वो भुली दास्ता..
माझ्या induction मैत्रिणींपैकी दोघीजणी माझ्याच account ला आहेत.. नेमकं त्यांच्या project मध्ये पहिल्यापासून issues.. Day 1पासून त्यांच्या तक्रारी.. पेपर टाकणार वगैरे रोजचीच भाषा.. त्यांच्यात मी नेहमीच शांत असते.. त्या मला सारखं म्हणतात तू किती नशीबवान आहेस,आमच्या projectमध्ये आली नाहीस, तुला त्रास नाही आमच्यासारखा वगैरे वगैरे.. हा हा म्हणेपर्यंत नवीन company मधेही ६ महिने झाले.. इथे ६ महिन्यातून एक certification exam द्यावी लागते.. मी enggच्या सवयीने last momentला अभ्यास करून पास झाले.. तर या दोघींना कामाच्या ताणामुळे तिकडे विशेष लक्ष देता आले नाही त्यामुळे त्या अजून नाराज झाल्या.. तोच विषय चालू होता आणि पुन्हा तेच की तू किती lucky आहेस.. आता मात्र मी शांत बसू शकले नाही.. त्यांना म्हणलं प्रत्येकाचे दिवस असतात.. काही महिन्यापूर्वी मलाही बराच त्रास झाला होता..
नकळत माझं मन भूतकाळात शिरलं.. तो मधला काळ माझ्यासाठी खूप अवघड होता.. 'वाट चुकलेलं वासरू' हा लेख तुम्हाला आठवत असेल.. प्रश्न फक्त promotion न मिळण्याचा नव्हता.. पण तिथे वर्णभेद होता.. एखाद्या चित्रपट किवा मालिकेत दाखवतात तसं सगळे मंडळी एका so called heroin च्या हातचं खेळणं झाले होते.. team lunch किवा इतरवेळी ती किती गोरी आहे,अख्या floorवर तिच्यापेक्षा कोणीच गोरं नाही असे विषय चालायचे.. एखादीचं कौतुक करणं वेगळं पण जेव्हा TL बाकी team mates समोर सारखं तिचंच गुणगान गात असेल तर बाकीच्यांनी काय अन कसं वागावं? ती non marathi इतकी चालू होती, तिला competition नको होती.. त्यामुळे team मध्ये नेहमी freshersला घेतले जायचे.. मी एकटीच senior होते , तिची स्पर्धा फक्त माझ्याशीच होती.. त्यामुळे काम देताना ती मला विशेष scope नसलेलं द्यायची.. बाकीचे लोकं तिची पाण्याची बाटली भरून आणा किवा अजून काही सेवा करून तिला खुश ठेवायचे.. मला असलं उभ्या जन्मात जमणार नाही.. मी तिला कधीच गुळ लावला नाही , त्या manager लोकांशी कधी उगाच गोड गोड बोलले नाही.. पण या सगळ्याचा परिणाम उलटा झाला.. मी त्या teamमध्ये एकटी पडले.. कामाशिवाय आमच्यात कधीच काही interaction नसायचं.. promotion वगैरे तर जाउद्या पण साधी विचारपूस पण व्हायची नाही.. त्याच सुमारास India,China, Brazil मिळून एक quiz होती त्यात माझा पहिला नंबर आला होता, अख्या company मधून शुभेच्छा मिळाल्या होत्या.. पण त्या लोकांनी congrats पण म्हणलं नव्हतं मला.. attitude,अजून काय.. सुदैवाने companyमध्ये अपर्णा (माझी बहिण) आणि खूप साऱ्या चांगल्या मैत्रिणी असल्याने मी एकटी कधीच नव्हते.. त्या सगळ्या जणींनी मला नेहमीच खूप धीर दिला..
या पार्श्वभूमीवर नवीन ऑफिस मधलं एक साधं उदाहरण.. इकडे नवीन ठिकाणी कामाच्या संदर्भात माहितीसाठी मी एक doucment करून ते clientला reviewसाठी पाठवलं होतं.. तर त्याने लगेच oniste/offshore teamच्या सगळ्यांना mail करून कौतुक केलं.. customer म्हणजे देवमाणूस असल्याने मग धडाधड spm,pm वगैरे या सगळ्यांच्या mailsचा वर्षाव झाला.. तसं बघायला गेलं तर ते document फार काही भारी नव्हतं.. पण काहीतरी नवीन वेगळं करण्यासाठी प्रेरणा देणं खूप महत्वाचं असता हे फार थोड्या लोकांना समजतं.. आणि clientला मी काळी का गोरी हे माहिती नव्हतं.. हे कौतुक फक्त कामाचं होतं,बास त्यामुळे बरं वाटलं..
या सगळ्यातून मी हे शिकले की कोणतीच company चांगली किवा वाईट नसते तर ते चांगले/वाईट तुमच्या आसपासची लोकं असतात.. मागच्या ऑफिस मध्ये मी तशीच होते आणि आताही तशीच आहे.. पण माझ्या भोवतीचे लोक बदलले आणि मग त्या मैत्रिणी म्हणतात तसं माझं नशीब.. म्हणूनच संतमंडळी सांगतात.. "सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो.. कलंक मती चा झडो विषय सर्वथा नावडो.."
आपल्या खाजगी आयुष्यातही असं बरेचदा होतं की आपण एखाद्यासाठी जीव तोडून काहीतरी करतो पण तो समोरचा माणूस आपली काहीच किंमत ठेवत नाही आणि शेवटी आपणच मूर्ख असं सिद्ध होतं.. पण मला वाटतं आपण एखाद्यासाठी चांगलं केलं असेल तर कुठूनतरी कधीतरी त्याचं चांगलं फळ आपणास नक्कीच मिळतं.. आपण समोरच्याकडून न्याय अपेक्षित करतो पण खरा न्याय देणारा 'तो' वेगळा असतो.. त्या परमेश्वराच आपल्याकडे लक्ष नेहमीच असतं त्यामुळे आपण आपल्याबाजूने शक्य तेव्ह्ढ चांगलं काम चालू ठेवण्यातच आपलं हित आहे..
I believe..
अभ्युत्थानंहि अधर्मस्य.. तदात्मानंसृजाम्यहम..
Meaning- Whenever and where ever there is decline and decay of righteousness,O Bharatha, then I (Lord Vishnu)manifest myself. In all such dark periods of history, some great master comes to present himself as the leader of men to revive the standard of life and moral values.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा