चिऊताई चिऊताई
पहाटे पहाटे इतक्या, तू कशी उठतेस ग
उबदार रजई घेऊन, थोडं लोळावं अजुन, तुला वाटत नाही काग…
चिऊताई चिऊताई
इतकी कशी चिवचिव तुझी, सतत चालू असते ग
थोडा वेळ शांता बस, असा सारखं कोणी, तुला रागावत नाही काग…
चिऊताई चिऊताई
एक एक दाणा खोऊन ,तुझं पोट कसं भरतं ग
बर्फाचा गोळा बघून, रडून हट्टा करावा,तुला वाटत नाही काग….
चिऊताई चिऊताई
इकडे तिकडे उन्च खाली, कशी काय तू फिरतेस ग
शाळा अन् अभ्यासाच्या, नावाखाली सारखं कोणी, तुला रागावत नाही काग…
चिऊताई चिऊताई
तू माझी अन् मी तुझी, जागा एकदा बदलुया काग
रोज तेच तेच करून, वेगळं काही करावं, तुला वाटत नाही काग..
1 टिप्पणी:
chhan
टिप्पणी पोस्ट करा