेच पैसे वाचले.. दुसरीचे पैसे गेले पण ती स्वतःशी प्रामाणिक होती..



असच होतं ना कित्येकदा.. कधी कधी खोटेपणाने वागल्यावर माणूस लवकर पुढे जातो.. धावपळीच्या शर्यतीत तोच टिकून राहतो.. आणि सरळ मार्गाने प्रामाणिकपणे वागणाऱ्यान्चा फायदा तर सोडा पण खुपदा त्यांना तोटा सहन करावा लागतो.. पण फरक हा असतो कि खोटेपणाने मिळालेलं सुख क्षणिक असतं आणि प्रामाणिकपणे केलेल्या गोष्टींचा समाधान चिरंतन असतं, नाहीका.. म्हणूनच बाकी कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी स्वतःशी प्रामाणिक राहावं असं मला नेहमी वाटतं.. :)



अरे बापरे.. एव्हढ सगळं लिहिल्यावर मला जाणवलं कि हि तर ससा आणि कासवाची गोष्ट झाली.. hahaha...

मंतरलेले दिवस - ५

Life without Regrets..

माझ्या office चा परिसर खूप सुंदर आहे.. मध्यवर्ती मोठी बाग आणि त्या भोवती इमारती.. हिरवळीच्या कडेची उंच झाडं आणि नागमोडी आकारात बसवलेल्या पांढऱ्या फारश्या अत्यंत सुंदर दिसतात.. संध्याकाळी अंधार पडला कि छोट्या छोट्या दिव्यांनी green-white effect इतका सुरेख दिसतो कि मला रोज मी कुठेतरी hillstation वर आल्यासारखं वाटत.. :)
मूळ मुद्द्यावर येते.. कुठेही building मध्ये किवा canteen मध्ये जाताना फारश्यांवरून जावं लागतं.. हिरवळी मुळे कि काय पण त्या फरशांवर खूप मुंग्या असतात.. प्रत्येक पाऊल टाकताना नकळत माझं लक्ष खाली जातं.. दररोज माझ्या पाया खाली अशा किती मुंग्यांचा जीव जातो कोणजाणे.. खरतर यामध्ये ना त्या मुग्यांची चूक ना माझी.. तरीही मला त्या मुन्ग्यांसाठी उगाच वाईट वाटतं..
हे एक उदाहरण.. असंच असताना आपलं आयुष्य.. खुपदा आपल्या हातून काहीतरी घडून जातं आणि नंतर प्रश्न पडतात आपण बरोबर वागलो का चुकीचं.. बरेचदा कारण नसताना आपण स्वतःवरच अपराधीपणा लादतो किवा सरळ दुसर्यांना दोष देऊन मोकळे होतो.. चूक नेहमी आपली किवा समोरच्यांची असते असा काहीच नसतं.. काहीवेळा आपण प्रयत्न करतो सुधारण्याचा, शांत राहायचा पण असं करता करता विचारांच्या वादळात अजूनच हरवून जातो… कधी कधी सगळं कळूनही आपण परिस्थिती बदलू शकत नाही.. असो..
"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.. दोष ना कुणाचा.."

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

सुदाम्याचे पोहे-4

त्या काकू..

त्या काकुंसोबत माझी पहिली भेट एका लग्न सभारंभात झाली.. पहिल्याच भेटीत माझा हात हातात घेऊन काकू अत्यंत प्रेमाने बोलल्या होत्या कि जणू आम्ही फार पूर्वीपासून एकमेकींना ओळखत आहोत.. तसं पाहिला गेलं तर अनोळखी व्यक्तींशी मी पटकन मोकळी होत नाही..सुरुवातीला मी जरा शांतच असते.. पण काकूंच्या बाबतीत मात्र वेगळच घडलं.. आम्ही खूप छान गप्पा मारल्या त्या दिवशी,लग्न सोहळा आनंदाने मिळून पाहिला ..
नंतर एका कामा निम्मित्त त्यांच्या घरी जायचा योग आला.. सुरुवातीला मला वाटत होता काकू माझ्याशी कशा बोलतील ,त्यांना मी आठवेल का वगैरे.. पण त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी अगदी मनापासून माझी विचारपूस केली.. त्यानाही माझ्यासारखी फिरायची आवड आहे असे जाणवले कारण त्यांनी बरच काही बघितलय, त्यावर आम्ही खूप काही बोललो.. त्या म्हणल्या होत्या मला कि प्रत्येकांनी कामाशिवाय अजून एक छंद जोपासला पाहिजे ,त्यातच खरा आनंद मिळतो.. मला ते मनोमनी पटलं होतं.. ते उन्हाळ्याचे दिवस होते.. आणि त्यांच्या हातचा आमरस म्हणजे D best आमरस of season असाच काहीसा होतं.. :) त्या काळात मी नवीन नोकरीच्या शोधात होते ,मला hsbc लवकरात लवकर सोडायची होती.. सगळे म्हणत होते market चांगलं आहे पण मला मात्र काही खास offers मिळत नव्हत्या.. माझ्या नोकरीशी खरतर काकूंचा काहीच संबंध नव्हता पण निघताना त्यांच्या पाया पडले तेव्हा नकळत मी म्हणून गेले कि मला त्यांचा आशीर्वाद हवा आहे.. त्यांनी मला आशीर्वाद तर दिलाच आणि त्यासोबत त्यांच्या बागेतलं सुंदर मोगऱ्याच फुल दिलं.. आयुष्यात इतकी सुंदर भेटवस्तू मला कोणीच दिली नसावी बहुतेक.. मी जाम खुश होते त्या दिवशी.. ते फुल आता जरी वाळल असलं तरी माझ्या diary मध्ये मी अगदी जपून ठेवलय .. आणि काय सांगू तुम्हाला,या भेटीनंतर काही दिवसातच infosys मध्ये माझी निवड झाली.. त्या क्षणी मी काकुंचे मनातून खूप खूप आभार मानले.. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता याची जाणीव झाली..
सध्या मात्र त्या काकूंशी माझा अजिबात संपर्क नाही.. एकतर त्यांचा दूरध्वनी क्रमांक माझ्याकडे नाहीये आणि मिळाला तरी खास phone करून बोलण्यासारखं आमचं नात नाही मुळी.. आम्ही यापुढे कधी भेटू कि नाही माहिती नाही पण माझ्या मनात त्यांची आठवण कायम येत रहाते.. कदाचित त्यांना कल्पनाही नसेल कि या पृथ्वीतलावर कोणी एक मुलगी त्यांची आठवण काढते म्हणून.. :)

कोणी म्हणलं आहेना..
कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते..
कहीं से निकल आए, जनमों के नाते..

रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०

सुदाम्याचे पोहे-3

सुचित्रा जोशी-
ती आणि मी hardly दोनवेळा भेटलो असू.. तेव्हाही भेटल्यावर फारशा गप्पा झाल्या नव्हत्या.. असच कवितांवरून आमचे mails-mails झाले आणि कळलं कि आमच्या आवडी निवडी खूप जुळतात .. वाचनाची आवड,कविता,लेख,गाणी,निसर्ग आणि ngo!!!! आणि infy मधला तो लाकडी पूल सुधा आम्हा दोघींना जम आवडतो.. तिचे लेख अप्रतिम असतात.. आणि ती भरतकाम सुंदर करते + पाककलेत कुशल आहे असं ऐकलय..
खरतर मला एव्हढीच माहिती आहे तिची अजून नक्कीच बऱ्याच गोष्टी असणार ..
आमचा फक्त mails thr contact असला तरी खूप जवळची वाटते ती.. तिचं ghar/office काम सांभाळून माझे mails आवर्जून वाचते.. नुसता वाचून सोडून देत नाहीतर प्रोत्साहन देते नेहमी.. आणि थोडे दिवस माझा mail नाही आला कि स्वताहून विचारते याचं मला फार कौतुक वाटतं कारण आजकाल कोणाकडे वेळ असतो एव्हढा.. आणि खरतर माझं काहीही झालं तरी तिला काहीही फरक पडणार नाहीये.. पण तीचा caring स्वभाव आहे आणि मन मोठा आहे त्यामुळे माझे updowns तिला लगेच समजतात.. तुझे आभार मी कसे मानू?

सुदाम्याचे पोहे-2

आरती देशमुख –
ती खरतर माझ्या नातेवाईकांपैकी आहे पण आमचा नातं काहीसं खास आहे.. ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे जरी मी तिला ती म्हणत नसले.. ;) ती खूप वर्ष USमध्ये आहे त्यामुळे पूर्वी कधीतरी आम्ही एकदा भेटलो होतो,बास.. पण साधारण 1.5 वर्षापूर्वी orkut through आमचा संपर्क झाला .. मग मी माझ्या कविता तिला पाठवू लागले आणि मग आमचे सूर जुळले.. तिच्या कविताही छान आहेत आणि ती खूप सुंदर गाते.. am her gr8 fan.. आम्ही आधीतर फक्त mails frds होतो.. मागच्या वर्षी तिच्या india tripमध्ये family gettogether होतं तेव्हा तिने मला आवर्जून बोलावलं होतं.. त्या दिवशीच officemadheमध्ये थोडे issues झाले होते पण आरतीला भेटून सगळ्याचा विसर पडला होतं हि गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही..
आरती दूर असूनही माझा मन नीट जाणू शकते.. ती USमध्ये job/घर सांभाळून माझे mails वेळ काढून वाचते.. कधी संपर्क साधला नाही मी तर चौकशी करते.. तिच्याकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळतं.. तिला आलेल्या अनुभवावरून ती जे शिकली ते नेहमी मला सांगते .. माझा कुठे चुकत असेल किवा मला मार्ग मिळत नसेल तर ती नेहमी मार्गदर्शन करते.. तिच्या शुभेच्यांचा मला नेहमीच आधार असतो.. तुझे आभार मी कसे मानू?

सुदाम्याचे पोहे-1

प्रियांका स्वादी –
२००५ मध्ये hsbc ची कारकीर्द सुरु झाली ..सुरुवातीपासूनच कोथरूड bus प्रकरणात मी सहभागी होते आणि पहिल्या बसमध्ये तिची ओळख झाली .. योगायोगाने आम्ही एकाच मजल्यावर बसायचो.. हळू हळू मैत्री इतकी वाढली कि प्रियांकासाठी माझ्या जवळची जागा मी खास पकडून ठेवायचे.. madam दर मंगळवारी गणपतीला न चुकता जायच्या हि गोष्ट मला फार भावली कारण मीपण तशीच थोडीफार.. प्रियांका एक हुशार ,सुंदर आणि इतका असून कसलाच माज नसलेली मुलगी .. GRE,piano class,foreign lang class, exams.. मला नेहमीच कौतुक वाटायचे कि office + हे सगळं ती कसं सांभाळते.. शिवाय ती कविता /लेख छान लिहिते हे मला जरा उशिरा कळलं.. नंतर MS करायला ती USla geli.. तिथे जायच्या आधी आणि नंतरच्या प्रत्येक india trips मध्ये प्रियांका मला नेहमी आवर्जून भेटली.. ‘वेळ नाही’ असं कारण तिने कधीच सांगितलं नाही.. तिच्या लग्नात नाशिकला आम्ही धमाल केली होती.. सध्या ती कॅलिफोर्निया मध्ये वास्तव्यास आहे..
आमचा सहवास खरतर hardly ६महिने होता .. पण ती तिकडे जाऊनही नेहमीच माझ्या संपर्कात आहे .. सध्या ती तिचं घर ,office या सगळ्यात व्यस्त असते.. पण माझा प्रत्येक mail आवर्जून वाचते .. एखादा दिवस मी काही नाही लिहिलं तर स्वताहून विचारते कि काय झालं.. तिथे USमध्ये बसूनही आणि विशेष म्हणजे मी काही न सांगता तिला माझा काही बिघडलंय का किवा मी काय prbs face करते हे सगळं नीट कळत.. माझा तोल जायला लागला कि ती माझ्याहून वयाने लहान असूनही मला खूप छान समजावते .. तुझे आभार मी कसे मानू ?

सुदाम्याचे पोहे

आपल्या जीवनात कितीतरी वेगेवगळ्या व्यक्तिमत्वाचे लोक येत असतात .. काही जवळचे , काही परके... काही जीव लावतात तर काही मन तोडतात.... नातेवाईक , मित्र मंडळी , collegues या व्यतिरिक्त सर्वांच्या आजूबाजूस काही खास व्यक्ती असतात त्या म्हणजे ‘angels’.. ते ‘friends’ पेक्षा थोडे वेगळे असतात.. माझ्या मते ‘friends’ म्हणजे आपण एकमेकांच्या सुखदुखाच्या क्षणात सहभागी होतो.. पण ‘friends’ लोकांना आपण सगळं सांगतो मग काही जण समजून घेतात काहीना समजत नाही .. तसं ‘angels’ म्हणजे ज्यांना आपण काही न सांगता आपल्या मनात काय चाललाय हे ते नीट समजू शकतात .. आपल्या हातून काही चांगलं घडलं तर ते मोकळेपणाने कौतुक करतात आणि काही बिनसलं तर लगेच धीर देतात .. या नात्यात काहीच व्यवहार नसतो ,राजकारण नसतं ,अपेक्षा नसते ,स्वार्थ नसतो .. शुद्ध निखळ नातं म्हणतात न ते हेच असावं.. मला नेहमीच वाटतं कि अशी काही लोकं देवाने खास प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवलेले असतात .. 'सुदाम्याचे पोहे' या लेख मालिकेत मी अशाच काही माझ्या आयुष्यातील ‘angels’ बद्दल बोलणार आहे .. 'सुदाम्याचे पोहे' हे शीर्षक देण्यामागे एव्हढाच अर्थ अभिप्रेत आहे कि या लोकांनी मला खूप अनमोल क्षण दिले आहेत आणि मी त्यांचे आभार या माझ्या मोडक्या तोडक्या शब्दातून मानायचे प्रयत्न करीत आहे.. काही कमी जास्त झाले असल्यास समजून घावे हीच नम्र विनंती..

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

इकडच्यांना वाटतं मी तिकडच्यांची..
तिकडच्यांना वाटतं मी इकडच्यांची..
म्हणलं तर मी नाही कोणाची..
म्हणलं तर मी आहे सर्वांची..

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - 4

कोकणात निसर्गाच्या कुशीत अनेक मंदिरांमध्ये जायचा योग आला.. एका मंदिरात गेले असता कसल्या तरी विचारात मी गाढले होते.. तेव्हढ्यात तिथले पुजारी म्हणाले इथला देव जागृत आहे.. हे जागृत देवस्थान आहे, तुमची मनापासूनची जी इच्छा असेल ती बोला,पूर्ण होईल.. मी बर म्हणलं आणि एकदम ‘blank’ झाले.. :)
काय मागू देवाला? मला काय पाहिजे ते माझ्यापेक्षा त्यालाच नीट माहिती आहे.. आणि मी अम्क अम्क मला दे म्हणलं तर त्यात मी नक्की किती सुखी होणार आहे आणि ते सुख किती दिवस टिकणार आहे? जर मी भलतीच गोष्ट मागितली तर त्याने जीवनात जे अध्याय आधीच लिहून ठेवले आहेत ते काही बदलातील का.. खरतर देवावर मझा पूर्ण विश्वास आहे.. पण देवाकाडे काय मागावं हे आता कळेनासं झालय .. कुठली गोष्ट मागू देवाला की ती मिळाली की मला बास,अजुन काही नको असं वाटेल? माझ्या जवळच्यांपैकी एका व्यक्तीने माझा 'अत्रुप्त,असंतुष्ट,अशांत आत्मा’ असं अचूक वर्णन केलं आहे.. आणि मी अगदी 100% सहमत आहे कारण मी खरच कोणी साधू संत नाहीए.. आपण सगळे अर्जुन नाहीका.. म्हणून ‘मन शांत व्हावं’ अशी प्रार्थना करावी वाटली.. आयुष्यात जे चढउतार येतील त्यास धैर्याने आणि आनंदाने तोंड देता यावं इतकी मनाची शक्ति दे मला अशी मी मनोमनी प्रार्थना केली.. बाकी जो जे वांछील ते तो लाभो ,प्राणिजात!!! बास अजुन काय.. :))

मंतरलेले दिवस - 3

हितगुज सागराशी.. :)

ती - हे विशाल सागरा.. केव्हढा हा तुझा पसारा.. तुला किती पाहून घेऊ असं होतंय मला.. दुर् दूरपर्यंत तुझा ठाव लागत नाहीये.. ते आकाश आणि तू दूरवर एक झाल्यासारखे दिसत आहात .. सूर्याचा लाल गोळा तुझ्या कुशीत येऊ पाहतोय बघ .. आणि या तुझ्या असंख्य लाटा .. हातात हात धरून स्वछंदपणे खेळत आहेत .. उंच उसळी मारून पुन्हा तुझ्यात विलीन होत आहेत .. त्यांचा आवाज मला तुझ्याकडे खेचून घेत आहे.. त्यांचा फेसालालेलं रूप मनात साठवून घ्यायचा वेडा प्रयत्न मी करत आहे ..
एक गम्मत सांगू तुला .. तुझ्या एव्हढ्याच ,तुझ्या सारख्याच माझ्याही मनात विचारांच्या अफाट लाटा उसळतात .. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र या वैचारिक लाटा अविरतपणे काम करत असतात .. आणि त्यामध्ये कधी मोती शिंपले सापडतील तर कधी भयंकर प्राणी देखील असू शकतील .. पण पण.. पण एव्हढाच फरक आहे आपल्यात.. तुझ्या लाटांना 'किनारा' आहे.. त्या किनाऱ्यापाशी तृप्त होऊन परत आत जातात आणि पुन्हा किनार्‍याच्या ओढीने बाहेर येतात.. माझा तसं नाही बुवा.. माझ्या भावनांना,माझ्या विचारांना अजुन तरी कुठे किनारा नाही.. ते स्वतहत्च उगवतात आणि स्वतहतच मावळतात.. मिळेल त्या दिशेला त्या वाहत जातात आणि वाट हरवल्यावर बावरून जातात.. तुझं अंतकरण मोठं आहे ना,तू सगळ्याना सामावून घेतोस.. तसं मलाही घेना.. तुझया लाटांमधे माझ्या भावनाना एकरूप करून घेना.. तुझ्या खार-या पाण्यात माझ्या आसावांना थोडी जागा मिळेल ना..

तो – खरय, तुझ्या मनातले विचारांचे वादळ अगदी माझ्या लाटांच्या तोडिस तोड आहेत.. पण सखे,अशी निराश होऊ नकोस.. जिथे भावनांचा उगम होतो तिथे किनारा नक्कीच असतो.. कदाचित अंतर जास्त असल्याने तुझ्या दृष्टीस पडत नसावा.. इतक्यातच धीर खचून देऊ नकोस.. लवकरच तुझ्या आभाळात तुझा चंद्र उगवेल आणि तुझ्या विचारांना,भावनांना,स्वप्नाना उचित किनाऱ्याची दिशा दाखवेल..

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

28-09-10

SAPNE ZARUR DEKHO.. PAR SAPNE PURE HONE KI SHART MAT RAKHO...!!!

11-10-10

Let thy will be done!

Monday, October 11, 2010 11:15 AM


Reference: AOL

Most of us come into this world with the seed in us, "It's not OK". And all our life we try to correct events, people and situations. How much can you correct? It's like trying to rearrange the clouds in the sky. This seed does not allow you to be happy, to smile from your heart, to be loving and loveable. It's there all the time like a thorn - irritating, irritating.

This seed, "It's not OK," brings you back into this world again and again. How do you burn this seed?

1.First recognize that it is there. This can happen in deep introspection and meditation.
2.Sometimes you feel your body, mind, intellect, memory and ego are also not OK. You justify them or find fault with them. These are also part of the world. Acknowledge what you see as an imperfection and offer it to the Divine. (Am at this stage!)
3.Have faith in the infinite organizing power of the Supreme Intelligence and have the sincere feeling, "Let thy will be done." Then the seed, "It's not OK," gets burned. "Thy will be done" is a state of total contentment, a state of just love.

28-10-10

Sometimes I think to myself and then I feel that..



सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी..
सचहै दुनियावालों कि हम हैं अनाड़ी...



Hmm.. असो. They say.. "If God brings you to it, He will bring you through it"

26-10-10

I am LOVE.. I am TRUTH.. I am BLISS..

I have EFFORTS.. I have TRUST.. I have PRAYERS..

I want KNOWLEDGE.. I want PATIENCE.. I want PEACE..

________________________________


I am nothing.. I owe nothing.. I want nothing..

Sounds gr8!!! :-)

________________________________

27-10-10

When i win the game, i say..



जो जीता वही सिकंदर.. :-)



When i loose the game, i say..



हारके जीतने वालोंको कहते है बाज़ीगर.. ;-)



The bottom line is..



कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है..
जीवन का मतलब तो आना और जाना है..

Oopppssss.. total filmi.. :))

02-11-10

The fastest way to get depressed is to think like "what about me???" "मेरा क्या होगा???" Oopss..

The fastest way to get happy is to think like "how can i help u.." "मे आपकी क्या सेवा कर सकती हू.." :-)


"हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा!!!"

आदर्श कोणाचा..

सध्या आदर्श सोसायटी प्रकरण सगळ्या वाहिन्यांवर अगदी breaking news म्हणून झळकत आहे.. त्यात हळू हळू एकेका मत्र्यांच्या नावांची भर पडून राजकारणाचं पितळ उघडं पडत आहे .. हे तर एक उदाहरण आहे .. अशा कितीतरी बातम्या येतात आणि जातात , त्याचं पुढे काहीही होत नाही .. खरंतर मला politics मध्ये बिलकुल रस नाहीये .. पण अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्यावर नेहमीच वाटतं कि हे सगळे राजकारणातले लोकं एका माळेचे मणी कसे काय आहेत .. इथून तिथून तशीच लोकं , मग पक्ष कोणताही असो .. छोट्या छोट्या कार्यालयापासून देशाच्या पातळीपर्यंत अगदी सगळीकडे गच्च भरलेले 'curruption'.. आपण लहानपणी गोष्टी ऐकायचो त्यात ' शिवाजी महाराज , स्वातंत्रवीर सावरकर , साने गुरुजी , स्वामी विवेकानंद ' असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आदर्श व्यक्तींच्या कथा असायच्या .. पण आपण आपल्या पुढच्या पिढीसमोर कोणाचे आदर्श ठेवणार आहोत ? साधा सरळ माणूस सध्या मागो पडतोय आणि political view असलेला माणूस स्पर्धेत टिकून राहतोय.. मोठ्या लोकांचं सोडा पण काहीजण नात्यात,मैत्रीत राजकारण खेळतातना तेव्हा मनाची खरच घालमेल होते.. आजकाल चुकीच्या मार्गाने जाणार्या लोकांवर कोणाचाच अंकुश राहिला नाहीये,जो ज्याला मनात येईल तसं वागतो.. तर मग हे असा किती दिवस चालणार ? पूर्वीच्या काळात कितीतरी थोर संत आणि पराक्रमी व्यक्ती होऊन गेले मग या आताच्या युगात अशी एकपण व्यक्ती का बरं नाही ? आणि जर असेल तर त्यांचा सहवास सर्व सामान्य लोकांना कसा आणि कधी लाभणार?

अशावेळेस गीतेचा हा प्रसिद्ध श्लोक राहून राहून आठवतो..


यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भावतिभारत
अभ्युत्थानंहि अधर्मस्य
तदात्मानंसृजाम्यहम

Meaning- Whenever and where ever there is decline and decay of righteousness,O Bharatha, then I (Lord Vishnu)manifest myself. In all such dark periods of history, some great master comes to present himself as the leader of men to revive the standard of life and moral values.

आली दिवाळी..

हा निबंध नव्हे बरका.. :-)

या mail ला जोडलेले छायाचित्र पहाना.. दोघं बहिण भाऊ किती मन लावून किल्ला बांधत आहेत.. ते बघून मला माझे लहानपणीचे दिवाळीतले दिवस आठवू लागले .. आमचं बालपण पुण्यात ncl जवळ iitm colony मध्ये गेलं .. त्या काळी university-pashan रस्ता हा खूप शांत परिसर होता .. आमची colony अगदी ऐसपैस सुंदर ,स्वच्छ होती .. घराला खूप मोठं अंगण आणि बाग होती ..
त्यावेळेस आमच्या वयाचे खूप सारे मुलंमुली colony मध्ये होते त्यामुळे गणपती उत्सव ,दिवाळी ,कोजागिरी वगैरे सगळे सण मिळून उत्साहाने साजरा करायचो.. दिवाळीतला किल्ला हे एक मोठे आकर्षण असायचे.. दादाच्या मित्रांमध्ये किल्ला कोण जास्त चांगला करणार याची स्पर्धा असायची .. जशी दिवाळीची चाहूल लागे तसं आपला किल्ला सगळ्यांपेक्षा खास होण्यासाठी काहीतरी नवीन तंत्र वापरायचं असे विचार दादा लोकांच्या मनात रेंगाळू लागायचे .. Colony च्या मागे बऱ्याच टेकड्या होत्या .. (पंचवटी sosc +वेताळ टेकडी माहिती असेलना!).. तर किल्ल्यांची माती आणण्यासाठी दादासोबत आम्ही बहिणी टेकडीवर जायचो .. तिथून माती ,विटा ,cement वगैरे घेऊन यायचो .. दादा किल्ल्याचा पाया,बांधणी करायचा आणि आम्ही त्याला पाणी आणून देणे वगैरे चील्लुपिल्लू कामं करायचो .. किल्ल्याचे बुरुज ,शिवाजी महाराजांचं खास सिंहासन आणि पायऱ्या या गोष्टी तर मला ठळकपणे आठवतात.. किल्ल्यासोबत आजूबाजूला शेती ,नदी , पूल ,कारंजं ,वस्ती, कुंपण इत्यादी गोष्टीनी किल्ला अजून उठावदार करण्यात दादा तरबेज होता.. सगळं होत आलं की त्यावर मोहरी नाहीतर आळीव पेरल्यावर दोन दिवसात हिरवेगार दिसायला लागायचा.. किल्ल्याला भेगा पडू नये म्हणून किती काळजी घावी लागायची..
किल्ल्याचं सगळं काम झालं की संध्याकाळी हळु हळु खेळणी ठेवायची.. शिवाजी महाराज,मावळे, गायी,गवळणि,सरदार ,शेतकरी वगैरे मस्त मस्त खेळणी वर्शोन वर्ष जपून ठेवलेली असायची.. किल्ला मावळ्यानि सज्ज झाला की आम्ही शेजारी रांगोळी काढून सजवायचो आणि आई दिवा लावून ठेवायची.. रात्री दिव्याच्या प्रकाशात किल्ला फार सुरेख दिसे.. त्या काळात Digital कॅमरा नव्हता नाहीतर किती photos काढले असते.. आणि दिवाळी संपली की किल्ल्यामधे एक मोठा सुरुंग लावून द्यायचा..
आता वाटतं की दिवाळी हा सण ख-या अर्थाने लहान मुलांचाच असतो.. किल्ला बनवायचा,आकाशकंदील लावायचं,फराळाला आईला मदत करायची,तास अन् तास रांगोळ्या काढायाच्या,नवीन कपडे घालून मिरावायचे,भरपूर फटाके उडवायचे आणि काय काय.. हल्ली दिवाळी म्हणजे खाणं पिणं आणि झोपा काढणं अशी व्याख्या होत चालली आहे.. फार तर फार एखादा दिवाळी पहाटेचा कार्यक्रम.. ;-) कदाचित ही एक phase असेल आयुष्याची.. पुढे एकाचे दोन झाले की ती पहिली दिवाळी खास.. अन् मग दोघांचे चार झाले की पुन्हा बालपणात शिरून दिवाळी नव्या उत्साहाने साजरी होत असावी.. :))