पावसात उन्हाची..
उन्हात गारव्याची..
गारव्यात उबेची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..
प्रवासात दिशेची..
दिशेत प्रवाहाची..
प्रवाहात काठाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..
डोळ्यात ध्येयाची..
ध्येयात कष्टांची..
कष्टात यशाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..
मनात जाणिवेची..
जाणीवेत प्रेमाची..
प्रेमात विश्वासाची..
जाणीवेत प्रेमाची..
प्रेमात विश्वासाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची..
शब्दात अर्थाची..
अर्थात बोधाची..
बोधात प्रत्ययाची..
सदा तेवत रहावी.. ज्योत आशेची.!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा