रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

रूक्मिणी स्वयम्वर..

पूर्वीच्या काळी ईच्छित वर प्राप्तीसाठी मुली 'रूक्मिणी स्वयम्वर' पोथी चे वाचन करायच्या.. त्यापद्धतीने एक दिवस माझ्या आजीनेही मला ती पोथी वाचायला दिली.. मला मुळात वाचनाची आवड आहे.. त्यातून हा विषय थोडा interesting होता, म्हणलं वाचून बघावं,काय हरकत आहे.. आतापर्यंत ही गोष्ट इकडून तीकडून ऐकली होती त्यामुळे अगदीच नवीन नव्हती.. पण या पोथितुन बरच खोल वर्णन वाचायला मिळालं..
विदर्भातल्या भीष्मक राजाची 'रूक्मिणी' ही एकदम बुद्धिवान,रुपवान,शीलवान आणि उदार मनाची अशी एकुनति एक कन्या.. त्याच्या राजवाड्यात बरेच सधुसन्त कीर्तन करायला यायचे.. त्यांच्याकडून रूक्मिणिने श्रीकृष्णबद्दल बरच ऐकला होता.. कोणी त्यांच्याबादल सांगायला लागला की तिला अजुन ऐकावसं वाटे.. श्रीकृष्णांच्या किर्ती,रूप, ऐश्वर्य आदी गुणांनी ती खुपच प्रभावित झाली होती.. लग्न करेन तर श्रीकृष्णांशीच असं तिने मनोमानी ठरवलं होतं.. पण तिच्या बंधूंनी तिचं लग्न शिशुपालाशी ठरवून ठेवलं होतं.. रूक्मिणी एक राजकुमारी होती, खंबीर मनाची होती.. तिच्या विश्वासातल्या सुपात्र ब्राम्हणाला तिने एक पत्र लिहून श्रीकृष्णांना सुपुर्त करायला सन्गितलं..
ही कथा वरवर पाहता साधी वाटते.. पण मला रुक्मिणिच्या धाडसाचे फरच कौतुक वाटतं.. त्या काळी मुली उंबरठा ही ओलांडून जात नसत.. तरी खास पत्र लिहून श्रीकृष्णांना निरोप पाठवायचा तिला कसं सुचलं असेल.. त्या ब्राम्हणावर किती विश्वास ठेवावा लागला असेल,त्याने मधेच कुठे बातमी फोडली असती तर.. आणि तो निरोप वेळेत मिळणं खूप मह्त्वाचं होतं.. इकडे रूक्मिणी-शिशुपालाच्या लग्नाची जोरात तयारी चालू होती.. त्या काळात दळणवळणाचं विशेष साधन नव्ह्तं.. विदर्भ ते द्वारका असा प्रवास त्या ब्राम्हणाने खडतर प्रवास कसा संपवला असेल..
शिवाय रूक्मिणिने केवळ श्रीकृष्णांबद्दल ऐकलं होतं.. ते पत्र वाचून श्रीकृष्ण कशी प्रतिक्रिया करतील , ते वेळेत येतील का वगैरे कितीतरी प्रश्‍न तिच्या मनात आले असतील.. तिने पत्रात सरळ सरळ लिहिलं होतं की इथून माझं हरण करून पाणिग्रहण करावं..माझी शिशुपलाशी लग्न करायची मुळीच इच्छा नाही त्या अगोदर इकडे यावं.. एव्हढच म्हणून ती थांबली नव्हती तर कुठून पळवणं सोपं जाईल अशी सोयीस्कर योजना तिने श्रीकृष्णांना पत्रातून सविस्तरपणे कळ्वली होती.. यालाच 'settings' म्हणतात !!! :) त्या काळी लग्नाच्या आधी देवीच्या मंदिरात जायची पद्धत असायची त्या वेळेस त्या मंदिरात तिचे बंधू वगैरे नसतील तर तिथून पळवता येईल अशी बीनचुक आखणी तिने केली होती.. आणि नंतर अगदी तसंच घडलं हे विशेष..
असं म्हणतात की रूक्मिणी लक्ष्मी देवीचा एक अवतार आणि श्रीकृष्णंबद्दल वेगळं काही सांगायला नको.. तरीही त्याकाळात एका स्त्रीने प्रेमात पडून एका पुरुषाला पत्र लिहावं आणि पळून लग्न करायची योजना आखणं याचं मला थोडा जास्तच नवल वाटलं! :))

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: