रविवार, ३ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १६

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 16: 20th June,11


Kathmandu -> Mumbai -> Pune


आता चेहरा ओळखूयेण्या इतपत सुधारला होता..थोडी सर्दी - कफ होता ती तर मला पुण्यातही होतेच..  बाकी काही त्रास झाला नाही..
सकाळी नाश्ता करून काठमांडू विमानतळ गाठले.. 'ने मजसी ने परत मातृभूमीला' अशी अवस्था झाली होती आता.. विमानात खिडकीची जागा मिळाली नाही आणि शिक्षा दिल्यासारखे मी बसले होते तिथे खिडकी नव्हती.. गाणी आणि सिनेमा बघत, खात पीत विमान प्रवास झाला.. कितीतरी आठवणी मनात रेंगाळत होत्या..
दुपारी मुंबईला पोहचल्यावर जाम खुश झाले.. एव्हढे दिवस बाहेर मी पहिल्यांदाच एकटी राहिले होते त्यामुळे घरी कधी जाईन असे झाले होते..
मुंबई विमानतळावर मुंबईकरांचे नातेवाईक त्यांना भेटायला आणि घरी घेऊन जायला आले होते.. मी मुंबईत का राहत नाही मग माझे आई बाबापण आले असते असं उगाच  माझ्या बालमनाला वाटून गेलं.. एका कुटुंबाने आम्हा सर्व यात्रेकरूंचे फुले देऊन स्वागत केले.. आता कोणालाही थांबायचं नव्हतं.. लगेचच सगळे वेगळ्या दिशेत पसार झाले..
येताना गाडीचा प्रकार झाला होता त्यामुळे आता पुण्यात जाण्यासाठी बाबांनी शिस्तीत के के चे बुकिंग केले होते.. लोहगावकर काका काकू , करवा काका आणि मी असे पुण्याच्या प्रवासाला एका गाडीतून निघालो.. नाही नाही अजून ट्रीप संपली नव्हती.. आता express  way लगतचे धबधबे, ढगात बुडलेला लोणावळा खंडाळ्याचा घाट.. आणि मध्येच थांबून खाल्लेला गरम गरम वडापाव आणि चहा.. आहा,ये हुई ना बात.. :) गाडीमध्ये पूर्णवेळ ट्रीप मधल्या गप्पाटप्पा, आठवणी.. अशा रीतीने रानजाई रेसिडन्सी कधी आलं समजलंच नाही!!!


२ टिप्पण्या:

अमोल नाईक म्हणाले...

नमस्कार वृंदाली,
सर्वप्रथम तुझं अभिनंदन, कैलास परिक्रमा एकटीने तीही पायी पूर्ण केल्याबद्दल. सगळ्या दिवसांची रोजीनिशी वाचून काढली आणि तुला खरं सांगतो, तुमच्याच गटात मी होतो अशी माझी भावना झाली. खूपच अप्रतिम वर्णन केले आहेस. आठव्या दिवसाच्या वर्णनात "खरा सांगू तेव्हा
माझ्या डोळ्यातून आपोआप घळाघळा पाणी वाहू लागले.. महादेवाला म्हणलं आज तुझी पूजा
करण्यासाठी माझ्याकडे फक्त माझे अश्रु आहेत,तेच वहाते तुला.." हे जेव्हा वाचलं ना तेव्हा माझेपण डोळे भरून आले होते.
अतिशय सुंदर ... तुझ्या पुढच्या प्रवासाला आणि लेखनाला भरपूर शुभेच्छा !!

--
अमोल नाईक
82.amol.naik@gmail.com
http://clubdongaryatra.blogspot.com

वृंदाली.. म्हणाले...

thank u Amol.. :)