दिल तो बच्चा है जी.. :)
सध्या रात्री फार छान वारं वाहतं.. उन्हाळ्यातली खरी मजा संध्याकाळ नंतर सुरु होते.. अशीच झुळूक घेत मी बहिणीबरोबर घराजवळ फिरत होते.. अपर्णा मला काहीतरी सांगत होती आणि एकदम तिकडून सायकलवर छोटा अथर्व येताना दिसला.. त्याची सायकल बघून मला मोह झाला.. मी एकदम त्याला म्हणल,मला एक फेरी मारायची आहे.. तुझी सायकल देतोस? :) तो लगेच हो म्हणला.. अपर्णा म्हणाली, अगं मी तुला सांगतीये काय आणि तुझं लक्ष कुठे आहे.. मी म्हणलं आलेच मी मग बोलू.. आणि एक फेरी मारून आले.. गार वारं,चांदणं आणि सायकल.. आहा.. लई भारी.. माझा सायकलचा उत्साह बघून अथर्वही खुश झाला,म्हणला ताई gears बदलून पहिले का? मी म्हणलं नाहीरे बाबा.. gearsचा अनुभव नाही.. आमच्या लहानपणी साध्या सायकली असायच्या.. आमची मरुन रंगाची BSA सायकल नीट आठवते मला.. दादाची जास्त भारी होती पण gears नव्हते तेव्हा.. या सगळ्या प्रकारानंतर बहिण म्हणली तू लहान आहेस का आता.. काहीतरी चालू असतं तुझं..
नुकताच 'ताऱ्यांचे बेट' मराठी सिनेमा बघितला.. आई बाबांसोबत प्रभात किवा नीलायमला असा हलका फुलका चित्रपट बघणं म्हणजे एक पर्वणीच ठरते.. तर त्यामध्ये छोट्या मुलाचा निरागस हट्ट आणि त्याच्या घरच्यांना त्यापासून होणारा त्रास बघून मला वाटलं की मी अजून त्या बारक्या एव्हढीच आहे का.. कारण मी अजूनही त्याच्यासारखेच हट्ट करते.. :P आई नेहमी म्हणते की तू एखाद्या ड्रेस साठी किवा दागिन्यासाठी हट्ट कर पण तुझे काहीतरी भलतेच हट्ट असतात..
अजूनही पाऊस आला की ऑफिस असो वा घर मी आहे तिथून रस्त्यावर येऊन पावसात भिजते.. पाऊस दरवर्षीच येतो आणि हल्ली तर कधीही येतो पण लहान मुलांसारखा पावसात भिजायचं आणि मग सर्दीने आजारी पडायचं हा नेम मी चुकवत नाही..
अजूनही कुठे ट्रिपला जायाच ठरलं की जम खुश होते मी.. मग जाईपर्यंत अगदी डोक्यात तेव्हाढ च लहान मुलांसारखं.. :))
परीक्षा म्हणलं की अजूनही तसाच पोटात गोळा..
नातेवाईकांकडे गेले की मी माझ्या भाच्यांमध्येच जास्त रमते.. त्यांच्यासोबत कोणतही खेळ खेळते..
घरी मला सारखं काहीतरी कुठेतरी लागतं तेव्हा बाबा म्हणतात की लहान मुलांसारखी काय धडपडतेस अशी.. ट्रेकिंग कशी करतेस तू कोणास ठाऊक..
असं काही झाल्यावर मला वाटतं मी वयाने मोठी झाले तशी मनाने मोठी झाले नाही का अजून.. पण मग कधी कधी आजूबाजूला बघितलं की वाटतं की मी जरा जास्त matured आहे.. कधी असं तर कधी तसं.. मी नक्की कशी ते मलाच नाही समजत तर बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही.. काही वर्षांपूर्वी असं झालं असावं.. श्रींची देवीसोबत लीला चालू असेल.. तेव्हा त्यांनी एक अजब रसायन केलं असेल.. त्या रसायनातून मला बनवताना साक्षात ब्रम्हदेवांनाही कळलं नसेल की नक्की आपण काय निर्माण करतोय.. हाहाहा.. कारण तो जीव हळवाही आणि कठोरही.. समजूतदारही आणि हट्टीदेखील.. सावळा आणि रेखीवही.. लवकर तापणारा आणि लगेच थंड होणाराही.. चुका करणारा आणि माफी मागणाराही.. नाजूक आणि तरीही धाडसी.. सगळं मोकळेपणाने सांगणारा तरीही कुणालाही न कळलेला तो जीव! असं हे अवघड रसायन झेलायला तोडीस तोड अशा अजून एका रसायानाची निर्मिती झाली असावी, i hope so..
माझ्या वयाच्या मुलींना पोरंबाळं झाली आहेत.. त्यामुळे आईच्या भूमिकेत ते त्यांच्या मुलांचे हट्ट पुरवीत असतील.. पण माझी भूमिका अजूनतरी 'आईबाबांची मुलगी' एव्हढीच आहे.. त्यामुळे कदाचित माझ्यातलं लहान मुल अजून जागं आहे.. मी स्वताहून कोणती जबाबदारी झटकली नाहीये.. श्रींची इच्छा असेल तेव्हा पुढे मीपण मोठ्यांच्या रांगेत येईन.. :) एक मुल असण्यात आनंद आहे तसं किंबहुना एक आई असण्यात जास्त आनंद असेल.. प्रत्येक पायरीचं सुख वेगळा असतं ना.. कोणाला कुठली सुखं मिळतील हे परमेश्वराने आधीच ठरवून ठेवलेलं असणार..
जिसका जितना हो आंचल यहां पर उसको सौगात उतनी मिलेगी !!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा