सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

सुदाम्याचे पोहे-4

त्या काकू..

त्या काकुंसोबत माझी पहिली भेट एका लग्न सभारंभात झाली.. पहिल्याच भेटीत माझा हात हातात घेऊन काकू अत्यंत प्रेमाने बोलल्या होत्या कि जणू आम्ही फार पूर्वीपासून एकमेकींना ओळखत आहोत.. तसं पाहिला गेलं तर अनोळखी व्यक्तींशी मी पटकन मोकळी होत नाही..सुरुवातीला मी जरा शांतच असते.. पण काकूंच्या बाबतीत मात्र वेगळच घडलं.. आम्ही खूप छान गप्पा मारल्या त्या दिवशी,लग्न सोहळा आनंदाने मिळून पाहिला ..
नंतर एका कामा निम्मित्त त्यांच्या घरी जायचा योग आला.. सुरुवातीला मला वाटत होता काकू माझ्याशी कशा बोलतील ,त्यांना मी आठवेल का वगैरे.. पण त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी अगदी मनापासून माझी विचारपूस केली.. त्यानाही माझ्यासारखी फिरायची आवड आहे असे जाणवले कारण त्यांनी बरच काही बघितलय, त्यावर आम्ही खूप काही बोललो.. त्या म्हणल्या होत्या मला कि प्रत्येकांनी कामाशिवाय अजून एक छंद जोपासला पाहिजे ,त्यातच खरा आनंद मिळतो.. मला ते मनोमनी पटलं होतं.. ते उन्हाळ्याचे दिवस होते.. आणि त्यांच्या हातचा आमरस म्हणजे D best आमरस of season असाच काहीसा होतं.. :) त्या काळात मी नवीन नोकरीच्या शोधात होते ,मला hsbc लवकरात लवकर सोडायची होती.. सगळे म्हणत होते market चांगलं आहे पण मला मात्र काही खास offers मिळत नव्हत्या.. माझ्या नोकरीशी खरतर काकूंचा काहीच संबंध नव्हता पण निघताना त्यांच्या पाया पडले तेव्हा नकळत मी म्हणून गेले कि मला त्यांचा आशीर्वाद हवा आहे.. त्यांनी मला आशीर्वाद तर दिलाच आणि त्यासोबत त्यांच्या बागेतलं सुंदर मोगऱ्याच फुल दिलं.. आयुष्यात इतकी सुंदर भेटवस्तू मला कोणीच दिली नसावी बहुतेक.. मी जाम खुश होते त्या दिवशी.. ते फुल आता जरी वाळल असलं तरी माझ्या diary मध्ये मी अगदी जपून ठेवलय .. आणि काय सांगू तुम्हाला,या भेटीनंतर काही दिवसातच infosys मध्ये माझी निवड झाली.. त्या क्षणी मी काकुंचे मनातून खूप खूप आभार मानले.. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता याची जाणीव झाली..
सध्या मात्र त्या काकूंशी माझा अजिबात संपर्क नाही.. एकतर त्यांचा दूरध्वनी क्रमांक माझ्याकडे नाहीये आणि मिळाला तरी खास phone करून बोलण्यासारखं आमचं नात नाही मुळी.. आम्ही यापुढे कधी भेटू कि नाही माहिती नाही पण माझ्या मनात त्यांची आठवण कायम येत रहाते.. कदाचित त्यांना कल्पनाही नसेल कि या पृथ्वीतलावर कोणी एक मुलगी त्यांची आठवण काढते म्हणून.. :)

कोणी म्हणलं आहेना..
कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते..
कहीं से निकल आए, जनमों के नाते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: