रविवार, ९ जानेवारी, २०११

मंतरलेले दिवस - १२

अगं काय सांगू तुला, कशाला बघ वेळच मिळत नाही.. घरचं आवरून ऑफिस ,नुसती धावपळ.. आईकडे वेगळं असतं ग  पण इथे सासरी सगळं करावंच लागतं.. बरंय तुझं लग्न नाही झालं अजून, मजा आहे एका मुलीची..

एकदा का मुलं झाली कि आपलं स्वतःचं आयुष्य संपतं.. मुलांचे संगोपन , खाणं पिणं, आजारपण.. त्यांच्या शाळा,अभ्यास शिवाय इतर छंद.. दिवस कसा सुरु होतो आणि कधी संपतो कळत सुद्धा नाही.. तुझं बरंय ग  कसलीही  जबाबदारी  नाही.. पाहिजे तेव्हा पाहिजे ते करता येतं,मला हेवा वाटतो तूझा..

अगं आपण जसा वरच्या पदावर जातो तसा कामाचा ताण वाढतो.. माझा तर निम्मा दिवस meetings  मध्येच जातो.. आणि खालून व वरून दोन्हीकडून दोर खेचला जात असतो सारखा.. तुझं चांगलंय, आपलं आपलं काम करून निघून जायचं..  मलाही वाटत  उगाच manager झाले मी.. तू मस्त ऐश करून घे आता.. पुढे जायची फार घाई करू नकोस..

पगार झालं काग.. आमचा पगार व्हायच्या आधी संपायचं गणित आखलेलं असतं..  बरंय तुझ्या नावावर कसलंही loan नाही..  त्यामुळे पगाराच तुला tension  नाही.. नाहीतर आमचं बघा, homeloans etc संपता संपत नाही..  EMI च्या तलवारी सतत डोक्यावर असतात.. तुझ्या मागे  असली कटकट नाही मुळी ..

तुमचं बरय बुवा.. दिवसला थोडे defects काढायचे,बास मग आराम.. आमचं तसं नसतं.. coding, deliveries सतत कामाचा ताण..  तुमच्यासारख पाट्या टाकण्याचं काम नाही आमचं.. खुपदा वाटत मी तुझ्यासारखी testing मध्ये हवी होते..

तुम्ही  offshoreवाले लई मजा करता.. इथे आमची वाट लागते..  client लोक कामावर काम  देत राहतात.. तिकडच्या सारखी इथे चैन करता येत नाही.. शिवाय घरच्यांची तर खूप आठवण येत असते.. खूप एकट  वाटतं इकडे.. चालुद्या तुमची हौसमौज अशीच चालुद्या..

तात्पर्य - जगी सर्व सुखी अशी वृंदा आहे !!! :-)


४ टिप्पण्या:

Sonia म्हणाले...

hahaah .. too good .. :)

Unknown म्हणाले...

सही वर्णन केले आहेस.. (I m on the same bench ).... पण हे अस जरी असले तरी Manager झाल्यावर झालेला पगार महत्त्वाचा असतो, आणि सिंगल मुलांसाठी जरा जास्तच..पण १० ते ६ ची नोकरी आणि शनिवार-रविवार सुट्टी या सारखे सुख नाही... एकवेळ पगार थोडा कमी मिळाला तरी चालेल पण मजा करता यायला हवी.. हे अस असल तरी एक EMI सुरु झाला ना की वाट असते.... आणि त्यात जर लग्न झाले असेल तर विचारायलाच नको..

Nice post btw...

Unknown म्हणाले...

amazing...shejaryachi bayko ani dusryachi nokri sagalyanchi havi havishi vatate..tasa prakar ahe ha...mast varnan kel ahe

Siddhesh म्हणाले...

Tatpaya bhanna awadlay!
:-)