मनाच्या गं ओंजळीत
ताजी ताजी फुलं पानं..
अन त्यात ओवलेले
स्वप्नांचे कोवळे हार..
मनाच्या गं ओंजळीत
उंच उंच अवकाश..
अन त्यात बुडलेले
प्रीतीचे खोल आभास..
मनाच्या गं ओंजळीत
धार धार अस्त्र शस्त्र..
अन त्यात रंगलेले
वास्तवाचे एक चित्र..
मनाच्या गं ओंजळीत
ओले ओले काही क्षण..
अन त्यात भिजलेले
स्मृतींचे इवले कण..
मनाच्या गं ओंजळीत
गोड गोड हरी नाम..
अन त्यात रमलेले
भक्तीचे भाबडे भाव..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा