गुरुवार, ३० जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ११

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 11: 15th June,11

Driaphuk ->
Zuthulphuk (4790 Mt.)

पहाटे ३ वाजता wake-up call.. परीक्रमेताला आजचा टप्पा महत्वाचा..  टेंट मध्ये रात्रभर थोडी थंडी वाजून आल्या सारखं मला होत होतं.. पण उठल्यावर एकदम ताजेतवाने वाटले.. टेंट बाहेर आल्या आल्या कैलासाचे दर्शन.. थोडे ढग जमा झाला होते तिथे,फार सुंदर दिसत होते ते शिखर.. लगेचच नाश्ता.. दुपारच्या जेवण पार्सल दिली गेले.. त्यात सफरचंद, फ्रुटी, बिस्किट्स, चॉंकलेट असे होते.. परिक्रमेच्या मध्ये बाकी जेवण्याची व्यवस्था नव्हती..
काल रात्री झोपायच्या आधी भीम भय्या पुन्हा घोड्याचे बोलायला आला होता.. म्हणला उद्याचा दोलामा पास खूप कठीण आहे.. बरेचजण आज चाललेले उद्या घोडा करणार आहेत,बघ उद्या सकाळपर्यंत विचार कर आणि घोड्याने जा.. बघ तुझ्यामुळे बाकी ग्रुपला त्रास  नको वगैरे वगैरे.. पण मी घोड्याला नाहीच म्हणले..
काल रात्रीपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकू कि नाही हे निश्चित नव्हते.. हिमवर्षावामुळे पुढे रस्ता मिळेलना शंका होती.. त्यामुळे कदाचित इथून परतावेही लागले असते.. पण आता आभाळ स्वच्छ होते..
लोहगावकर काका, करवा काका, मुन्ना भाई असे आम्ही सगळे ५ वाजता चालायला सुरुवात केली.. निघताना भीम भय्या घोड्याचं विचारायला आला आणि मी परत नाही म्हणले.. तो जरा रागावूनच मला all d best  म्हणला.. आणि म्हणला एकटी पुढे पुढे पळू नकोस,कोणी उचलून नेले तर.. मी बर म्हणले.. :)
सकाळचं उत्साही वातावरण होतं.. पण बोचरं थंड वारं जाणवत होतं.. आता इथून पुढे बराच चढ होतं.. आणि उन्चीपण जास्त होती त्यामुळे दम लवकर लागत होता..  नदीचे खळखळत वहाणे चालू होते.. ही कुठली नदी होती माहिती नाही पण कैलास पर्वतातून ४ नद्या उगम पावतात.. ब्रम्हपुत्रा, सतलज, इंडस(सिंधू) आणि  कर्णाली नदी..  कैलास पर्वत मध्यवर्ती आहे आणि या चार नद्या जगाच्या ४ विभागात वाहतात.. असं  म्हणतात कि कैलास पर्वत crystal, gold , ruby  यापासून बनलेला आहे..
कुठे चढ, कुठे उतार.. कुठे दगडातून रस्ता काढावा लागे कुठे सपाट होता.. कुठे नदीवर छोटी लाकडी फळी ठेवलेली असायची त्यावरून सावकाश जावे लागे तर कुठे नदीतून मोठ्या दगडांवर पाय ठेवून शूज मोजे न भिजवता जावे लागायचे.. कुठे उन्ह तर कुठे सावली.. चालता चलता मला वाटलं आपलं आयुष्यही एक परिक्रमाच आहे जणू.. कधी सोपी कुठे बिकट वाट.. पण आयुष्याचे अंतिम ध्येय तो परमेश्वर.. तो सतत समोर असतो.. त्याच्याकडे पाहत गेले,त्याचे नाम घेत गेले कि परिक्रमेचा त्रास जाणवत नाही..  त्याच्यावर शुद्ध निर्मळ मनाने श्रद्धा ठेवली की तो योग्य रस्ता दाखवतो.. :)
घोड्यांवरून आमच्या ग्रुप मधली मंडळी जाताना हात दाखवून 'ओम नमः शिवाय' म्हणून जायची.. तिथे गेल्यापासून कोणाशीही  hi /hello  न म्हणता 'ओम नमः शिवाय' म्हणून संभाषण सुरु होत असे.. कुठे कुठे वाट अगदी छोटी होती,एकावेळेस एकच जाऊ शकेल अशी.. या ठिकाणी आम्ही दोन तीन जणींना घोड्यावरून पडताना पहिले.. खाली दगडं असल्याने त्यांना बरंच लागलं.. मलातर चालण्यापेक्षा घोडा प्रकरण अवघड वाटले..
बरेच तिबेटीयन लोक जाताना दिसत होते.. ते फारच जोरात चालत होते,त्यांना उंचीचा त्रास बिलकुल होत नव्हता.. त्यांच्यात बराच young  crowd  असायचा अगदी कॉलेजचा ग्रुप वगैरेही दिसायचा.. काहीजण लहान मुलांना पाठीवर घेऊन चालायचे.. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असायचे आणि सर्वांच्या हातात जपमाळा.. त्यांच्यापैकी कधीच कोणीच दमलेला दिसलं नाही.. 'hello ' म्हणून ते झटपट चालत पुढे निघून जायचे.. त्यांच्यापैकी काहीतर चक्क लोटांगण घालत परिक्रमा करत होते हे पाहून आम्ही आवक झालो.. या लोकांकडे फक्त पाणी जवळ होते,बास..
माझा स्पीड आता बराच हळू होता.. लगेचच थांबावे लागत होते.. मुन्ना भय्या सतत उत्साह येईल असं बोलून प्रेरणा देत होते.. अशा रीतीने आम्ही ३ डोंगर पार पाडले.. आम्हाला वाटलं होत आलं आजचं तर आताशा डोलमा पासचा चढ दिसू लागला.. इथे सर्वत्र बर्फ होता.. बर्फाच्या डोंगरावरून चढत चढत उंचीवर जायचे होते.. इकडे अक्षरशः २ पावले चालले की दम लागत होता.. मी तर ५ ५ मिनिटाला बसत होते.. या चढावर खुपदा घसा कोरडा झाला आणि बरंच ग्लुकोज/इलेक्ट्रोल ढासावे लागले.. इतके दिवस डोलमा बद्दल बरंच वाचलं आणि ऐकलं होता ते खरं कसं अन  काय आहे ते आता जाणवत होते.. हळू हळू चालत देवाचे नाव घेत शेवटी आम्ही डोलमा पासला वरती पोहचलो.. 
तिबेटी भाषेत या स्थानाला डोलमा, तर हिंदू धर्मात तारादेवी शक्तीपीठ म्हणतात.  येथून कैलासाचे पूर्वमुखाचे दर्शन होते.. हे समुद्रसपाटीपासून १९०००  कि.मी. उंचीवर आहे.. अति उंचीमुळे प्राणवायूचे प्रमाण इथे कमी असते त्यामुळे वरती जास्तवेळ थांबता येत नाही.. आणि अति थंडी.. म्हणून आम्ही लगेचच खाली उतरायला सुरुवात केली..  आता ७km  उतरण होती..  या उतारावर घोडे जात नाही, हे ७ किमी सर्वाना चालतच जावे लागते.. उतरताना  उजव्या बाजूला दरीत पवित्र गौरीकुंड दिसू लागले.. पार्वती देवीचे ते कुंड अप्रतिम आहे.. तिथे गणपती बाप्पाचा जन्म झाला असे म्हणतात..
सह्याद्रीत धो धो पावसात ट्रेकिंग केले असल्याने चढ उताराची किवा चिखल, पाणी, निसरड्या वाटेतून चालायची भीती मला कधीच वाटली नाही... अर्थात त्यासाठी शूजपण चांगले हवे.. आणि वजन कमी असल्याने जवळ जवळ पळत पळत उतरता आले.. बऱ्याच जेष्ठ नागरिकांना ही उतरण फार अवघड गेली.. थोडा पुढे गेल्यावर कैलास पर्वत दिसेनासा झाला.. म्हणजे तो उजव्या बाजूलाच होता पण त्याच्या पुढे आमच्या मध्ये एक पर्वतांची रांग सुरु झाली होती..
खाली उतरल्यावर पुन्हा बर्फाचा समतल रस्ता लागला.. आणि तिथे चालता चालता snowfall सुरु झाला.. पोचू काढण्या इतका नव्हता, आम्ही मस्त बर्फात एन्जोय करत गेलो.. मग  पुढे एक टेंट वजा हॉटेल लागले.. तिथे पोहचल्यावर केळकर काका स्वागत करायला थांबले होते,त्यांनी सर्वांचा अभिनंदन केले.. तेव्हा भयानक आनंद झाला होता आम्हा सर्वाना.. डोलमा पास झालं,मोहीम फत्ते झाली.. बरयापिकी परिक्रमा पूर्ण झाल्यासारखी होती इथे.. थोडं खाऊन पिऊन आम्ही लगेचच पुढे निघालो.. आता केळकर काका, अनिकेत, श्रोत्री काका, कुलकर्णी काका अशी बरीच मंडळी सोबत होती.. इथून पुढे सगळा रस्ता सपाट  होता.. पण खुपदा दगडांमधून आणि पाण्यातून चालत जावे लागत होते.. आता मध्येच पाऊस आणि मध्ये उन्ह असा खेळ चालू होता.. शेर्पाने निघताना सांगितले होते नदीला follow  करत जा पुढे आपले टेंट दिसतीलच तुम्हाला.. पण किती चालूनही ते टेंट काही दिसेना.. नंतर नंतर थंड वाऱ्याचे प्रमाण वाढले.. आणि patience  कमी होत गेला..  डोलमा पास नंतर एव्हढ का चालायचं..टेंट जवळच का उभारल्या नाही असे वाटत होते.. प्रत्येक ठिकाणी वाटायचं या वळणाच्या पुढे गेला कि टेंट दिसतील पण छे.. सभोवताली पर्वत.. शेजारी डावीकडून नदीचा प्रवाह बास बाकी काही दिसत नव्हतं..  मुन्ना भाई कंटाळा जावा म्हनून गमतीजमती सांगत होते.. या  दिवसात मला जाणवले कि मुन्ना भाई आणि केळकर काका यांना देवाने माझ्यासाठी खास या यात्रेमध्ये पाठवले होते.. दोघांनी माझी खूप काळजी घेतली,त्याबद्दल मी खरच त्यांची ऋणी आहे.. शेवटी मग दूरवर आम्हाला टेंट दिसल्या आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.. अशा रीतीने आम्ही सकाळी ५ला निघालेलो संध्याकाळी ६.४५ वाजता टेंट पाशी zuthulphuk येथे पोहचलो.. आज आम्ही एकूण २४ किमी  चाललो होतो..
इथे टेंट अगदीच नदीच्या काठी होत्या आणि आमचा टेंट तर नदीशेजारीच.. रात्रभर नदीचा खळ खळ आवाज कानात घुमला..  तिथे गेल्यावर बाहेर अति थंडीमुळे कोणीच नव्हते,सगळे टेंट मध्ये आराम करत होते.. मीपण थोडे फोटो काढून लगेच टेंट मध्ये गेले.. आल्या आल्या शेर्पाने  गरम गरम चहा आणि नंतर लगेच सूप दिले.. स्मृती काकू आधीच घोड्यावरून आल्या होत्या फारच दमल्या होत्या.. शेजारच्या टेंट मधून काही काकुनी आलीसकाग असे विचारले.. मी मात्र जाम खुश होते आणि ताजीतवानी होते,डोलमा पास झाल्यामुळे.. :) नंतर भीम भय्या,महेश वगैरे खास माझे अभिनंदन करायला आले..
आजही जेवण टेंट मध्ये केले.. एकतर टेंट नदीशेजारी असल्याने जास्तच वारे येत होते.. त्यातून आमच्या टेंटला एक मोठं छिद्र आहे हे दिसले.. पण त्या शेरपा लोकांना तरी काय करणार म्हणून आम्ही त्यावर आतून आणि बाहेरून एक कापड टाकले.. जेवण करून diamox घेऊन लगेच स्लीपिंग ब्याग मध्ये शिरलो.. पाय दुखत नव्ह्तेपण आज  इतकं चालल्याने लगेचच गाढ झोप लागली.. 

बुधवार, २९ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १०

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 10: 14th June,11

Manas Sarovar -> Driaphuk (4,890 mts)



आता हे ३ दिवस यात्रेतले सर्वात महत्वाचे होते.. पहाटे लवकर उठून अष्टपाद ,नंदी पर्वत,शेरलुग   गुफा इथे जायचे आणि नंतर मग परिक्रमेला सुरूवात करायची असा प्लान ठरला होता.. काल  संध्याकाळी यासंबंधित सूचना दिल्या गेल्या होत्या..कोणाला घोडा करायचाय,कोणाला पोर्टर पाहिजे विचारण्यात आले आणि तसे कालच बुकिंग केले गेले.. आधीतर जवळजवळ सगळेच जण परिक्रमा चालत करायच्या तयारीत होते..  पण भीम भय्या आणि महेश सर्वाना म्हणत होते इतक्या उंचीवर चालणे तुम्हाला वाटते तेव्हढे सोपे  नाहीये.. मग बरेच जण म्हणले आम्ही केदारनाथ, अमरनाथ चालत गेलो होतो  तर महेश म्हणला ते वेगळं, इथे १९००० फुटा वर  दोन पावले चालले तरी दमायला होते.. हो नाही करत काहींनी  घोडा करायचा ठरवला..
आमच्या पैकी ३/४  काका  भारी ट्रेकर्स होते.. लोहगावकर काका तर नुकतेच अन्नपूर्णा ट्रेक करून  थेट काठमांडूला कैलास मानस यात्रे साठी आले होते..  हे असे थोडे जण आणि मी चालत जाण्याच्या निर्णयावर अगदी ठाम होतो..  महेश मुंबईचा असल्याने त्याला मी सह्याद्रित  मी ट्रेकिंग केलाय हे सांगितल्यावर तो मला घोडा कर असा अजिबात म्हणला  नाही.. पण भीम भय्या मात्रा माझ्याही मागे लागला घोडा कर म्हणून.. कदाचित  तो काठमांडूचा असल्याने सह्याद्री काय प्रकार आहे  हे त्याला  माहिती नसावं किंवा  एक मुलगी म्हणून त्याचा माझ्यावर विश्वास नव्हता..
आणि ते घोडा करण्यासाठी सर्वांच्या इतके मागे लागले होतेकी त्याना नक्की कमिशन मिळणार असेल असं आम्हा सर्वाना वाटले.. त्याने मला बरेचदा सांगून पहिले  पण मी हट्टी, माझ्या  मनाने एकदा ठरवला ना  चालत जायचं  मग चालतच जाणार.. हट्टापेक्षा खरतर मला तेव्हाढ आत्मविश्वास होता.. या वयात नाहीतर मग कधी चालणार,कधी ट्रेकिंग करणार? आमच्या ग्रूप मध्ये अजुन दोन IT मधे काम करणारे होते, माझ्याहून वयाने थोडे लहान..  त्याना ट्रेकिंग मध्ये जास्त रस नव्हता, ते दोघं त्यानच्या भारी कॅमरा मधून  एक से एक फोटो काढत होते..  हे दोन तरुण सुधा घोड्याने जाणार होते म्हणून मलाही जा म्हणत होते पण मी इथे येताना चालतच परीक्रमा पूर्णा करणार ठरवून आले होते..
आता आम्हाला सॅक मधे ३ दिवस लागणारे आवश्यक तेव्हाढच समान घ्यायचे होते..  बाकी समान आता परीक्रमे नंतरच मिळणार होते..
घोड्यावर सॅक घेऊन बसायला परवानगी नव्हती.. बिजनेस वाढवण्याकरता बाकी काही नाही..
त्या लोकांना या २/३ महिन्यातच पैसे मिळतात एरवी सगळं बंद असतं ना.. म्हणून सामनासाठी  वेगळा पोर्टर  करावा लागत होता..  पोर्टर म्हणजे तिबेटीयन माणूस आपले समान घेऊन सोबत येणार..  पोर्टर नसेल  करायचा तर कमीत कमी समान जर्किनच्या खिशात ठेवा असे सांगितले गेले..  चालणार्‍या काही जणांनी सुधा ओझे नको म्हणून पोर्टर बुक केला.. त्यांचं ठीक होता ते सगळे जेष्ठ नागरिक होतेना.. मी मात्र माझं समान स्वतः स्याक मधून घायचे ठरवले,पोर्टर वगैरे काही केला नाही मी..
माहितीसाठी सांगते ३ दिवसाचे मिळून घोड्याचे १३०० युवान आणि पोर्टरचे ४०० युवान असे दर होते.. १ युवान = साधारण ७ रुपये
३ दिवस आता माझ्यासोबत स्याक मध्ये पाणी, १ न्यापकीन, गोळ्या,बिस्किट्स, ड्राय फ्रुट्स, औषधे, ग्लुकोज, कॅमेरा, टोर्च, पोचू आणि अंगावर थार्माल्स, स्वेटर , जर्किन, हातमोजे, पायमोजे, स्कार्फ, माकड टोपी हे सगळं होता..  आता आमचा प्रवास अष्टपाद ,नंदी पर्वत,शेरलुंग गुफा दिशेकडे सुरु झाला.. इकडे जाण्यासाठी वेगळे १०० युवान द्यावे लागले.. कारण हा भाग उंचीवर आहे (४९०० mt) तिथे चालत जाता येत नाही आणि हि गुफा चायना गव्हर्मेंट च्या कार्यक्रमात येत नाही म्हणे असं आम्हाला काहीतरी सांगण्यात आले..
हा रस्ता थोडा बिकट होता..  एके ठिकाणी सगळ्या गाड्या थांबल्या आणि आता इथून पुढे १ km चालायचे होते.. दुहेरी पर्वतांच्या रंग, शेजारी खेळत खेळत जाणारी नदी.. सगळा बर्फाचा रस्ता.. आताशा हिमालयातला ट्रेक खऱ्या अर्थाने सुरु झाला होता.. माझे शूज बर्फावर घसरतात का मी तपासून पहिले पण काही झाले नाही.. थोडासा चढ होता ,बाकी रस्ता तसा प्लेन होता.. त्यामुळे विशेष काही जाणवले नाही.. सगळ्यात आधी आम्ही ४/५ जण एका point वर पोहचलो तिथून कैलास आणि नंदी पर्वताचे अप्रतिम दर्शन झाले..  महादेवाच्या मंदिरात जसे पिंड आणि समोर नंदी असतो अगदी तसंच या पर्वतांची ठेवण आहे..
आणि इतके दिवस मीतरी असं ऐकलं होतं कि  कैलास पर्वत हे शंकर पर्वतींचे निवास स्थान आहे पण खरंतर इथे सगळे म्हणतात कि कैलास पर्वत म्हणजे खुद्द भोळ्या शंकराचे रूप आहे.. तुमचा विश्वास बसणार नाही पण इथून कैलास पर्वत खूप जवळून दिसत होता, त्यावर एका बाजूला २ डोळे आणि वरती तिसरा उभा डोळा इतका स्पष्टपणे दिसतो कि आमचा आवाज बंद झाला.. आणि जटापण ठळकपणे दिसतात..  एकाबाजूला ओम दिसतो.. साक्षात श्री शंकराचे नंदीसोबत सुदर्शन झाल्यावर या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले.. हा  निसर्गाचा चमत्कार का परमेश्वराची लीला समजत नाही..  कैलास पर्वत विश्वाच्या मध्यभागी आहे. त्यास मेरू पर्वत म्हणतात. 
इथून जवळच शेरलुंग गुफा - Monastery  आहे..  तिथे तिबेटी लोकांची बरीच गर्दी होती.. जवळच अष्टपाद पर्वत हे जैन धर्माचे प्रथम र्तीथकर ऋषभनाथांच निर्वाणस्थळ. आठ पावलं चढून ते कैलासात विलीन झाले म्हणून अष्टपाद पर्वत नाव दिले.. आज परिक्रमा सुरु करायची होती त्यामुळे इथे जास्त वेळ न रेंगाळता पुन्हा गाड्यांच्या दिशेने चालू लागलो.. मला नंतर कळलं कि इथे एका काकुना बराच त्रास झाला, ऑक्सिजन लावावे लागले..
आता दार्चेन वरून आम्ही बेस  कॅम्प कडे गाडीने निघालो.. मानस सरोवराच्या परिसरात फोन ची सोय नव्हती आणि चार्जिंगची सोय होती.. आणि आता इथून पुढे २/३ दिवस फोन/चार्जिंग कसल्याच सोयी मिळणार नव्हत्या त्यामुळे दार्चेनला खास फोन करण्यासाठी गाड्या थांबवल्या गेल्या.. आई बाबांशी बोलले,परीक्रमेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.. इथे आम्ही सर्वांनी  परीक्रमेसाठी काठ्या घेतल्या.. लाकडाच्या स्वस्त होय बर्याच जननी त्या घेतल्या पण मी फोल्डिंग वाली चांगली घेतली.. पुढेमागे अजून ट्रेकिंगला गेले कुठे तर नक्की उपयोग होईल म्हणून..
आता कैलासाची परिक्रमा सुरु झाली.. एकूण अंतर ५२ km आहे.. त्यापैकी १२क्म दारचेनहून तारपोचेपर्यंत १२ कि.मी. अंतर हे गाडीने जातात.. इथे यमद्वार अशी एक पवित्र जागा आहे.. इथल्या कमानीत जाऊन घंटा  वाजवून उजव्या बाजूने प्रदक्षिणा मारायची.. या द्वारातून प्रवेश केल्यावर अकाली अस्वाभाविक मृत्यू येत नाही, अशी श्रद्धा आहे..
सकाळचे ११ वाजत आले होते.. इथून थोडंसं पुढे आलो तिथे मोकळ्या जागेवर जेवणाची व्यवस्था शेर्पानी आधीच करून ठेवली होती..  जेवताना चक्क एका शेर्पाला चक्कर आली आणि तो बेशुध्द पडला.. आम्हाला फार कसेतरी झाले.. हे शेरपा  लोक आमच्यासाठी स्वतःकडे लक्ष न देता दिवसरात्र राबत होते.. तो जागा झाला तेव्हा त्याला बराच वेळ समजत नव्हतं आपण कुठे आहोत ते.. तो प्रकार बघून सगळेच थोडे घाबरून गेले.. त्याच ठिकाणी अजून थोड्या जणांना उंचीमुळे श्वास घ्याला त्रास होऊ लागला..  मग तो शेरपा आणि आमच्यापैकी ६ जण गाडीत बसून दार्चेन मुक्कामासाठी परतले.. हे लोकं पुढे परिक्रमेला येऊ शकले नाही.. आता इथे घोडेवाले आणि पोर्टर आले होते.. इथून चालत/घोड्याने खऱ्या अर्थाने परिक्रमा सुरु करयची होती.. आम्ही चालत जाणारे लोक सगळ्यांच्या निघालो.. निघताना केळकर काका म्हणले सावकाश हळूहळू जा, baby steps ने चालायचे.. दम लागला कि थांबायचं.. त्या काकांनी याआधी ७ वेळा परिक्रमा केली आहे.. त्यांचे अनुभवाचे बोल.. नकळत मी त्यांच्या पाया पडले,त्यांचे आशीर्वाद घेतले आणि चालायला लागले.. परिक्रमा सुरु करताना मला कोण जाणे फार आनंद होत होता.. ज्याची इतके दिवस तन्मयतेने वाट बघत होते तो क्षण हा.. समोर पर्वतांच्या मधून नदीच्या शेजारून रस्ता जात होता तिथून जायचे होते, 12km ..
तसे आम्ही चालणारे एकावेळेस निघालो पण प्रत्येकजण आपल्या आपल्या वेगाने निसर्गाचा आनंद घेत जात होता.. सुरुवातीलाच बिहार हून आलेल्या मुन्ना भाईशी भेट झाली... ते आणि त्यांचे मित्र थेट  ABC adv ग्रुप कडून आमच्यासोबत यात्रेला आले होते.. मी एकटी कशी काय आले वगीरे त्यांनी मला विचारले आणि इथून जे सुरु झाले ते परिक्रमा संपेपर्यंत मला बहिण मानून  सोबत दिली.. एक मुलगी म्हणून मला एकटीला जाऊन  दिले नाही त्यांनी.. तशी मला कुठेच घाई केली नाही, एक ठराविक अंतर सोडून माझ्यासाठी ते नेहमी थांबायचे.. आणि एक मुलगी असूनही मी  या ३ दिवसात कधीच कोणाचा आधार घेतला नाही , हात धरला नाही.. माझी मी स्वतंत्रपणे चालत राहिले  याचं मला समाधान आहे.. आम्ही ठरवलंच होतं सुरुवातीला.. आपली काही इथे कोणाशी स्पर्धा नाही.. परिक्रमा पूर्ण करायचं आपलं ध्येय.. त्यामुळे सावकाश ब्रेक घेत फोटो काढत एन्जोय करत देवाचे नाव घेत  चालायचं..
दुपार असली तरी कोवळं उन्ह होतं, चालत असल्याने विशेष थंडी जाणवत नव्हती.. नजरेत येणाऱ्या प्रत्येक पर्वताची ठेवण वेगळीच होती असं जाणवत होते.. कुठूनतरी एखादा धबाबा जोरात कोसळताना दिसायचा.. कुठे बर्फ वळून गाडी झालेली दिसायची.. नदीचा खळखळ आवाज सतत साथ देत होता.. घोड्यावाल्यांचा तोच मार्ग असल्याने मध्ये अधे घोडे आले कि आम्ही चालणार कडेला व्हायचो..
रस्ता साधा सरळ होता, क़्वचित कुठेतरी चढ लागायचं.. पण इथे खरंच दम लगेच लागायचा.. आपल्या इथे जर २० पावले चालून दम लागत असेल तर इथे १० पावले चालले कि लगेच ब्रेक घ्यावा लागायचा.. पण अख्या १२ km  मध्ये चालताना मी एकदाही कुठे बसून विश्रांती घेतली नाही.. दम लागला कि काठीवर आधार देऊन वाकून उभे राहायचे.. श्वासोस्वास नॉर्मल झाला कि मग पुन्हा चालायला लागायचे.. orange, lemon  च्या गोळ्या सोबत होत्याच त्या चघळत जायचे..
बाकी मग मुन्ना भय्याची पूर्ण वेळ बडबड चालू होती.. ते भयंकर jolly .. त्यांनी त्यांच्या घरात कोण कोण असतं, मग त्यांचा बिजनेस त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कसा सुरु केला आणि आता त्यांचं किती नाव झालंय.. मग त्यांचं love  marriage कसं झालं या सगळ्या गंमती जमती सविस्तरपणे सांगितल्या..  मी त्यांचा ऐकत होते पण जास्त बोलत नव्हते.. बोलल्यावर लगेच दम लागतोना..  त्यांची साई बाबांवर आणि शंकरावर नितांत श्रद्धा आहे हे मला खूप जाणवलं..   कोणी कुठे म्हणलं कि अजून किती चालायचं किवा कोणाला दम लागला कि मुन्ना भय्या त्यांना म्हणयचे तिकडे कैलासाकडे पहा , ओम नमः शिवाय म्हणा, तो आपली काळजी घेईल, आपल्या शेवटपर्यंत सुखरूप पोहोचवेल.. आज १२ km  पूर्णवेळ उजवीकडे कैलासाचे शिखर दिसत होते ते बघतच आम्ही चालत होतो.. कैलासाचा हा सहवास मिळत होता ते क्षण  विलोभनीय अविस्मरणीय  होते, आहेत.. 
असेच चालत चालत मध्ये एक टेन्ट वजा हॉटेल लागले.. मला वाटला निम्मा अंतर झाले असेल तर तिथे कळलं ९ km  झाले आता फक्त ३ km  राहिले तर खरचं वाटलं नाही.. एव्हढे आपण चाललो यावर विश्वास बसतच नव्ह्ता..  खरंतर एव्हढ्या थंड हवेच्या ठिकाणी चहा मिळायलाच हवा होता.. पण छे, चहाचा पत्ता नव्ह्ता तिकडे.. उलटं तिबेटी/चीनी लोकं तिथे हॉटेल मध्ये बिअर वगैरे जास्त घेताना दिसले.. आमची बरीच मंडळी तिथे जमली होती.. स्याक काढून जरावेळ बसले, बिस्किट्स खळे, ग्लुकोज प्यायले आणि लगेचच माही निघालो..
आता सकाळ पासूनच्या प्रवासाने थोडे दमल्यासारखे वाटत होते.. शेवटचा टप्पा नेहमीच मोठा आणि अवघड वाटतो तसे हे शेवटचे 3km  जास्त वाटले.. सगळ्यांना उत्साह यावा म्हणून मुन्ना भाई मध्येच भक्ती गीते पण कॉमेडी सुरात शब्दात म्हणत होते.. त्यांचा उत्साह कधीच कमी झालं नाही याचं मला खूप आश्चर्य वाटलं..
शेरपा लोकं आमच्या मागून निघून बरच समान घेऊन आमच्या पुढे निघून जात होते.. बाकी आमचं  जेवणाचं आणि टेन्टचे समान याकवरून पुढे गेले होते.. साधारण ४ वाजता मी १२ km  चालून डेराफूकला पोहचले.. समोर कैलास पर्वत जवळ भासत होता.. अन दगडातून वाहणारी फेसाळती नदी आणि नदीच्या शेजारी आमचे टेन्ट.. मी गेले तेव्हा शेरपा टेन्ट उभारत  होते.. ते होईपर्यंत सगळ्यांना एका मोठ्या टेन्ट मध्ये बसायची व्यवस्था केली होती.. तिथे मी गेले अन आत पहिले तर सगळ्या काकू ज्या घोड्यावरून आल्या होत्या त्या दमून बसल्या होत्या.. घोड्याने येणं अजिबात सोपं नाहीये,सर्वांचे गुडघे मांड्या दुखत होत्या.. माझे मात्र पाय वगैरे काहीही दुखत नव्हते ..  सगळ्यांनी आलीस का चालत,दमलीस का वगैरे मला विचारले.. लगेचच चहा आला.. चहा घेताना इकडे तिकडे बघत होते तोपर्यंत हिमवर्षाव सुरु झालं आणि मग भयानक थंडी जाणवू लागली... नंतर भीम भय्या, महेश, केळकर काका हे मला भेटायला आले,कसा अनुभव होता विचारले..
एका टेन्ट मध्ये दोघांची झोपायची व्यवस्था होती.. केळकर काकांनी माझी सोय पुण्याच्या सिमास  ग्रुपमध्ये स्मृती वाघ या काकुंसोबत केली.. आम्ही म्हणलं वाघ आणि पंचावाघांना एका गुहेत ठेवत आहात तुम्ही.. आमचं टेन्ट पण  कडेला होता सर्वांच रक्षण करण्यासाठी.. हाहाहा..  स्मृती काकुंशी पहिल्यांदाच ओळख झाली माझी.. त्यांनी माझी सगळी विचारपूस केली, चालत आल्याबद्दल कौतुक केले.. आता बर्फ पडतोय बाहेर तर आपण जेवायला बाहेर कसे जाणार म्हणेपर्यंत आम्हाला टेन्ट मध्येच सूप आणि त्यांनंतर गरमागरम खिचडी देण्यात आली हे जेवण पूर्ण यात्रेतील बेस्ट जेवण होते.. उद्या पहाटे लवकर निघायचे होते त्यामुळे लगेच diamox  गोळी देऊन झोपायला सांगितले.. आज जास्ती उंचीवर असल्याने गोळीचा पूर्ण डोस दिला होता.. लगेचच आम्ही स्लीपिंग ब्याग मध्ये शिरलो.. स्मृती काकू झोपताना म्हणल्या इथे पर्वतांमध्ये आपण आहोत, साप वगैरे तर यायचा नाही ना इथे.. मला हसू आले.. त्यांना म्हणलं माझ्या मनात हा विचार बिलकुल आला नाही.. :) बिनधास्त झोपा काकू,समोर कैलास आहेत आपल्या मग कशाला घाबरायचे!!!



मंगळवार, २८ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ९

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 9: 13th June,11


Manas Sarovar (4550 mt.)

मध्यरात्री उठून मानस सरोवर बघायचा किडा मी सर्वांच्या डोक्यात घातला होता.. गजर व्हायच्या आधीच उठले आणि सगळ्यांच्या रूमवर हाकामारी सारखं हाक मारत गेले.. :) एव्हढ्या रात्री मला एकटीला बाहेर फिरायला किंचित सुधा भीती वाटली नाही.. या अख्या यात्रेमध्ये मला कधीच कुठेच भीतीने चुकनही स्पर्श केला नाही.. तसं मला पुण्यातही भूतांची वगैरे भीती कधीच वाटत नाही.. कदाचित मी रोज दासबोध वाचते म्हणून असं असावं.. तर लगेचच आमची स्वारी सरोवराकडे निघाली.. पूर्ण ढगाळ हवामान असल्याने चांदण्यातले  सरोवर,चंदेरी पाणी बघायची संधी हुकली.. बाहेर अशक्य थंडी होती.. आम्ही शांतपणे काठावर  जाऊन बसलो.. पाणी एकदम निश्चल शांत भासत होते.. समोरच्या बाजूला ढग पाण्यात मिसळलेले दिसत होते.. ज्योत दिसतेय का किती आतुरतेने वाट बघत होते मी.. मध्येच आमच्यापैकी कोणीतरी म्हणायचं ते पहा पुढे काहीतरी दिसतंय.. पण ते सगळ्यांना काही दिसायचं नाही.. आता काहीतरी आशेने समोर आपण एकटक बघत बसलो तर आपल्याला काहीना काही भास होणारच तशातला हा प्रकार होता.. मलाही मध्येच उगाच काहीतरी हलल्यासारखे वाटायचे.. चहूकडे अगदी निरव शांतता पसरली होती.. अन त्या वातावरणात मन ध्यान लावल्यासारखे शांत झाले,हलके झाल्यासारखे वाटले.. तासभर बसून थंडी सहन न झाल्याने आम्ही खोलीत परतलो..  ज्योत दिसण्या इतके भाग्य नव्हते माझे मात्र  ते रात्रीचं सौंदर्य एकदा अनुभवलं याचं समाधान मला वाटत होतं.. परतल्यावर थंडीमुळे लगेचच निद्रेच्या अधीन झाले..
सकाळी उठून बाहेर आल्यावर डावीकडे कैलासाचे आणि उजवीकडे मानासारोवाराचे दर्शन झाले आणि मन प्रसन्न झाले.. इथे आल्यापासून दिवस कुठला, तारीख कोणती कसलंही भान नव्हतं..  नंतर लक्षात आलं आज सोमवार होता आणि रात्री आमचे समान आमच्या ताब्यात दिले गेले होते त्यामुळे पूजेचं साहित्य जवळ होते.. लगेच मी सरोवरापाशी गेले.. आता ढग गायब झाले होते.. अन सुर्यराजाच्या किरणांमध्ये ते पाणी सुरेख चमकत होता,जणू ते सोन्याचे पाणी होते..  अन काही पक्षी (नाव माहिती नाही) त्यामध्ये मनसोक्त विहार करत होते.. किती नशीबवान आहेत ते इथे या सरोवरापाशी राहतात! अंघोळ वगैरे शक्य नव्हती.. डोक्यावर थोडं पाणी शिंपडले,डोळ्यांना लावले.. समोरच्या कैलास राजाला , मानस सरोवराला आणि त्या रविला हळदी कुंकू आणि बेलाचे पान  वाहून मनोभावे पूजा केली.. काल राहिली होतीना पूजा करायची म्हणून आज झाल्यावर आणि तेही सोमवारी झाल्यावर फार बरं वाटलं.. माझ्या जीवनात सगळ्या गोष्टी होतात पण थोडा वेळ लागतो,जरा वाट बघावी लागते नेहमीच प्रत्येक बाबतीत.. :)
पूजेला माझी मीच चालले होते तर एक काकूही सोबत आल्या.. या अख्या ट्रीपमध्ये मी कधीच कोणावर अवलंबून नव्हते.. कोणालाही मी माझ्यासोबत इकडे या किवा मला हे हवंय असं कधीच म्हणलं नाही मी.. म्हणून एकटी असले तरी माझं ओझं किवा माझा त्रास कोणालाही झाला नाही.. माझी मी एन्जोय करत होते प्रत्येक क्षण त्यामुळे सर्वांना कौतुक वाटत होतं माझं..
नाश्त्याच्या वेळेस सगळे भेटले तेव्हा रात्रीच्या प्रकरणावर चर्चा चालू होती,मला हे दिसले मला ते दिसले.. आमच्यापैकी काहीजण नंतरही थांबले होते त्यांना ज्योत दिसली म्हणे.. खरंच दिसली का भास होता हे त्यांनाही नक्की माहिती नव्हतं.. खाणंपिणं आटोपल्यावर आम्ही सगळे समोरच्या टेकडीवर सरावासाठी गेलो.. तिथेही वरती बुद्धदेवांचे मंदिर होते आणि तिकडून सगळ्याच बाजूचे दृश्य अतिशय भारी दिसत होते..
खरतर तर आज इथून पुढे नांदी पर्वत,अष्टपद वगैरे बघून दार्चेनला मुक्कामासाठी जायचे होते.. पण विसा मुळे आमचा प्लान १ दिवस पुढे गेला होता..  आणि  ऐनवेळेस दार्चेनला राहण्यासाठी रूम्स मिळाल्या नाही.. त्यामुळे आज इथेच राहायचे होते.. कारण काहीही असो पण मानस सरोवरापाशी २ दिवस राहायला मिळालं हे आमचं अहोभाग्य होतं..
जेवण झाल्यवर मी पुन्हा काठाशी गेले.. आता पुन्हा निळ्या हिरव्या छटान्चा खेळ दिसत होता.. पाण्याकडे कितीतरी वेळ बघत बसले.. "बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले" अशी माझी मनस्थिती झाली होती..सभोवताली पर्वत रांगा आणि समोर हे जलाशय.. त्या पाण्यातल्या तरंगाशी माझ्या मनाचे तरंग एकरूप झाले होते.. स्वर्ग यालाच म्हणतात का असे राहूनराहून वाटत होते.. सौदर्याची ,पवित्रतेची अन शांततेची व्याख्या अजून वेगळी काय असणार.. एरवी हे मोठे शब्द ऐकत असतो आज खुद्द निसर्गगुरू  या शब्दांचा अर्थ समजावून सांगत होते.. आज वेगळा काहीच कार्यक्रम नव्हता.. संध्याकाळी पुन्हा काठापाशी चक्कर मारली आणि मनसोक्त आनंद घेतला..

सोमवार, २७ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ८

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 8: 12th June,11


Paryang -> Manas Sarovar (4550 mt.)


सकाळी सकाळी प्रवास सुरु झाला.. आता कधी एकदा मानस सरोवरापाशी पोहचतोय असं होत होतं.. पण मध्ये एकेठिकाणी checking साठी थांबावे लागले,जवळ जवळ २ तास तिकडे गेले.. आणि तिथे कडकडीत उन्ह..
आता इथून पुढे कोणतंही सरोवर दिसलं की ते मानस सरोवर का किवा कोणतंही शिखर दिसलं की तो कैलास पर्वत का असं वाटत होतं.. केळकर काका आमच्या गाडीत होते ते माहिती देत होते.. सभोवताली वाळूच्या छोट्या छोट्या टेकड्या दिसत होत्या.. आमची उत्सुकता शिगेला पोहचली होती..
काही वेळाने समोर अगदी दूरवर निळ्या-हिरव्या रंगाचे पाणी दिसू लागले.. केळकर काका म्हणले ते पहा मानस सरोवर.. बास,आता patience संपला.. खरंच तिथे जलाशय आहे का अजून काही वेगळे आहे असे वाटत होते.. पुढे एका point  वर गाड्या थांबवल्या गेल्या.. तिथून समोर लांबून मानस सरोवर दिसत  होते..  उजवीकडे कैलास पर्वताचे दर्शन होते.. पण नेमके तेव्हा त्या बाजूला ढग जमा झाले होते त्यामुळे काहीच दिसत नव्हतं..
एरवी ढग आले की माझा मन किती फुलतं आणि आज फार राग आला त्या ढगांचा.. झाडू घेऊन तिकडचं आभाळ स्वच्छ झाडावं असं मला वाटायला लागलं.. कैलासपती आम्हाला दर्शन कधी देणार आशु हुरहूर मनाला लागली.. भीम भैया म्हणले थोड्यावेळाने ढग जातील तिथले पण आम्ही मात्र बैचेन झालो.. निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही याचा प्रत्यय आला.. इथपर्यंत आलोतरी  ढगाळ हवामानामुळे कैलास दर्शन होईल का हि गोष्ट आपल्या हातात बिलकुल नाहीये..
या point वरून डावीकडे एक पर्वत आहे (नाव आठवत नाही).. त्या पर्वतातून मानस सरोवराचे पाणी येते.. यामागे अशी गोष्ट आहे की एक शिवभक्त राजा होता तो शंकराची मनोभावे भक्ती करायचा.. शंकराने प्रसन्न होऊन त्याला इच्छित वर मागण्यास सांगितले तेव्हा राजा म्हणलं मला तुझ्या चरणाशी आश्रय दे.. तेव्हा कैलास पर्वताच्या अगदी समोर हा या पर्वताच्या रुपामध्ये या राजाला स्थान मिळाले.. आणि आश्चर्य म्हणजे या पर्वताची शिखरे कैलासाच्या बाजूला झुकलेली दिसतात.. माझ्या सध्या गरीब कॅमेरामध्ये या गोष्टी मी टिपू शकले नाही याचा मला थोडं वाईट वाटलं.. असो.. मनाच्या कप्प्यात सगळं काही साठवून ठेवायचे माझे अथक प्रयत्न चालूच होते..
त्या पवित्र भूमीला स्पर्श करून मी वंदन केले.. अन पाय मानस सरोवराकडे वळले.. १०२ km लांबी असलेल्या या सरोवराची परिक्रमा गाडीतून केली जाते.. सुरुवातीला एके ठिकाणी पूजा आणि दर्शनासाठी गाड्या थांबवण्यात आल्या.. गाडीतून सगळ्यात आधी मी पळत पळत काठाशी आले.. कुठे निळी ,कुठे हिरवी  तर कुठे उन्हात चमकणारी सोनेरी छटा  दिसत होती.. वरती ढग नव्हते त्यामुळे ढगांमुळे वेगळ्या छटा दिसतात असंही म्हणायची सोय नव्हती.. स्वच्छ नितळ या शब्दांचा नेमका अर्थ त्या पाण्याकडे बघून समजत होता..  आधी त्या पवित्र पाण्याला स्पर्श करू आणि मग सावकाश फोटो काढू असे ठरवून लगेचच मी  जर्किन ,टोपी ,शूज  इत्यादी काढून ठेवले आणि पाण्यात गेले.. आणि गेल्या गेल्या खिशात ठेवलेल्या माझ्या  लाडक्या  कॅमेराने  मानस सरोवरात उडी मारली.. क्षणभर मला हसावे का रडावे कळले नाही कारण कारण पडून पडून तो कॅमेरा मानस सरोवरात पडला होता.. केव्हढ त्याचं  भाग्य,काय बोलणार मीतरी..  मग कॅमेरा पुसला,चालू करून पहिला,एक फोटो निघाला आणि लेन्स अडकली.. त्या कॅमेराच्या नादात माझे दर्शन आणि पूजा नीट व्हायची नाही म्हणून मी तो कॅमेरा मग तसाच आत ठेवून दिला.. हे प्रकरण  कोणालाच कळलं नव्हतं कारण मी सगळ्यांच्य आधी इकडे आले होते..
आता सगळे जण काठाशी जमले होते..  स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी टेंट बांधणार होते.. महेश आणि शेरपा लोक ते काम कात होते पण काही कारणाने ते टेंट उभारू शकले नाही.. मग सगळे पुरुष दुसर्या बाजूला लांब निघून गेले.. मी पाण्यात उभी होते,भारावले गेले होते.. काही कळायच्या आत सगळ्या काकुनी तिथे काठावर  कपडे बदलायला सुरुवात केली.. थार्मल्स वगैरे भिजून द्यायचं  नव्हतं.. त्यामुळे डुबकी मारण्यासाठी सगळ्याजणी वेगळे कपडे घालत होत्या..
मलाही त्या पवित्र पाण्यात डुबकी मारून आतापर्यंत केलेले सगळे पाप धुवून काढायची प्रबळ इच्छा होती.. पण असं उघड्यावरच कपडे बदलण्याचे धाडस मला नाही झालं.. मी थोड्या जणींना म्हणलं आपण ओढणी ,टॉवेल धरून एकेकीने कपडे बदलूया पण माझं कोणी ऐकलंच नाही.. त्या सगळ्याजणी काकू होत्या,त्यांना काहीच लाज वाटली  नाही पण मला नाही जमलं त्यांच्यासारख तसं,मी अजून लहान आहेना.. क्षणभर वाटलं कसे हे स्वार्थी लोक,आपले आपले कपडे बदलून पाण्यात गेलेही लगेच.. पण मग वाटलं चूक कोणाचीही नाही..  सगळेच त्या पाण्याकडे आकर्षले गेले होते.. सगळेच खूप खुश होते,एका वेगळ्या जगात गेले होते.. सर्वाना अंघोळ करून पूजा करायची घाई झाली होती.. मी एकंदर परिस्थिती ठरवून डुबकी मारण्याचा अट्टहास करायचा नाही असं ठरवलं.. हात पाय तोंड धुतले.. डोक्यावर आणि सर्वांगावर पाणी शिंपडले.. माझ्या नशिबात कदाचित इतकंच होतं.. पण मी पण वेगळ्या धुंदीत गेले होते तेव्हा.. त्या सरोवराकडे,आजूबाजूच्या शिखरांकडे किती पाहू अन किती नको असं होत होतं..
सगळ्यांनी शिस्तीत पूजा अर्चना सुरु केली.. मानस सरोवराचे सौदर्य आणि स्वच्छता बाधित ना करता पूजा करण्याची सूचना आधीच सर्वाना दिली गेली होती.. मी पूजेसाठी आणलेले बेलाचे पान, हळदी कुंकू, कपूर आणि उदबत्ती माझ्या मोठ्या ब्यागमध्ये राहिले हे इकडे आल्यवर माझ्या लक्षात आले.. काळ sack मध्ये टाकायचं मी विसरले होते.. आता मी पूजा कशी करू असं वाटू लागले.. पाण्यातच एकटी उभी होते मी कितीतरी वेळ.. तेव्हा समोर अचानक आकाश निरभ्र झाले आणि कैलासाचे शिखर दिसू लागले.. बाकीच्यांचा तिकडे बिलकुल लक्ष नव्हते तेव्हा मी त्यांना म्हणला समोर पहा कैलास पर्वत.. तेव्हड्यात पुरुषांच्या बाजूने जोरात आवाज आला कैलासनाथ  पहा समोर!! खरा सांगू तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआप घळाघळा  पाणी वाहू लागले.. महादेवाला म्हणलं आज तुझी पूजा करण्यासाठी माझ्याकडे फक्त माझे अश्रू आहेत,तेच वहाते तुला..
ब्रह्मदेवाच्या मनात या सरोवराची कल्पना झाली म्हणून याला मानस सरोवर म्हणतात.. पृथ्वीवरचे सर्वात शुध्द पाणी.. या पाण्यात सर्व  देवदेवता अंघोळ करतात असं म्हणतात.. अशा या पाण्यात आज मी उभी होते.. मला येतात ती सर्व स्तोत्रे मी तिकडे उभी राहून मनातल्या मनात म्हणले,कैलास मानस आणि सर्व देवांची मनोभावे मी मानस पूजा केली..
दुपारची वेळ असल्याने पाणी अगदी गार नव्हते पण पाण्यातून बाहेर आले आणि थंडी वाजू लागली.. बाकीच्यांचा पूजा पाठ अजूनही चालू होता.. मी पुन्हा स्वेटर  जर्किन अडकवलं आणि काठावर शांतपणे बसले.. कॅमेरा काढून पहिला तर लेन्स पूर्णपणे अडकली होती,फोटो काढणं शक्यच नव्हतं.. जगातल्या सगळ्यात सुंदर जागेवर मी बसले होते,समोर कैलासाचे शिखर दिसत होते आणि मानासारोवाराचे  अथांग रूप विविध छटानी सजलेले दिसत होते आणि नेमका माझं कॅमेरा बंद पडला.. चूक माझिंच,पाण्यात जाताना कॅमेरा बाजूला ठेवायला हवा होता.. backup म्हणून आणलेला कॅमेरापण काठमांडूला विसरले होते ही सुधा माझीच चूक.. मोबाईल गाणी एकून डिस्चार्ज मीच केला होता,नाहीतर त्यातनं तरी काढले असते फोटो.. माझी माझ्यावरच चिडचिड होऊ लागली.. पण क्षणात ही भगवंताची लीला आहे असे वाटले.. मी एखाद्या गोष्टीबद्दल,व्यक्तीबद्दल फार लगेच attach होते.. कॅमेराबद्दल मला खूप आसक्ती आहे.. सारखा कॅमेरा लागतो.. आता बंद आहे तर मला किती वाईट वाटतंय.. हेच माझं चुकत होतं.. आणि कदाचित याबद्दल धडा मिळावा मला,माझी आसक्ती कमी व्हावी म्हणून या सुंदर जागेवर माझं कॅमेरा बंद पडला होता.. मग मी ठरवून टाकलं, जर हा कॅमेरा सुरु झालं नाहीतर मी या पुढे कधीच कोणत्याही ट्रीपला फोटो काढणार नाही,कॅमेरा वापरणार नाही.. फोटो काढले नाहीतर कुठे बिघडतं.. उगाच फोटो काढायचे,कोणाला दाखवयचे मग ते कोणी म्हणणार ते छान आले आहेत किवा अजून असं काही..हे सगळं निरर्थक आहे,क्षणिक आनंद देणारं आहे वगैरे विचार माझ्या मनात चालू होते.. कॅमेरा तसाच ठेवून दिला आणि शांत झाले.. एकटीच अशी कितीतरी वेळ शांत बसले..
नंतर तिथून जवळच जेवणाची व्यवस्था केली होती.. केळकर काक्नी बघितलं,इतका वेळ उत्साह असलेली ही एकदम शांत झाली.. ते मला जेवायला घेऊन गेले.. जेवणाचा ताट घेऊन मी पुन्हा काठावर बसले.. समोर कैलास मानस आणि मी खाली मांडी घालून बसून जेवण करत होते.. कदाचित हे माझ्या आयुष्यातलं सर्वात बेष्ट जेवण होते.. कैलास पर्वताचा इथून south pole दिसत होता.. पर्वतावर एकाबाजूला  ठळकपणे   ओम दिसत होता,खरंच अजिबात अतिशयोक्ती नाही.. :)
नंतर गाडीत बसल्यावर केळकर काका म्हणले आईबाबांची आठवण येत आहे का तेव्हा मला रडू आलं.. खरंच मला आईबाबांची खूप आठवण येत होती याजागेवर..  माझं रडणं बघून बिचारा आमचा चीनी ड्रायवर कावराबावरा झाला.. हिला काय झालं त्याने खुणेने विचारले तेव्हा बाकीचे म्हणले काही विशेष नाही.. :)
आता आमची गाडीतून मानस सरोवराची परिक्रमा सुरु झाली.. कितीतरी विशाल पात्र वाटत होते ते.. सोरोवाराचे वर्णन शब्दात पकडता येत नव्हते खरंतर.. शब्द आणि माझी दृष्टी अपुरी पडत होती त्यासमोर.. वाटेत राक्षस/रावण तलावापाशी आम्ही थांबलो.. हे सरोवर लांबूनच पहिले.. तिथले पाणी रावणाच्या संबंधित असल्याने अपवित्र मानले जाते.. त्याच्यामागेही एक प्रसिद्ध कथा आहे..
मग  आम्ही मानस सरोवराच्या दुसर्या टोकापाशी आलो.. तिथे guest  house आहे.. ते लोकेशन फार भारी होतं..  रूम मधून बाहेर आल्यावर समोर कैलासचे शिखर आणि जवळच  मानस सरोवर..
नंतर थोडा आराम केला.. एव्हाना  मी  रडले आणि माझा कॅमेरा पाण्यात पडला ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती.. मनाशी निश्चय केला आठवण म्हणून २/४ फोटो मोबाईल मधून काढू बास.. केळकर काकांकडे गेले.. मोबाईल चार्ज होईल का इकडे कुठे विचारले.. त्यांना कॅमेरा बंद पडलेलं कळलं होतं.. आणि विशेष म्हणजे त्यांनी चक्क त्यांचा कॅमेरा मला दिला,घे यातून काढ फोटो असं म्हणले.. मी नको म्हणलं,प्रत्येकाला आपल्या आपल्या कॅमेरातून फोटो काढायचे असतात ना,उगाच कशाला मी त्यांचा कॅमेरा घेऊ.. तर त्यांचा मुलगा अनिकेत म्हणला बाबा विशेष फोटो काढत नाही,just कॅमेरा जवळ ठेवून २/४ फोटो काढतात ते.. तुझं मेमरी  कार्ड चालत असेल तर या कॅमेरात घाल म्हणजे तुझे फोटो continue करता येतील.. मग काका म्हणले अनिकेत काढतोच आहे आमचे प्रोफेशनल फोटो.. तू बिनधास्त वापर हा कॅमेरा.. आणि माझेही अधूनमधून थोडे फोटो काढ बायकोला दाखवायला.. :) बास मग मी लई खुश झाले.. मेमरी कार्ड घालून त्यांचा कॅमेरा घेऊन लगेच सरोवरापाशी गेले आणि मनसोक्त फोटो काढले.. माझा चेहरा फुलाला होता तो केवळ केळकर काकांमुळे.. गम्मत म्हणजे संध्याकाळी माझा कॅमेरा आपोआप ठीक झाला.. आता घरी जाऊन या कॅमेराची पूजा कर असं सगळेजण जातायेता  मला म्हणत होते.. मग काकांना त्यांचा कॅमेरा परत देऊन त्यांचे मनापासून आभार मानले..
संध्याकानंतर मात्र थंडी अजूनच वाढली.. रात्री सरोवरापाशी चक्कर मारायचा माझा विचार होता पण नेमका ढगाळ वातावरण होतं,चांदण्याचा कुठे पत्ता नव्हता.. पहाटे ३ ते ६ या ब्रम्ह मुहूर्ताच्या वेळेस सगळे देव देवता मानस सरोवरात अंघोळ करायला येतात तेव्ह्या कधी कधी पाण्यात ज्योत दिसते असं मी वाचून आले होते.. रात्रीच्या जेवणानंतर मी हे सगळ्यांना सांगितलं आणि म्हणलं जाऊयाका हे पाहायला आपण..  ज्योत दिसेलच अशी काही खात्री नव्हती पण पहाटेचं सौदर्य तरी बघता येईल म्हणलं.. जवळजवळ सगळेच यायला तयार झाले पण ब्रह्म वेळ  आपल्या घडल्याप्रमाणे क चीनी घडल्याप्रमाणे यात वाद होता.. इथे आहोत तर इथल्या घडल्याप्रमाणे असे माझे मत होते आणि तसेच ठरले.. सर्वाना उठवायचे  काम माझ्याकडे होतं.. इथे चार्जिंग ची सोय असल्याने मोबाईल चार्ज झाला होतं.. आपल्या  १चा  म्हणजे चीनी ३.३०चा गजर लावला आणि मी शांतपाने  झोपून गेले..

मंतरलेले दिवस - ३० : ७

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 7: 11th June,11


Saga to Paryang (4500 mt.)


सकाळी लवकर आटपून आमच्या गाड्या परयांग च्या दिशेने धावू लागल्या.. इथून पुढे रस्ता चांगला होता.. आता दूरवरची हिम शिखरे, नदीचे खळ खळते पाणी सकाळच्या कोवळ्या किरणात चमकत होते.. थोडं पुढे गेल्यावर जणू  आम्हाला भेटण्यासाठी मेघ जमिनीवर उतरले होते.. मग मला वेडावणारा तो रिमझिम पाऊस..
आणि नंतर तर चक्क बर्फाचा पाऊस.. मी आयुष्यात प्रथमच हिमवर्षाव बघत होते.. गाडीतून बाहेर उतरणे शक्य नव्हते पण काचेवर पडलेल्या बर्फाचा आनंद घेत होते.. अजूबाजूला सगळीकडेच  बर्फ पसरलेला दिसत होता..  भीम भय्या म्हणले, मी इतके वर्ष यात्रेसाठी इकडे येतो पण या परिसरात पहिल्यांदा बर्फ पडलेला बघितला.. मग मी म्हणलं यात्रेला खास लोकं आहेतना यंदा म्हणून.. :)
अजून पुढे गेल्यावर आभाळ स्वच्छ होते, कडक उन्ह पडले होते अक्षरशः.. इथे हवामान क्षणाक्षणाला बदलते..  "कधी उन्ह, कधी पाऊस.. आताशा मनास हे ऋतू कळेनात.. " अशी माझी मनस्थिती झाली होती.. निसर्गाची किमया,अजून काय..
दुपारी १२ वाजता परयांगला पोहचलो.. अगदी छोटंसं गाव.. अजिबात स्वच्छता नव्हती.. इथे खूप गरिबी दिसली.. लहान लहान पोरं सारखी भिक मागत होती..  वाईट वाटले, इतक्या सुंदर ठिकाणी लोकांचे हाल पाहावले नाही..
इथून अवघ्या 250km वरती मनास सरोवर असल्याने  इथे राहावं वाटत नव्हतं.. थेट तिकडे मानस सरोवराला जाऊ असं सर्वांनाच वाटत होतं पण हा उंचीचा तिसरा टप्पा महत्वाचा होता,थांबणे अपरिहार्य होते..
इतके आम्ही छोट्या huts मध्ये राहिलो.. एकेका खोलीत ५/६ जणी.. बाहेर भयंकर बोचणारे थंड वारे वाहात होते, dimox मुले उंचीचा त्रास मात्र आता होत नव्हता.. इथे रूम मध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून स्तोत्रे म्हणली, 'ओम नमः शिवाय' असा १०८ वेळा जप केला.. नंतर कोणी भक्तीगीते म्हणली.. मी माझ्या दोन कविता ऐकवल्या.. मजा आली..
संध्याकाळी गावातल्या गावात फिरून आलो.. बुद्धांचं एक मंदिर होतं त्याला Buddhist Monastery म्हणतात ते बघितलं..  रात्री सुरेख चांदणं पडलं होतं आणि मनात उद्याचे मानस सरोवराचे वेध लागले होते..

रविवार, २६ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ६

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 6: 10th June,11


Nyalam 
to Saga (4450 Mt)
ठरल्याप्रमाणे सगळे ७ला आवरून नाश्ता करून पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले.. काठमांडू सोडल्यापासून आता पुढे काही दिवस अंघोळ प्रकरण विसरायचे होते.. याबद्दल मी नंतर सांगेनच.. :)
आता प्रवास सुरु झाला.. मलाना actual destination हून जास्त तिथे जाताना लागणारा प्रवास फार आवडतो.. इकडे तिकडे बघत फक्त पुढे जात राहायचे,बास.. या सुंदर प्रवासात मला क्षणभर सुधा झोप लागत नाही.. ना कोणाशी गप्पा माराव्या वाटतात.. माझ्यामाझ्यात मी कुठेतरी हरवून जाते अशावेळेस.. त्यामुळे एकटी असल्याचा काहीच फरक पडत नाही मला.. :)
आता पाहावं तिथे दूरवर राखाडी पर्वत रांगा दिसत होत्या.. इथले चीनी ड्रायवर थोडी गाडी चालवली कि लगेच ब्रेक घ्यायचे.. सारखा धुम्रपान लागतं त्यांना.. ते त्यासाठी थांबले कि मी लगेच फोटो काढण्यासाठी बाहेर यायचे.. पण कुठे कुठे बाहेरची थंडी सहन व्हायची नाही.. सगळा सौदर्य गाडीत बसूनच पाहता यायचं.. १२ वाजता एकेठिकाणी जेवणासाठी थांबलो तिथून समोर संदर हिमशिखरे दिसत होती.. एका शिखरावर सिद्धिविनायकाचा चेहरा दिसतो असे म्हणतात.. साध्या डोळ्यांनी मलातर काही दिसत नव्हता.. मग एकाचा शुटींग चा कॅमेरा होता त्यातून एकदम झूम करून पहिले तेव्हा अगदी  गणपतीचे रूप दिसले.. :) नंतर फोटो काढायचा थोडाफार प्रयत्न केला.. घरी शुटींगचा कॅमेरा असताना मी इथे आणला नव्हता.. मी एकटी फोटो काढणार का ते शुटींग घेणार आणि शिवाय तो कॅमेरा बराच मोठा, एकटीला इतकं सांभाळता आले नसते म्हणून नाही आणला.. पुढे गेल्यावर एक सुंदर निळेशार सरोवर दिसले.. ते बघून वाटलं की  हे सरोवर इतकं मनमोहक आहे तर मानस सरोवर तर किती सुरेख असेल..
आतापर्यंतच रस्ता चांगला होता.. आता इथून पुढे कच्चा रस्ता होता.. काही ठिकाणी मागे वळून पुन्हा दुसरा रस्ता पकडावा लागत होता.. सगळीकडे नुसती धूळ उडत होती.. त्या धुळीत कित्येकदा पुढचा काही दिसेनासं व्हायचं.. पण हे ड्रायवर भारी होते,त्यांना मानलं पाहिजे.. कुठेच कधीच कोणालाही काही प्रॉब्लेम आला नाही.. आणि कधी अवघड वळण उंचवटा  पार पडला कि ते ड्रायवर जाम खुश व्हायचे.. ते त्यांचा जॉब मस्त एन्जॉय करत होते.. 
पुढे एके ठिकाणी आमच्या २ गाड्या आल्या नाही म्हणून बाकी सगळ्या गाड्या थांबवल्या होत्या.. तिथे ऊजवळच बर्फाने गोठलेलं एक सरोवर होतं.. जवळ जवळ २ तास तिथे वाट बघत आम्ही निसर्गाचा आनंद घेतला.. पण नंतर थोडी काळजी वाटू लागली.. त्या धुळीच्या रस्त्यात कोणी रस्ता हरवला तर कठीण होते.. आणि शोधायला तरी कुठे जायचं.. अंधार पडलं तर संपलंच.. त्या गाडीत कोण कोण आहे यावर चर्चा सुरु झालो.. चीनी ड्रायवर  लोकांना इंग्रजी बोलता येत नव्हतं.. त्यांना काही सांगायचा असल्यास खाणाखुणांनी सांगावं लागायचं.. नंतर कळला कि त्या २ गाड्या आधीच पुढे गेल्या आहेत आणि मग सगळ्यांच्या जीवात जीव आला..
संध्याकाळी सगळा पोहचलो.. आता आम्ही पुढच्या उंचीच्या टप्प्यावर आली होतो पण गोळ्या घेतल्यामुळे इथे उंचीचा त्रास झाला नाही.. हे गाव सुंदर होतं, आजूबाजूला वाळवांट  पसरलेलं दिसत होतं.. चीन आपल्यापेक्षा अडीच तासाने पुढे असल्याने कि काय पण इथे दररोज आम्ही ९ वाजता झोपायला जायचो.. आणि रोज नवनवीन जागेत झोपत असलो तरी झोप कधी लागलीच नाही असा मला कधी झालं नाही.. रोज झोपताना एक प्रकारचं समाधान आणि उद्या काय कसं घडेल अशी उत्सुकता मनात असायची..

मंतरलेले दिवस - ३० : ५

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 5: 9th June,11


Nyalam
  (3750 mt.)
आज पहाटे  ४.३० वाजता जाग आली.. बाहेर आले, जरा फ्रेश वाटत होते आणि आता डोकं शांत झालं होतं.... न्यालम किती सुंदर आहे हे आता कळत होतं.. इथल्या वातावरणाशी, उंचीशी समरस होण्यासाठी आज इथेच मुक्काम करायचा होता..
चहा नाश्ता झाल्यावर आम्ही सर्व  सरावासाठी मागच्या डोंगरावर निघालो,practice trek.. हिमालयातला ट्रेक.. तिथे पुण्यातही ट्रेक्स सुरु झाले असणार आता असं वाटून सह्याद्रीच्या ट्रेक्सची आठवण झाली..
सभोवताली जिथे पाहावं तिथे उंचच उंच पर्वत रांगा आणि ढगाळ हवामान.. डोंगर विशेष कठीण नव्हता पण थंड गार वारा जोरात वहात होता.. डोंगरावर बारीक हिरवळ पसरली होती आणि अगदी छोटी छोटी फुले.. उगाच फुलांना हात लावू नका असे आम्हाला सांगण्यात आले कारण कधी कधी त्या फुलांची allergy होऊ शकते..
कालची गळून गेलेली वृंदा आज उत्साहाने चालत होती याचं  मलाच थोडसं आश्चर्य वाटलं.. काळ रात्री वाटत होतं पुढे परिक्रमा कशी करणार आणि आता वाटत होतं सगळं नीट जमेल मला.. :) थोडा अशक्तपणा जाणवत होता सर्वाना म्हणून ग्लुकोज, इलेक्ट्रोल घेणं चालू होतं.. पूर्ण वरती जाईपर्यंत थेंब थेंब पाऊस सुरु झाला म्हणून आम्ही लागलीच परतलो..
एव्हाना ग्रुपमध्ये पुण्याहून एक मुलगी एकटीच आली आहे ही बातमी पसरली होती.. प्रत्येकजण जाता येत मला थांबवून माझ्या बद्दल माहिती विचारायचे.. काय करतेस, एकटी कशी काय आलीस, घरी कोण कोण असतं etc.. कोणत्या कॉलेज मध्ये आहेस असा प्रश्न कोणी विचारला कि इतकं  मस्त वाटायचं, अजून मी कॉलेज कुमारी वाटते तर.. हाहाहा..  पुण्याच्या लोकांनी माझ्या नावाने जरा अभिमान बाळगला, पुण्याची पोरगी शोभातेस हो वगैरे.. अख्या ट्रीपमध्ये काका लोकांनी माझे खूप लाड केले आणि काकू लोकांना मी शक्य तेव्हढी मदत करायचे प्रयत्न केले.. आमच्या ग्रुप मध्ये डॉक्टर, अभियंता, शिक्षक, बँकवाले असे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी होती.. art of living चेही एक काका भेटले.. कोणी बहिणी बहिणी आल्या होत्या, कोणी मित्र मैत्रिणी आले होते, कोणी आई मुलगा आले होते, कोणी नवरा बायको, तर कोणी एकटे आले होते.... जवळ जवळ सगळ्यांनी बऱ्यापैकी भारत बघितला होता.. अमरनाथला अजून गेली नाहीस का तू  असे सर्वजण मला म्हणले.. पुढच्या वर्षी जाईन म्हणलं.. :-)
इथे १५ दिवस खाण्यापिण्याची चंगळ होती.. अख्या ट्रीपमध्ये कुठेही असलोतरी आम्ही जवळजवळ रोज ४ च्या आसपास wake-up  call दिला की उठायचो.. सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी बाहेर ठेवलेलं असायचं.. दात घासायचे,फ्रेश व्हायचं.. लगेच पिण्यासाठी गरम पाणी, चहा, कॉफी , दुध वगैरे तयार..  ५.३० ला लगेच नाश्ता.. भूक लागली आहे का वगैरे असा विचार इथे आल्यापासून करायचाच नव्हता..  रोज नाश्त्यामध्ये एक गरम गरम पौष्टिक खीर, च्यवनप्राश, ब्रेड जाम, cornflakes वगैरे असायचे.. थंडीत गरम खीर एक नंबर वाटायची..  दुपारी १२/१ वाजता प्रवासात असलो तरी मध्ये कुठेतरी थांबून जेवण.. जेवणाआधी रोज जूस दिला जायचा तो गरम पाण्यातला.. :) जेवायला फुलके,२ भाज्या , दाल भात आणि रोज एक फ्रुट असायचेच..  ४ वाजता चहा.. ६ वाजता रोज वेगवेगळ्या प्रकारचे सूप.. ७.३०  वाजता लगेच रात्रीचे जेवण..रात्रीच्या जेवणानंतर  diamox गोळी घायची असायची म्हणून hot chocolate ..  जेवताना एखादा पदार्थ घेतला नाही किवा कमी घेतला कि ते शेरपालोक म्हणयचे बेन खाना ठीकसे खालो.. त्याचं सर्वांकडे नीट लक्ष असायचं,प्रेमाने विचारपूस करायचे ते.. एव्हढं करूनही लोकांच्या इतक्या demands  असायच्या तरी हे लोक १५ दिवसात कधीच कोणावर चिडले नाही, आवाज वर करून कोणाशी कधीच बोलले नाही याचं फार कौतुक वाटतं मला..  १५ दिवसात कडकडून भूक कधी लागलीच नाही.. भूक लागायच्या  आत खाण्यासाठी काहीतरी पुढे यायचे.. आणि कदाचित थंडीमुळे.. पोट साफ न होणं हा त्रास मात्र सर्वांनाच पूर्ण ट्रीप मध्ये होत होता.. ओवा खाणे वागिरे चालू होते.. मी या बारक्या सारक्या गोष्टी  इथे मुद्दाऊन नमूद  करत आहे,ज्यांना पुढे ही यात्रा करायची आहे  त्यांना कल्पना असावी म्हणून बाकी काही नाही..
संध्याकाळी पुन्हा आम्ही महिला मंडळ फिरून आलो.. खरंतर हे दिवस अगदी स्वप्नातले होते जणू.. पर्वतांच्या  कुशीत,सततचा नदीच आवाज ऐकत कसलीही दुसरी काळजी विचार न करता मनसोक्त फिरायचं..बास..

शनिवार, २५ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ४

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 4: 8th June,11


Tatopani -> Nyalam (3750 mt
)

पहाटे ४ च्या आसपास जाग आली तेव्हा बाहेर पाहिलं तर आधीच उजाडले होते..  ती नदी अजून त्याच वेगाने धावत होती.. कोणाला भेटायला चालली होती ती काय माहिती..  :) आणि ते पर्वत तसेच खंबीरपणे उभे होते!!!
सकाळी सकाळी लक्षात आले की मी अपर्णाचा कॅमेरा backup म्हणून आणला होता तो काठमांडूच्या ब्यागेत राहिला म्हणून.. तो कॅमेरा मी कैलास मानस चे video shooting घेण्यासाठी वापरणार होते.. आणि त्याचे ४ cells extra होते त्यामुळे chargingची सोय झाली नसती तरी चिंता नव्हती.. इतकी नीट तयारी करून मी वेड्यासारखं तो कॅमेरा काठमांडूला विसरून आले होते.. आणि आता चिडचिड करण्यात काहीही अर्थ नव्हता.. अजून काय काय तिकडे राहिले आहे ते आता पुढे कळेल हळूहळू.. महेशला chargingबद्दल विचारलं तर तो म्हणला सागा पर्यंत सोय आहे,काळजी करू नकोस.. माझ्या कॅमेराची एक extra battery जवळ होतीच तरीही सागा नंतर फोटो कमी काढून कॅमेरा जपून वापरायचा असं मी ठरवलं.. बघूया म्हणलं..
चहा घेऊन झाल्यावर काका लोकांसोबत morning walkला गेले.. नदीच्या काठाशी कुठून जाता येतंय का पाहत होते पण रस्ता नाही मिळाला.. पुढे गेल्यावर दोरीने बांधलेला नदीवरचा पूल दिसला.. तो इतका हलत होता त्यामुळे माझं काही त्या पुलाच्या मध्येपर्यंत जायचं धाडस झालं नाही.. नंतर आमची शेरपा लोकांशी ओळख झाली.. १३ शेरपा आमच्या सोबत येणार होते.. आता यापुढची सूत्रे त्यांच्या हातात होती.. हे लोक नेपाळमध्ये हिमालय की गोद मै रहात असल्याने ट्रेकिंग मध्ये मास्तर असतात आणि त्यांना थंडीचा,उंचीचा बिलकुल त्रास होत नाही.. अगदी चपळतेने आणि प्रेमाने सेवा करणाऱ्या या लोकांबद्दल पुढे अजून सांगेनच..
नाश्ता करून आम्ही ७.३०ला तातोपानी सोडले.. लगेचच 2km वर बोर्डर वरचे कोलारी गाव लागले.. तिथे आम्ही बस सोडली.. थोडं चालत गेल्यावर नेपाळ-चीन 'मैत्री पूल' लागला.. त्या पुलाच्या मध्यावर एक रेघ होती.. रेघेच्या इकडच्या बाजूला नेपाळ आणि तिकडे चीन(तिबेट).. त्या भागात security अतिशय कडक होती.. पासपोर्ट बघूनच आम्हाला त्या पुलावर जायची परवानगी मिळाली.. कॅमेराला पूर्णपणे बंदी होती तिकडे.. तिथून पुढे मग immigration checking वगैरे झाले आणि finally आम्ही चीनमध्ये प्रवेश केला..
तिथे भयंकर गर्दी होती.. आणि सगळ्यात आश्चर्य वाटलं जेव्हा लहानांपासून म्हातारे लोक ग्यास सिलेंडर, मोठे पाण्याचे कॅन आणि असे अजून काही अवजड वस्तू पाठीवर घेऊन जाताना दिसले.. पोटासाठी काय काय करावं लागतं, खूप कसंतरी झालं ते दृश्य बघून..
इथून पुढचा प्रवास आता टोयाटो जीप मधून होणार होता.. एका जीप मध्ये ४ जण + १ शेरपा +  एक चीनी ड्रायवर.. अशा आमच्या १५ गाड्या होत्या.. आणि आमचा सर्व समान ट्रकमधून जाणार होतं..
आता तिबेट मधील प्रवास सुरु झाला.. इकडे ड्रायवर डाव्या बाजूला बसून उजव्या बाजूने गाडी चालवत होता त्यामुळे थोडं वेगळं वाटत होतं.. सभोवताली पर्वत रांगा आणि नदीचा प्रवाह.. इथले रस्ते चांगले होते.. शेर्पालोक सांगत होते की काही मागच्या वर्ष रस्ते खूप सुधारले त्यापूर्वी हा प्रवास फारच खडतर असायचा..
पुढे एकीकडे checking साठी गाड्या थांबवल्या गेल्या.. फोटो काढायला गाडीतून उतरले तर बाहेर भयंकर थंडी.. इथून पुढे थंडीच थंडी होती.. हळूहळू पर्वतांवर उंच झाडांऐवजी आता बारीक गवत दिसू लागले.. जसं उंचीवर जाऊ तसं oxygen कमी होतोना म्हणून..  पुढे मग पहिले हिमशिखर दिसले.. :)
साधारण १२.३०च्या आसपास आम्ही न्यालम ला पोहचलो.. हा उंचीवरचा पहिला टप्पा होतं.. कैलास मानस अति उंचावर असल्याने तिथे थेट गेल्यास त्रास होतो... म्हणून उंचीचे असे टप्पे ठरवले आहेत.. आपणास सवय व्हावी म्हणून एका टप्प्यावर  १ रात्र मुक्काम करून पुढचा टप्पा गाठला जातो..
न्यालम येथे उंचीमुळे हिरव्या ऐवजी मातकट ग्रे रंगाचे पर्वत दिसत होते.. इथे आल्या आल्या एव्हढे दिवस वाचत होतो,ऐकत होतो ती थंडी नेमकी कशी काय आहे ते कळलं.. रूम मध्ये आल्यवर आतून थर्मल्स, २  tops, jeans ,मग मोठा जाड स्वेटर, हातमोजे, पायमोजे, स्कार्फ आणि त्यावरून माकड टोपी इतका सारं  अंगावर चढवलं.. आणि  ABC advने चांगले उबदार आणि भरपूर कप्पे असलेलं  जर्किन दिलं तेही घातलं.. इथून पुढे जरा बडबड कमी करून शांत राहायचा होता, energy जास्तीत जास्त वाचवायची होती.. काही त्रास होत असल्यास विचारल्याशिवाय थेट कोणतीही गोळी घेऊ नका असं आम्हाला  सांगण्यात आलं.. इथे चार्जिंग आणि फोन दोन्हीची सोय होती त्यामुळे बरं वाटलं.. नंतर गरम गरम खिचडी+ पापड असे शेर्पानी बनवलेले जेवेन जेवलो.. इतक्या थंडीत त्यांनी सगळं सामान काढून लगेचच एव्हडा चांगला स्वयपाक कसा काय केला याचं मला भारी आश्चर्य वाटलं..
आतापर्यंत सगळं ठीकठाक होतं.. पण जेवण झाल्यावर मात्र माझं डोकं दुखायला लागलं.. उलटी होईल असं वाटू लागलं.. नंतर कळले कि जवळ जवळ जवळ सगळ्यांची डोकी जड झाली होती.. थोडा आराम केला पण नंतर उठवत नव्हतं.. चहा आला तेव्हा एव्हढ्या थंडीत तो गरम चहा मला जाईना.. नंतर लगेच सूप.. महेश आणि भीम भैयाची ऑर्डर होती की जात नसेल तरी सक्तीने सगळं खायचं प्यायचं.. लगेच जेवणाची वेळ झाली.. ताट हातात धरून मी कितीतरी वेळ तशीच बसले होते.. २ घास खाल्ल्यावर थेट बाहेर गेले आणि सकाळपासूनच सगळं बाहेर पडलं.. उलटी होताना माझं समोर लक्ष गेलं.. उंच शिखरावर तो चंद्रमा कधी ढगाआड तर कधी बाहेर लापाचापी खेळत होतं.. आकाशात असंख्य तारे लुकलुकत होते.. समोर इतके सुंदर दृश्य होते आणि मी मात्र उलटी करत होते!!!  छे,असा त्रास होणार असेल तर परिक्रमा कशी पूर्ण होणार असं मला वाटू लागलं.. भीम भय्या म्हणला डोकेदुखी,उलटी हि altitude sickness ची  common लक्षणे आहेत.. मग आम्हाला  diamoxची गोळी देण्यात आली.. आता आराम करा,उद्यापर्यंत  बरं वाटेल असं  ते म्हणले आणि आम्ही सर्वजण ९.३० वाजता गुडूप झोपून गेलो!!

मंतरलेले दिवस - ३० : ३

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 3: 7th June,11


Kathmandu -> Tatopani

सकाळी उठल्यावर हात बराच बरा होता.. :-) आता bag packing चे मोठे काम होते..  ABC advने डफर ब्याग दिल्या होत्या त्यात आता पुढील १०/११ लागणारे मोजके समान घ्यायचे होते.. extra सामान आणि पैसे इथल्या हॉटेल च्या लॉकर रूम मध्ये ठेवायचे होते.. माझ्याकडे तर extra पैसे नव्हते बुवा त्यामुळे जास्त भानगड झाली नाही..  सगळे सामान त्यांच्या ताब्यात देऊन आम्ही सर्वजण खाली जमलो.. नाश्ता करताना कैलास मानसला जाऊन आलेला एक ग्रुप भेटला.. त्या लोकांची परिक्रमा हवामान खराब असल्याने पूर्ण होऊ शकली नव्ह्ती.. त्याचं ऐकून आम्हाला वाटलं आता आमचं कसा होणार.. पण तिथला हवामान रोज सतत बदलत असता त्यामुळे इतक्यात निराश होऊ नका असे आम्हाला सांगितले गेले.. नंतर गुरुजी आले , रीतसर  पूजा झाली, सगळ्यांनी आरत्या म्हणल्या आणि हि यात्रा सुखरूप पार पडूदे असा मनापासून संकल्प केला.. आणि अशा रीतीने यात्रेला प्रारंभ झाला..
आता छोट्या बस मधून प्रवास सुरु झाला.. माझ्या बसमध्ये सगळे उत्साही मंडळी होते.. त्यांची भजने - गीते चालू झाली.. काठमांडू मधून बाहेर पडल्यावर हिमालयाच्या हिरव्यागार रांगा दिसू लागल्या.. सूर्य प्रकाश  मिळविण्यासाठी आकाशाकडे झेपावणारे उंच उंच वृक्ष दिसू लागले.. दूरवर पसरलेल्या मोठमोठ्या पर्वत्नाच्या रांगा.. आणि जवळूनच खळखळ वाहत जाणारी नदी.. किती पाहू अन किती नको असं मला होऊ लागलं.. दोन्ही बाजूनी उंच पर्वत, मधून वाहणारा  नदीचा प्रवाह आणि त्यात छोटासा अरुंद वळणं घेत जाणारा रस्ता असे ते विहंगम दृश्य, हलत्या बसमधून कितीतरी फोटोस काढायचे वेडे प्रयत्न मी करत होते.. काही ठिकाणी मात्र दरडी कोसळून रस्ता खराब झालेला दिसत होता..
नंतर जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो तिथली बाग आणि  खूप सुंदर होता.. तिथे असताना पावसाची एक हलकीशी सर आली आणि माझा आनंद दुणावला.. कारण ऐन जून मध्ये पाऊस सुरु व्हायच्या वेळेस मी पुण्याबाहेर पडल्याने मी पाऊस miss करेन असं मला वाटत होतं.. पण इथेही पाऊस बघून दिल खुश झालं..
४ च्या आसपास आम्ही तातोपानी या गावात पोहचलो.. इथून 'नेपाल-चीन' बॉर्डर (कोदारी) 2km वर आहे.. खरंतर आमचा  आजचा मुक्काम तिबेट(चीन) मधल्या न्यालम इथे ठरला होता पण काल (सोमवारी) चीनमध्ये कसली तरी सुट्टी असल्याने आमचे विसा तयार झाले नव्हते त्यामुळे आम्हाला बॉर्डर ओलांडून जाणं आज शक्य झालं नाही..ठरवलेल्या पेक्षा कितीतरी गोष्टी वेगळ्या होतात याची प्रचीती आता येऊ लागली.. असं ऐकण्यात आले की २५जुन नंतर चीन मध्ये काहीतरी कार्यक्रम असल्याने यात्रेसाठी कोणालाही परवानगी मिळणार नाही म्हणून.. ऑगस्ट मध्ये कदाचित पुढच्या तुकड्या जाऊ शकतील आणि नंतर तर सीजन संपतो.. हे असं आहे तर.. देव आपला आणि ताबा त्यांचा.. ते म्हणतील तेव्हढे दिवस आपण तिकडे जाऊ शकतो आणि उद्या त्यांनी बंद केला तर आपण सर्व त्या पवित्र सुंदर जागेला मुकणार.. म्हणूनच ज्यांना कोणाला हि यात्रा मनापासून करावीशी वाटते त्यांनी शक्य तितका लवकर plan करावा.. और फिर क्या पता कल हो न हो!!!
तातोपानी गावात गरम पाण्याचे झरे आहेत.. इथल्या हॉटेलचे लोकेशन १ no होते.. समोर उंच रांगा, खाली नदीचा शुभ्र फेसाळता प्रवाह.. नदी काठी शाळा होती ती जगातली सर्वात भारी शाळा आहे असे मला वाटले.. निसर्गाच्या सानिध्यात मुलांचं बालपण किती छान जात असेलना..
इथे एकेका रूम मध्ये आम्ही ४/५ बायका राहणार होतो.. या ट्रीपमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.. आमचा हॉटेलमध्ये एका दिवसाहून जास्त मुक्काम नसायचा पण रूम मध्ये गेल्यावर सगळ्याजणी उगाच सामान वरती काढून ठेवणार.. १०mins मध्ये रूमचा नक्षा पार बदलून जाणार.. आणि मग निघायच्या वेळेस तेच सामान आवरायचा उगाचच एक काम वाढणार.. साधं उदाहरण म्हणजे, दात घासून झाले की ब्रश आणि पेस्ट लगेच ब्यागेत ठेवून द्यावीना.. पण नाही, हे सगळं वरच ठेवायचं.. आणि नंतर ते सगळ् आवरण्यात उगाच वेळ घालवायचा.. मी एकदोनदा सांगून पाहिलं पण नंतर जाऊदे म्हणलं..  ज्याच्या त्याचा प्रश्न.. मला माझ्या आई बाबांमुळे सगळं लगेच जागेवर नीट ठेवायची सवय आहे खरंतर.. मी तेव्हढ्या मोकळ्या वेळात मग फिरून यायचे,फोटोस काढायचे..
चहा वगैरे आटपून आम्ही सगळा महिला मंडळ फिरायला निघालो.. नदीचा सततचा खळखळ आवाज मला आकर्षून घेत होता.. पण नदी थोडी खाली होती आणि आम्ही उंचावर.. मी जरा इकडे तिकडे गेल्यावर सगळ्या काकू-मावश्या मला जाऊन द्यायच्या नाही.. आईपेक्षा जास्त watch होता त्यांचा माझ्यावर.. :-)
नंतर currency exchange  वाला माणूस आला.. चीनमध्ये युओन चालते.. मी तर घोडा वगैरे करणार नव्हते त्यामुळे मला पैसे लागणार नव्हते पण जवळ असलेले बरे.. निसर्गापुढे आपला काही हट्ट चालत नसतोना.. 
आज रात्री माझी डायरी मी खळखळ नदी ऐकत पर्वतांच्या  कुशीत बसून लिहित होते.. ये श्याम मस्तानी मदहोश किये जाये हे गाणं मनात आपोआपच गुनुगुणत  होतं!!!

गुरुवार, २३ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : २

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव  


Day 2: 6th June,11


Kathmandu



ठरल्याप्रमाणे सकाळी ५ वाजता तयार होऊन खाली गेले तर बाकी सर्व मंडळी आधीच हजर होती.. मलाना जेष्ठ नागरीकांच नेहमी कौतुक वाटतं ते सगळे वेळेच्या बाबतीत तरुणांपेक्षा फार particular असतात.. मग आम्ही सगळे बसमधून विमानतळाकडे निघालो.. Mountain flight साठी छोट्या विमानात बसलो.. Mt Everest आणि अजून अशी शिखरे आता पाहायला मिळणार होती.. खूप ऐकलं होतं या बद्दल आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होतं..
इथे सर्वाना window seat होते.. विमान वरती जाऊ लागलं तसं काठमांडू छोटं दिसू लागलं आणि उंच उंच पर्वतांच्या हिरव्यागार  रांगा दिसू लागल्या.. इथली air hostess फारच गोंडस होती.. थोडं पुढे गेल्यावर हिमशिखरे दृष्टीक्षेपात आली तेव्हा मी तिला विचारलं Mt Everest शिखर कुठे आहे तर ती म्हणाली ते अजून पुष्कळ लांब आहे..
तिने मग दिसणाऱ्या त्या शिखरांची नावे सांगितली.. थोडं पुढे गेल्यावर 'कांचन गौरी' शिखर फार सुंदर दिसत होतं ,त्याच्यावरती थोडे ढग जमा झाले होते ते अगदी तुरयासारखे दिसत होते.. एकेकाला पुढे pilotच्या इथे जाऊन पुढून संपूर्ण चित्र बघण्याची संधी दिली जात होती.. मी पुढे गेले तेव्हा अगदी दूरवर Mt. Everest चे शिखर दिसत होते.. just like pyramid, त्रिकोणी आकाराचे शिखर अप्रतिम दिसत होते पण फारच लांबून.. मी त्या सर्वच हिमशिखरांना मनातून प्रणाम केला.. नंतर मग विमान वळून परतीचा प्रवास सुरु झाला.. शिखरांचे, ढगांचे किती फोटो काढू तेव्हढे कमी होते.. येताना आम्हा सर्वाना चक्क Moutain flight lifetime experience चे प्रशस्तीपत्रक दिले गेले!!!  total ४५ मिनिटांच्या या flight tourचा  खर्च 5000rs होता.. मी तर full 2 enjoy केले.. एव्हरेस्ट चे दुरून का होईन दर्शन होणे किती भारी गोष्ट होती.. पण काही जणांना उगाच ५००० rs वाया गेले असेही वाटले.. शेवटी हा ज्याचा त्याच्या आवडीचा प्रश्न,नाहीका..
या नंतर हॉटेलमध्ये येऊन नाश्ता वगैरे आटपून  local sightseeing ला निघालो.. बसमधून काठमांडू शहर बघत होते.. इथे खूप साऱ्या बागा आहेत असे जाणवले.. छोटे छोटे रस्ते आणि त्यावर गोरे गोरे नेपाळी लोकं.. बस वाला  hornच्या ऐवजी शिटी वाजवत होता.. इथे hornला बंदी होती का काय कोणास ठाऊक..
सगळ्यात आधी आम्ही ' बुढा नीलकंठ' या भागात गेलो.. इथे 'जल नारायण' विष्णूचे मंदिर आहे.. नीलकंठ नावाच्या शेतकऱ्याला खोदकाम करताना हि मोठी आडवी मूर्ती सापडली होती म्हणे.. पाण्यात बसवलेली ही मूर्ती खरंच खूप सुंदर आहे.. असे म्हणतात की त्या मूर्तीत ब्रह्म, विष्णू, महेश, श्रीराम आणि बुद्ध यासर्वांचे दर्शन घडते.. त्यांनतर आम्ही पशुपतीनाथ मंदिरात गेलो.. मोठा नंदी आणि त्यापुढे सोन्याचे कळस असलेले भव्य मंदिर.. आतून फोटो काढायला परवानगी नव्हती.. सोमवार होता म्हणून की काय पण मंदिरात प्रचंड गर्दी होती.. अभिषेक वगैरे च्या नावाखाली पैसे देऊन रांगेत पुढे घुसण्याची सोय होती.. गाभाऱ्यात मध्यवर्ती उंच पिंड होती आणि बाहेरू ४ बाजूनी दर्शन घेता येत होते.. ते सगळं छान होता पण दर्शन घेताना अतिशय धक्काबुक्की झाली..  seucrityवाला अक्षरशः हात ओढून प्रत्येकाला मागे खेचत होता.. त्याने नेमका माझ्या दुखऱ्या हाताला धक्का दिला आणि हात पुन्हा ठणकू लागला.. कोणीही कुठूनही घुसत होता त्यामुळे कोणालाच ती गर्दी आवरत नव्हती.. थोडी नीट व्यवस्था असली असती तर जरा शांतपणे दर्शन झालं असतं.. समाधान झालं नाही म्हणून मी पुन्हा एकदा गर्दीत घुसून दर्शन घेतले मग बरं वाटलं..
नंतर तिथेच जवळच्या दुकानात खरेदी साठी थांबवलं.. ट्रिपचा आधीच इतका खर्च झाला असल्याने मी खरेदी नाही करायचं ठरवलं होतं.. पण सर्वांनी ६ रुद्राक्षांचा सेट देवघरात पूजेसाठी घेतला मग मीही घेतला.. काठमांडू रुद्राक्षासाठी प्रसिद्ध आहेना..
दुपारी आराम केला.. त्यानंतर भीम भय्या प्रत्येकाच्या रूम मध्ये checking साठी जात होते.. पुढच्या  प्रवासात लागणारे  थंडीचे कपडे, शूज वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी तपासून पहायला आणि कोणाचा काही जास्त असेल तर त्यांना ते घ्यायला  सांगितलं..  माझी तयारी सगळी पुण्यातच झाली होती.. मी फक्त तिकडचं 'पोचू' - छोटीशी घडी होणारा मोठा रेनकोट घेतला.. ते लोक उगाच सर्वाना तिथून शूज घायला लावत होते.. मलाही म्हणले बर्फात तुझे शूज चालणार नाही म्हणून.. पण मी त्यांचा ऐकलं नाही, मला पूर्ण खात्री होती माझ्या शूज बद्दल.. :-) आमचं हॉटेल मार्केट मध्येच होतं.. थोडा  फेरफटका मारेपर्यंत संध्याकाळ उलटली.. जवळच सायबर कॅफे होतं पण मी तिकडे अजिबात बघितलं नाही.. एरवी नेट आणि मोबाईल चे व्यसन असलेल्या मला खरंच थोडा ब्रेक हवा होता..
रात्री दुख दबाव लेप लावून झोपले.. मी आणलेल्या सगळ्या औषधांचा या १६ दिवसात मला एकदातरी उपयोग करावा लागणार आहे असे उगाचच वाटून गेले..
 

बुधवार, २२ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव 
 
Day 1: 5th June,11

Pune -> Mumbai -> Kathmandu

किती दिवसापासून वाट बघत होते ती वेळ जवळ येत होती.. सकाळी ८ ची flight मुंबईहून पकडायची  होती.. ब्याग भरून रात्री ११ वाजता झोपून गेले होते.. १२ वाजता बाबांनी उठवला तेव्हा खरंतर कुठे जायचं आहे हे पूर्णपणे विसरून गेले होते.. पटकन फ्रेश झाले तोपर्यंत गाडी दारात आली.. बाबा विमानतळावर येत होतेच.. गाडीत  बसल्यावर आईला म्हणलं माझी अजिबात काळजी करू नकोस,जिथून शक्य आहे तिथून फोन करत राहीन मी.. :-)
कारवा काका आणि लोहगावकर काकूंची ओळख आधीच मीटिंग मध्ये झाली होती.. थोड्याफार गप्पा झाल्या..  लगेचच express wayवर एका पंपावर गाडी थांबवली.. ग्यास भरायचा होता तर ती वायर नेमकी तेव्हा ड्रायवर काढून तुटली गेली.. थोडावेळ त्याने फोनाफोनी केल्यावर पेट्रोल भरून गाडी पळू लागली.. रात्रीचा प्रवास, त्याला आधीच पाहता आला नाहीका हे असा विचार मनात येऊन गेलाच.. कारवा काकांच्या ओळखीची गाडी असल्याने आम्ही kk ऐवजी या गाडीने निघालो होतो..
ट्रिपचा उत्साह असल्याने झोप बिलकुल येत नव्हती.. इकडे तिकडे पाहत बोलत प्रवास चालू होता तोच वाशीच्या अलीकडे गाडी चक्क बंद पडली.. तो ड्रायवर इतका बिनधास्त होताना माझी चिडचिड झाली.. बर कारवा काका तर काहीच म्हणले नाही त्याला.. त्याचा काहीतरी फोनाफोनी चालू होती.. माझे बाबा वेळेच्या बाबतीत फार कडक शिस्तप्रिय आहेत.. त्यांनी काही म्हणायच्या आधी मी म्हणलं आपण दुसरी taxi करून जाऊया नाहीतर उशीर होईल.. काकुपण तेच म्हणल्या.. नशिबाने आम्ही टोलनाक्याजवळ होतो.. त्यामुळे लगेच taxi मिळाली आणि आम्ही वेळेत विमानतळावर पोहचलो.. इतक्या रात्री जर ती गाडी express way वर बंद पडली असती तर पुढे कसं काय झालं असतं या विचाराने आम्हाला कसेतरी झाले..
पुण्याहून येणारे ८/१० मंडळी सगळे पाहते ५ वाजता विमानतळावर हजर झाले.. मुंबईकर ६ नंतर जमू लागले.. सचिन travels च्या महेशने सर्वाना तिकिट्स आणि बाकीच्या गोष्टी देऊन सूचना दिल्या.. बाबापण असं कर तसं कर सांगत होते.. अशा रीतीने आत जायची वेळ झाली..
खरं सांगायचं म्हणजे इतके दिवस एव्हढी भटकंती करून देखील विमानाने प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ त्यामुळे मी फारच उत्सुक होते.. बोर्डिंगच्या इथे सीट नंबर देतात्ना मी म्हणलं मला window seat मिळेल का तर तिथल्या मुलीने एक गोड  smile दिलं,बास.. checking, immigration झाल्यावर पुष्कळ वेळ होता तेव्हा मी विमानतळ पाहून घेत होते.. आजूबाजूला सचिन चे लोक होते पण अजून कोणाशी विशेष ओळख झाली नव्हती.. शेवटी एकदाचं विमानात आत गेले आणि खिडकीची जागा बघून जाम खुश झाले.. मी एकटीच होते या गोष्टींची मला बिलकुल खंत नव्हती.. उलटं मी प्रत्येक अन प्रत्येक क्षण मनापासून जगत होते.. विमान जेव्हा आकाशात उडू लागलं तेव्हा मी एखाद्या लहान मुलाला जसा आनंद होईल तशी आनंदी झाले होते.. मुंबई सोडताना खाली अफाट समुद्राचे दर्शन झाले.. पुढे मग कधी ढगातून तर कधी स्वच्छ आभाळातून झेप चालू होती.. ढगांचे रूप पाहून वाटलं 'काळा काळा कापूस पिंजला रे' ही कल्पना अशा विमानप्रवासातच सुचली असणार..  समोर स्क्रीनवर सविस्तर मार्ग वगैरे पाहता येत होता..  आणि सगळ्यात best part म्हणजे जुन्या हिंदी मराठी गीतांचे, गझलांचे सुंदर collection होते .. गाणी ऐकत बाहेरचा निसर्ग अनुभव घेत होते.. बाकी  air hostess खायचं प्यायचं  देऊन सतत busy ठेवत होत्या..  नेपाळमध्ये प्रवेश होताच जमिनीचा भाग कमी होऊन हिरवेगार हिमालयाच्या रांगा दिसू लागल्या आणि मन अजूनच प्रसन्न झालं..
३ तासाच्या प्रवासानंतर साधारण ११ वाजता आम्ही काठमांडूला पोहचलो.. इथली वेळ भारतापेक्षा 15min  पुढे आहे.. विमानतळावर ABC adventure चे भीम भय्या, दीपक दा सर्वांचं स्वागत करायला आले होते.. इथे यात्रेकरूंचा हर घालून स्वागत केले जाते म्हणे.. त्यांनतर बसमधून आमची रवानगी काठमांडू च्या हॉटेल वैशालीमध्ये झाली..  महेशने सर्वाना एकत्र जमवून माहिती दिली आणि प्रत्येकाला rooms दिल्या गेल्या.. मी एकटीच असल्याने कल्पना काकू ज्या एकट्या आल्या होत्या त्यांच्यासोबत मला room मिळाली..
रात्रभर जागरण झालं होता त्यामुळे अंघोळ करून ताजे तवाने  व्हावे असं मी ठरवलं.. आणि काही कळायच्या आत बाथरूम मध्ये टबात जोरात आपटले.. धरायला काहीच मिळाला नाही त्यामुळे अगदी पूर्णपणे पडले.. पडल्यावर थोडावेळ काय होतंय ते काहीच कळलं नाही.. नंतर उठायचा प्रयत्न केला तेव्हा उजव्या हातात आणि डोक्याच्या मागच्या भागातून जोरात कळ उठली.. बास, चला आता थेट पुणे  गाठावं लागणार मला असं वाटू लागलं.. आई आई करत होते पण इथे जवळ आई नव्हती.. नंतर मनात 'ओम नम: शिवाय' म्हणले,मला पुढची यात्रा करायची आहे असे म्हणले.. आणि कशीतरी उठून बाहेर आले.. मग moov, spray, combiflame शक्य तेव्ह्ढ सगळं काही घेतलं.. जेवण करायला गेले तेव्हा माझी बातमी सर्वत्र पसरली होती.. आमच्या ग्रुपमध्ये २ डॉक्टर लोक होते त्यांनी हात बघितला, शिरा दाबून बघितल्या.. हे कर ते कर सांगितलं..  जेवणानंतर मात्र लगेचच  मी झोपेच्या अधीन झाले..  संध्याकाळी मीटिंग होती तेव्हा खरतर हात दुखत होता पण मी तिकडे जास्त लक्ष द्यायचं नाही असं ठरवून टाकलं होतं..
सचिनचे ३५ आणि सिमास चे १५ असे मिळून आम्ही ५० लोक आता ABC Adventure च्या ताब्यात होतो.. इथून पुढे सगळा  control ABC adventure यांचा होता.. सिमास चे चेअरमन केळकर काका यांच्याशी पुढे माझं चांगला जमला.. त्यांनी अगदी स्वतःच्या मुलीसारखी माझी काळजी घेतली अगदी शेवटपर्यंत..  मीटिंग मध्ये ईश्वर सरांनी आम्हाला पुढच्या प्रवासाची, सोयींची अगदी सविस्तर माहिती दिली.. पुढे कुठे कशी काय काय काळजी घायची नीट समजावून सांगितले.. वाटते तितकी सोपी नाही आणि तेव्हढी कठीण सुधा नाही अशी ही यात्रा कायम +ve approach ठेवला तर नीट पार पडते असे त्यांनी सांगितले..
अशा रीतीने पहिला दिवस बराच मोठा आणि महत्वाचा असा होता.. पुढे सगळं कसं  काय काय होईल असा विचार करत मी गाढ झोपून गेले..