सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

आताशा मी मनाला एकटं कुठे सोडत नाही..


कधी भारावतं
कुठे अडकतं 
मग हरवतं 
अन वेडावतं  
शेवटी माझ्याच हृदयाची धडधड वाढवतं..
म्हणून हल्ली मी मनाला एकटं कुठे सोडत नाही.. 


कधी उडतं 
कुठे धावतं 
मग पडतं 
अन लागतं 
शेवटी माझ्याच डोळ्यात पाणी आणतं.. 
म्हणून हल्ली  मी मनाला एकटं कुठे सोडत नाही.. 


कधी भासतं
कुठे वाहतं
मग खेळतं
अन रंगतं 
शेवटी माझ्यापासूनच परकं होऊन जातं.. 
म्हणून हल्ली  मी मनाला एकटं कुठे सोडत नाही.. 

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

सुदाम्याचे पोहे - ६

आपण आपल्या घरचे, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींसाठी नेहमीच काहीना काही चांगलं करायचा प्रयत्न करत असतो.. तरीही नकळत काहींसाठी करायचं राहून जातं आणि मग  पुढे नंतर कधीतरी  खंत वाटते..  उमेशच्या बाबतीत असंच काही झालं.. त्याचं नुकतच लग्न झालंय.. तर त्याला व त्याच्या सहचरणीला नव  जीवनासाठी  शुभेच्छा देण्यासाठी हा लेख लिहित आहे..  त्याच्या लग्नाला जाऊ न शकल्याने तो पुण्यात आला की माझ्याकडे बघून घेणार आहे.. त्याचा राग थोडा कमी करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न..

पूर्वी काही दिवस आम्हा थोड्या लोकांची  काही  दिवसांसाठी magarpatta  येथे रवानगी करण्यात आली होती.. तिथे असताना एक दिवस हा उमेश येऊन म्हणाला '  madam ओळखलं का?' मी तुमच्या कॉलेज मधला विद्यार्थी.. hsbc मध्ये येण्याआधी मी माझ्याच कॉलेज मध्ये lecturer  म्हणून काम केले होते, मला instru dept चे  सगळे विद्यार्थी नीट  माहिती होते.. मग हा कोण..  लगेचच तो म्हणाला.. मी 'computer dept ' मध्ये होतो.. तुम्ही आमच्या lab मध्ये  practicals घ्यायला यायचा.. तुम्ही मला पाहिलं नसेल पण मला तुम्ही आठवता.. अशा रीतीने आमची ओळख झाली आणि गप्पा सुरु झाल्या.. त्याचा स्वभाव खूप बोलका.. कधी जाता येता त्याची अखंड बडबड चालू असायची.. थोडे दिवसांनी मी त्याला बजावलं  madam म्हणू नकोस रे ,एकतर मी तुला शिकवायला कधीच  नव्हते आणि आता हे कॉलेज नाहीये..  :)

नंतर आम्ही कल्याणी नगरला आलो.. त्याने त्याच्या एका मैत्रिणीशी ओळख करून दिली,स्मिताशी.. आणि तेव्हापासून आमचा तिघांचा चहाच्या टपरीवर मस्त अड्डा जमायचा.. त्याच्यासोबत चहा प्यायला जाताना मी आणि स्मिताने चुकून कधी wallet पैसे घ्यायचे कष्ट घेतले नाही.. आमच्या तिघांच्या मैत्रीमध्ये एकदम मोकळेपणा आहे.. आम्ही कधीच बाहेर खास भेटलो नाही;कुठे जेवायला नाही गेलो, भटकायला नाही गेलो पण तरी आमची मैत्री निखळ आणि अतूट कधी झाली हे समजलंच नाही.. सगळं श्रेय त्या टपरीवाल्याला द्ययाला हवं.. ;)  

वयाने लहान असला तरी कीर्तीने hsbc मध्ये बरंच महान असलेल्या उमेश बद्दल सांगायचं तर तो एक हुशार आणि हरहुन्नरी मुलगा.. कामात त्याचे seniors त्याला मदत मागायचे.. tl तर त्याच्या हाताखालचा होता म्हणे.. hsbc मध्ये सगळ्यात जास्त काम हा करत असावा.. कायम busy.. तरीही कधी हाक मारली की मदतीला कायम धावून यायचा.. sir मध्ये जवळ जवळ २ वर्ष US onsite गेले होते.. त्याला music  खूप आवडतं, specially English songs..  त्याचं वाचनही बरंच आहे.. आम्ही खुपदा पुस्तकांवर चर्चा करायचो.. आणि माझे कसलेही mails अगदी वेळ काढून वाचायचा आणि अजूनही वाचतो.. स्मिता आणि मी trekking ला एकत्र असायचो तिथे मात्र उमेश आला नाही कधी.. सिंहगड ला घेऊन जाणार होता आम्हाला,अजून plan च करतोय तो.. 

उमेश मुळचा  बीड चा आहे.. त्याच्या घरच्यांशी मी कधी भेटले नाहीपण तो नेहमी त्यांच्याबद्दल बोलत असतो.. तो त्याचं सगळं मोकळेपणाने नेहमीच सांगतो.. सहसा मुला अशी मनातलं सगळं सांगत नाहीना..  पण त्याला मात्र  मी फार खडूस, हट्टी आणि पटकन रागवणारी मुलगी वाटते.. :( त्याचबरोबर त्याला  मी सोज्वळ, सुशील, चांगली मुलगी वाटते हा त्याचा एक मोठा गैरसमज आहे..  

अशातच त्याचा लग्न ठरलं आणि मला स्मिताला त्याची खेचायला चांगलं कारण मिळालं..   त्याची बायको 'श्रेया' खूप छान असं ऐकलय.. पण तो तिच्याशी आमची ओळख करून द्यायला थोडा घाबरत आहे, आम्ही काय भरवू तिला याची त्याला खात्री नाही वाटत.. hahaha.. या नवीन दाम्पत्याला माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा!! 

खरंतर  मला मैत्रिणी ढिगाने आहेत आणि  मित्र फार मोजके आहेत,पण सगळेच एक से एक.. उमेश शी बोलताना नेहमीच जाणवत की या जगात कोणीतरी आहे ज्याला आपल्याशी बोलावं वाटत, जो आपल्यासाठी थोडा  वेळ काढायला कधीही तयार असतो..  प्रत्यक्ष भेट झाली नाहीतरी या भावनेचा खूप आधार वाटतो.. Thanks Umesh!

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

सांजक्षण..


तळपता सुर्य लपु लागला..

                डोंगराआड


सांडू लागला केशराचा सडा..
                पश्चिमेस


परतु लागला घरी..
                पक्षांचा थवा


जाणवू लागला हवेत ..
                सुखद गारवा



 एक एक तारा चमकू लागला..
                आकाशात



रातराणीचा सुगन्ध ..
                रातकिड्यांचा आवाज



 खेळ दिसू लागला..
                अस्पष्ट आकृत्यांचा



तेवु लागला तेजोमय दिवा ..
                देवासमोर



 चेतवुन गेला मज..
                तो सांजक्षण ..! 

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

मंतरलेले दिवस - १६

ऋतुपर्ण

दुतर्फा  उंच  उंच  झाडी,नागमोडी  रस्ता, मध्ये  मोठा  हिरवगार  बगीचा,वेगवेगळी सुंदर  फुले,फुलपाखरं   ,खारू ताई आणि  विविध पक्षी..  निसर्गाप्रेमिसाठी  infy best आहे.. आज  नेहमीसारखं  इकडेतिकडे  बघत चालले होते  तेव्हा  जाणवलं कि  झाडांची  पाने  सर्वत्र  पडलेली  आहेत.. पिवळसर  लालसर  अशी  वाळलेली  पाने.. वरती  झाडाच्या  शेंड्याकडे  लक्ष  गेलं  तेव्हा  पिकलेली कितीतरी  पर्णे दिसली.. थोडा  वारा  आला  तरी  ती  सहज  गळून  पडत  होती..  अरेरे या गर्द  सावली  देणाऱ्या  तरूंचा  लवकरच  चेहरा  बदलेल  आता.. इतके  दिवस  डोलणारी ती  पाने  एकेक  करत  गळत असतील  तेव्हा  त्या  झाडांना  कसं  वाटत  असावं.. अन  त्या  पर्णाना  वाईट  वाटत  असेल  का  बरं त्यांच्या वृक्षांना  सोडून  जाताना..   पण  नवीन  पालवी  फुटण्याआधी  सुकलेल्या पानांना  गळावच  लागतं  हा  निसर्गनियम  आहे ना.. कवी गोविंद यांनी म्हणले आहे..
जुनी इंद्रिये, जुना पिसारा.. सर्व सर्व झडणार हो..  
नव्या तनुचे, नव्या शक्तीचे.. पंख मला फुटणार हो..
सुंदर मी होणार..


माझ्याही  मनातील  अशी  कितीतरी  पानं  गळू  लागली  आहेत.. हा  उन्हाळा  कधी  कधी   खूप  भकास  वाटतो..   तरीही  कधी  ना  कधी  नवीन  पालवी  फुटून  मनवेल पुन्हा  बहरून  जाईल  एव्हढी   अशा  मात्र  नक्की  आहे..   ऋतूचक्र हे  फिरतच  राहणार,त्यावर 
 स्वतःलाच स्वतःचा  तोल  सांभाळावा  लागतो.. आणि प्रत्येक ऋतूची काहीतरी खासियत नक्कीच असते तिचा आनंद घेणं आपल्या हातात असतं,नाहीका..  सध्यातरी  मी  गळलेल्या  पानांमधली   काही  खास  पाने  हृदयाच्या  वहीत  जपून  ठेवायचे   प्रयत्न   करत  आहे.. :)
जो भी लिखा है दिल से जिया है..
ये लम्हा फ़िल्हाल जी लेने दे..

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

देणं घेणं..

काहींचा जन्म असतो.. घेण्यासाठी..
तर काहींचा फक्त..  देण्यासाठी..


घेणारे.. पोटभरून घेत जातात..
देणारे.. भरभरून  देत जातात..


घेणाऱ्याला मिळतो तो..  आनंद..  क्षणिक..
देणाऱ्याला मिळते ते..  समाधान..  चिरंतन...!!!