रविवार, ३० जानेवारी, २०११

मंतरलेले दिवस - १५


एक अनोखी साहित्यसहल..

२०११  सुरु  झालं... नवीन  वर्षाची  सुरुवात  एका चांगल्या ट्रिप ने करावी  अशी  माझी  फार  इच्छा  होती.. मैत्रीणीना  विचारलं  , नेहमीप्रमाणे  कोणालाही  वेळ  नव्हता.. घरच्यानाही  जमलं  नाही.. त्यामुळे  मला  थोडं  बोर  होत  होतं.. पण  आता  कसलाही  अट्टहास  करायचा  नाही  असा  माझा  नवीन  वर्षाचा  संकल्प  असल्याने  मी  शांत  होते.. hahaha.. अशातच   दीपालीचा  फोन  आला  'शिरीष  पैना  भेटायचा  बेत  चालू  आहे,येणार  का.. थोडं  हो  नाही  करत  एकदाचं  पक्कं  ठरलं..

शुक्रवारी  रात्री  बरीच  फोनाफोनी  झाल्याने  शनिवारी  पाहते  मी  कशी  उठणार  हा  प्रश्न  होता.. पण  अशा  वेळेस  गजर होण्या आधी  आपोआप  जाग  येते.. :) रिक्षा  घेऊन  दीपालीच्या  इथे  जायचे  होते.. पण  रिक्षावाल्यांशी  माझं  कधीही  पटत  नाही  ना  कधी     पुढे   पटेल.. सकाळी  ६च्या सुमारास  दीडपट  भाडं  का  म्हणून  द्यायचं.. एरवी  मी  बसने  गेले  असते  पण  आम्हाला   जरा  लवकर  पोहचायचा  होतं.. शेवटी  एक  रिक्षा वाला  meter च्या  भाड्याने  तयार  झाला.. वाटेत  शीतल  थांबली  होती.. तिचं  parcel मुंबईला   पोहचवायचं   होतं.. काही  खास  निरोप  द्यायचाय का तिकडच्याना  असं  तिला  म्हणल्यावर ती  गोड  लाजली.. :) पुढे  दीपालीला  घेऊन  रिक्षा  स्टेशन  कडे  निघाली.. रिक्षेने  थोडा  त्रास  दिल्याने  आम्ही  वेळेवर  निघूनही  जरा  उशीर  झाला.. वैद्य  सर, अंजली  ताई  हे  आधीच  येऊन  थांबले  होते.. लगेच  ७ च्या  बसने  आमचा  'पुणे  मुंबई  पुणे ' प्रवास  सुरु  झाला.. 

हा  प्रवास  खूप  वेगळा  होता.. माझ्यासोबत  सगळे  थोर  मंडळी  होते.. वैद्य  सर  (रमेश  वैद्य ) हे  जेष्ठ  कवी, त्यांची  पुस्तक ,कार्यक्रम  तर  होतातच  शिवाय  ते  दरवर्षी  काव्य सप्ताह आयोजित  करतात.. ते  इतके   मोठे  असूनही एकदम  साधे  आहेत,कुठलाही  दिखाऊ पणा नाही.. वैद्य  सर  आणि  शिरीष  ताईंचा   जुना  परिचय.. त्यामुळे  आम्हाला  त्यांना  भेटण्याची  संधी  मिळत  होती..  अंजली  ताई  (गीतांजली  जोशी) यांच्याशी माझी   ओळख मागे   शब्दवैभव  मंडळात  झाली होती.. त्या  स्वतः  मोठ्या  कवियत्री  आहेतच  आणि त्या  ना  सी  फडके  यांचा  कन्या  आहेत.. पण  त्यांच्याशी  बोलताना  कुठेही  कुठला  अहंकार  जाणवत  नाही.. लोक  जसं  उंचीवर  जातात  तेव्हढ   त्यांचं  मन  मोठं  होत  जातं  असं  म्हणतात.. आणि  दीपाली.. माझी  hsbc मधली  छान  मैत्रीण.. ती  कवितेसाठी  खूप  काही  करत  असते.. तिच्याकडे  बघून  मला  नेहमी  वाटतं  कि  मी  तिच्या  १ /४  पण  काही  करत  नाही.. :( हळू हळू शिकायचं आता तिच्याकडून.. 
तर  असा  आमचा  मस्त  group होता.. बसमध्ये  आम्ही  एका  रांगेत  बसल्याने  बस  कधी  सुटली  आणि  दादरला  कधी  पोहचली  खरच  कळलं  नाही.. ते   तिघं  त्यांच्या  छान  छान  आठवणी  सांगत  होते  आणि  मी  ऐकत  होते.. पूर्ण बसमध्ये  आमचाच  आवाज  होता.. आयुष्यातली  माझी  हि  पहिली  वेळ  असेल   जेव्हा  मी  माझी  माझी  गाणी  ऐकत  बाहेर  बघत  प्रवास  करत नव्हते.. तरुणांना  लाजवेल  असा   आमचा  साहित्यिक  दंगा  चालू  होता.. मध्ये  अधे  खाणं पिणंही  जोरात  चालू  होतं.. :)  फडके  आणि  अत्रे  यांच्यात  पूर्वी  थोडे वाद  होते  पण  त्यांच्या  दोघांच्या  पत्नींची  चांगली  मैत्री  होती  असं  अंजली  ताई  सांगत होत्या.. अशा  बऱ्याच  जुन्या  आठवणी  ऐकण्यात  दादर  कधी   आलं कोणालाच समजलं नाही..
दादरला अमित  (शीतलचा  नियोजित  वर) आधीच येऊन थांबला होता.. त्याची  सगळ्यांशी  ओळख   करून  देऊन त्याला  त्याचे  parcel सुपूर्त केले  आणि  मग  त्याने  आम्हाला  शिरीष  ताईंच्या   घरापर्यंत  सोडलं..  सगळ्यात  जास्त  गोष्ट  मला  जी  आवडली  असेल  ती  म्हणजे  शिरीष  पैंच्या   घराचं  location.. त्यांच्या  घरापासून  समुद्र अगदी  हाकेच्या   अंतरावर.. नंतर  आपण  समुद्रावर  जाऊया  असं  मी  म्हणाल्यावर  सगळे  हो  म्हणले.. मी  लहान  होते  सगळ्यात  म्हणून  माझे  'खिडकीची  जागा, सागर भेट' वगैरे असे  सगळे  हट्ट  पुरवले  गेले.. :) 

सांगितलेल्या  वेळेत  म्हणजे  ११वाजता  आम्ही  शिरीष  ताईंच्या  घरी  पोहचलो.. त्यांच्या  घरी  त्यांची  मुलं,नात ,नातसून  सगळेच  वकील  असल्याने  बाहेर  वकिलांच  office होतं,तिथे  बरीच  गाद्री  होती.. तिथून  आत  गेल्यावर  मोठ्या  दालनात  शिरीष  ताई  बसल्या  होत्या.. मीतर  त्यांना  पहिल्यांदाच  पाहत  होते.. ८०+ वयाच्या  असूनही  एकदम  टवटवीत  हसरा  आणि  तेजोमय  असा  त्यांचं  चेहरा.. त्यांच्या  personality ने  मी एकदम  प्रभावित  झाले.. वैद्य  सरांनी   आमची  सगळ्यांची  ओळख  करून  दिली.. अंजली  ताईंनी  त्यांना  त्यांच्या  कवितेचा  प्रवास  कसा  होता  हे   विचारलं  आणि  मग  गप्पा   खऱ्या  अर्थाने  रंगू  लागल्या..
शिरीष   ताईचं   बालपण  पुण्यात  गेलं.. तेव्हा  शाळेत  लिहिलेल्या पाह्लील्या  कवितेच्या  ओळी  त्यांनी  ऐकवल्या.. आम्हाला  कमाल  वाटली  त्यांच्या  स्मरणशक्तीची.. मग  त्यांनी  अत्रेंबद्दल  सांगितलं.. त्यांच्या  घरी  खूप  मोठ्या  मोठ्या  लोकांच्या  माफिली  कशा  व्हायचा  आणि  त्याचा  परिणाम  शिरीष  ताईंवर  कसा  होत  गेला  हे  त्यांनी  सुंदर रित्या सविस्तरपणे  सांगितला .. college मध्ये त्यांनी  बऱ्याच  कविता  लिहिल्या  होत्या  पण  त्या  कविता  म्हणजे  त्यावेळेच्या गाजलेल्या  कवींची  copy होती  असा  त्या  अगदी  मोकळेपणाने  म्हणल्या.. नंतर  लग्न  झालं ,मुले  झाली.. मुलांचं  संगोपन  करताना  त्यांनी  बालकविता  लिहिल्या  त्या  खूप  प्रसिद्ध  झाल्या.. नंतर  त्यांची  पुस्तके  निघाली.. एकदा केशवसुत  पारितोषिक  त्यांना  आणि सुप्रसिद्ध कवी  कारांदिकाराना  विभागून  मिळालं  अशा  बऱ्याच  आठवणी  त्यांनी   सांगितल्या..त्या  काळात  अत्रे  मराठा  चालवायचे.. त्यांना  किती  अडचणी  आल्या  हे  ऐकताना  आम्हीच  खूप  हळवे  झालो.. आपल्याला  लांबून  वाटतं  ही  मोठी  लोकं,  त्यांचं  सगळं  चांगलं  असतं.. पण  त्यानाही  खूप  सोसावं   लागलंय  हे  ऐकून  कसंतरी  झालं.. 
सगळ्यात  जिव्हाळ्याचा  विषय  होता  तो  'हायकू'.. एकदा  त्यांना  विजय  तेंडुलकरांनी  मुळचा  जपानी  भाषेतलं  हायकूचा  पुस्तक  दिलं  आणि  त्या हयाकुच्या प्रेमातच पडल्या.. मग  त्यांनी  खूप  हायकू  लिहिले.. आम्हाला  हायकुबदल  बरीच  माहिती  मिळाली.. ३  ओळीत   खूप  काही  सांगून  जाणारा  हा  काव्य  प्रकार  खूपच  भावला.. मराठीमध्ये  हायकू  शिरीष  पैनी  आणला  आणि  त्यांच्याकडून  प्रत्यक्ष  हायकू  ऐकायचा  भाग्य  आम्हाला  लाभलं!!! 

इतक्या वेगाने गाडी पुढं गेली
रस्त्यावर उमललेली रानफुलं
डोळे भरून पहातही नाही आली

उदास झालेलं माझ मन
इतकं प्रसन्न कसं झालं 
साधं पाखरू तर बागेत चिवचिवल

उडत जाताना बगळ्यान 
किंचित स्पर्श केला पाण्याला
उठलेला तरंग वाढतच गेला

आम्ही  पुण्याहून  खास  त्यांना  भेटायला  आलो  आहोत  याचा  आमच्यासारखाच  त्यानाही   आनंद  झालं  होता.. कवितेबद्दल  त्यांना   खूप  प्रेम आस्था  आहे  हे  त्यांच्या  प्रत्येक  वाक्यावरून  जाणवत  होते.. आणि  त्यांचं  सगळं  ऐकून  आम्ही  सगळे  खूप  भारावून  गेलो  होतो.. नंतर  त्यांनी  पोहे  दिले  ते  हायकू  एव्हडाच  चविष्ट  होते.. :)) त्यांच्या  मुलांशी ,नातवांशी आमची  ओळख झाली.. 

खाणं  झाल्यावर  त्यांनी  आम्हाला  आमच्या  कविता  सदर  करायला  सांगितल्या.. सर ,अंजली   ताई , दीपालीच्या  कविता  झाल्यावर  मी  त्यांना  म्हणलं  माझं  धाडस  होत  नाही  कविता  वाचायचं  कारण  माझ्या  अगदीच  साध्या  कविता  आहेत.. पण  त्यांनी  ऐकलं  नाही.. आणि  त्या  कविता  खूप  मनापासून  ऐकत  होत्या,काही  कळलं  नाहीतर   पुन्हा  वाचायला  सांगत  होत्या.. अत्रेंच्या  त्या  मोठ्या  वास्तूत  शिरीष  ताईंसमोर  कविता  सादर  करयाण्याचा  अनुभव  काही  वेगळाच  होता.. नंतर  त्यांनी  त्यांच्या  कविता  आणि  हायकू  ऐकवले.. तेव्हा अजून   ऐकतच  राहावं  असे  वाटत  होते.. काही काही हायकू एकदम senti हृदयस्पर्शी होते.. शिवाय त्यांनी जपानी हयाकुंचे भाषांतर केले होते तेही सादर केले त्यांचं   वय  इतकं  होतं  पण  आवाज  आम्हाला  लाजवणारा  होता.. कविता  वाचण्याचा  कौशल्य  अप्रतिम  होता.. शेवटी  मग  त्यांचं  सत्कार  करून  आमची  निघायची  वेळ  झाली.. आठवण  म्हणून आम्ही  त्यांची  स्वाक्षरी  घेतली .. निघताना  त्या  म्हणल्या  कि सुंदर  काव्यमैफल रंगल्याने त्यांच्यासाठीही  हा  दिवस  अविस्मरणीय  होता.. विशेष  म्हणजे  आमची  आठवण  म्हणून  त्यांनी  त्यांचा  'माझे  हायकू' या  पुस्तकावर  आमची  नावे  लिहून  घेतली.. हा  त्यांचा  मनाचा  मोठेपणा  होता बाकी काही नाही.. शेवटी   त्यांचा  आशीर्वाद  घेऊन  आम्ही  निघालो..

ठरल्याप्रमाणे  थोडावेळ  सागर दर्शन केलं.. यावेळेस चक्क  तिकडे  गार  वारं  असल्याने  घाम  घाम  झालं  नाही..  जेवण  करून  लगेचच  आमचा  परतीचा  प्रवास  सुरु  झाला.. पूर्णवेळ  त्या   कशा  आणि  किती  छान  बोलल्या,त्यांचा  कविता ,हायकू  याबद्दलच आम्ही  बोलत राहिलो.. त्यांची 'गाय वाट' ही कविता आम्हा सर्वांनाच अगदी मनापासून लक्षात राहिली..  येतानाही  आम्ही  सगळे  एकत्र  बसल्याने  गप्पांमध्ये  खंड  पडला  नाही.. मला  बाकी  सगळ्यांचा  अतिशय कौतुक  वाटलं  कि  ते  वयाने  मोठे  असून  त्यांच्यात  किती  stamina आहे ,पुणे येईपर्यंत अथक  गप्पा  चालू  होत्या  सगळ्यांच्या.. 

येताना  सगळ्यांच्या  चेहऱ्यावर  एक  वेगळाच  आनंद  आणि  समाधान   होतं,जणू आम्हाला  एक  शिदोरी  मिळाली  होती  आमच्या  पुढच्या  साहित्याप्रवासाठी.. :))


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: