रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

लहानपण देगा देवा!!! :)

शनिवार संध्याकाळी घरजवळच्या टेकडीवर फिरायला गेले होते.. मनसोक्त भटकून, सूर्यास्त आणि चन्द्रोदयाचे दर्शन घेऊन घरी परतत होते.. त्या टेकडीच्या आसपास नवीन बांधकाम चालू आहेत.. रस्ता छोटा आणि कडेला मोठमोठ्याल्या इमारती.. तिथेच कुंपणापालिकडे बांधकाम करणार्‍या लोकांची वस्ती.. वीकेंड ईव असल्याने साहजिकच रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होती..
एकएकी तारेच्या कुम्पणातुन एक छोटसं गोंडस पोरगं रस्त्यावर धावत सुटलं.. नुकतच चालयलां लागलं असेल कदाचित.. अंगावर एकही कपडा नव्हता,उन्हामुळे काळवन्डलं होतं.. त्याच्याकडे बघेस्तोवर मागून एकदम एक कार जोरात आली.. एव्हद्या लहान रस्त्यावर इतका वेग कसा असा म्हाणेपर्यंत ते छोटासा पोर रस्त्याच्या मधे.. अचानक काय करावं सुचलं नाही.. मग मी त्या गाडीला हात करून थांबवला आणि बाळाचा हात धरून कडेला नेलं.. त्या अवघ्या क्षणात काहीही घडू शकलं असतं,तो कारवाला ही थोडा घाबरला होता.. पण पण याची त्या मुलाला किंचिती कल्पना नव्हती.. त्याला मी धरलं तेव्हा त्याने इतकं गोड स्माइल दिलं की ते आता अठवलं तरी माझया चेहर्यावर आपोआप हास्य खुलत आहे.. :-)
तो मुलगा पुन्हा रस्त्यावरच पळत होता.. त्या कुंपणाच्या पलीकडे झोपडितल्या बाईला म्हणलं मी की या मुलाकडे लक्ष द्या,जोरात गाड्या येत आहेत.. ती बाई चुलीवर भाकरी थापात होती.. जोरात ओरडून बोलली की ‘इसका बाप कूच ध्यान नाही देता,मै कहा कहा देखु..’ तिचा बोलणं ऐकून त्या मुलाचे वडील आले तेही ओरडत की.. ‘एछोकरे रस्तेपे क्यो खेल राहा है..’ त्याने अलगदपणे त्या बाळाला उचलून कुम्पणाच्या आत घेतलं.. एव्हढं सगळं होत असताना त्या बाळाला कशाचही भान नव्हतं.. आई वडील काय ओरडत आहेत किवा रस्त्याच्या जोरात गाड्या या कुठल्याच गोष्टीचा भय नव्हता त्याला..
खरच बालपण सगळ्यात सुखाचा असतंना.. ना कसली काळजी,चिंता,भीती,शंका,संशय, ना कसले प्रश्‍न.. त्याना खेळायला काहीही चालतं.. कुठेही असलेतरी ते आपल्याच विश्वात हरवलेले असतात.. त्या मुलाचा तो निरागस चेहरा अजूनही माझया डोळ्यसमरून हलत नाहीय..!!!:-)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: