हा निबंध नव्हे बरका.. :-)
या mail ला जोडलेले छायाचित्र पहाना.. दोघं बहिण भाऊ किती मन लावून किल्ला बांधत आहेत.. ते बघून मला माझे लहानपणीचे दिवाळीतले दिवस आठवू लागले .. आमचं बालपण पुण्यात ncl जवळ iitm colony मध्ये गेलं .. त्या काळी university-pashan रस्ता हा खूप शांत परिसर होता .. आमची colony अगदी ऐसपैस सुंदर ,स्वच्छ होती .. घराला खूप मोठं अंगण आणि बाग होती ..
त्यावेळेस आमच्या वयाचे खूप सारे मुलंमुली colony मध्ये होते त्यामुळे गणपती उत्सव ,दिवाळी ,कोजागिरी वगैरे सगळे सण मिळून उत्साहाने साजरा करायचो.. दिवाळीतला किल्ला हे एक मोठे आकर्षण असायचे.. दादाच्या मित्रांमध्ये किल्ला कोण जास्त चांगला करणार याची स्पर्धा असायची .. जशी दिवाळीची चाहूल लागे तसं आपला किल्ला सगळ्यांपेक्षा खास होण्यासाठी काहीतरी नवीन तंत्र वापरायचं असे विचार दादा लोकांच्या मनात रेंगाळू लागायचे .. Colony च्या मागे बऱ्याच टेकड्या होत्या .. (पंचवटी sosc +वेताळ टेकडी माहिती असेलना!).. तर किल्ल्यांची माती आणण्यासाठी दादासोबत आम्ही बहिणी टेकडीवर जायचो .. तिथून माती ,विटा ,cement वगैरे घेऊन यायचो .. दादा किल्ल्याचा पाया,बांधणी करायचा आणि आम्ही त्याला पाणी आणून देणे वगैरे चील्लुपिल्लू कामं करायचो .. किल्ल्याचे बुरुज ,शिवाजी महाराजांचं खास सिंहासन आणि पायऱ्या या गोष्टी तर मला ठळकपणे आठवतात.. किल्ल्यासोबत आजूबाजूला शेती ,नदी , पूल ,कारंजं ,वस्ती, कुंपण इत्यादी गोष्टीनी किल्ला अजून उठावदार करण्यात दादा तरबेज होता.. सगळं होत आलं की त्यावर मोहरी नाहीतर आळीव पेरल्यावर दोन दिवसात हिरवेगार दिसायला लागायचा.. किल्ल्याला भेगा पडू नये म्हणून किती काळजी घावी लागायची..
किल्ल्याचं सगळं काम झालं की संध्याकाळी हळु हळु खेळणी ठेवायची.. शिवाजी महाराज,मावळे, गायी,गवळणि,सरदार ,शेतकरी वगैरे मस्त मस्त खेळणी वर्शोन वर्ष जपून ठेवलेली असायची.. किल्ला मावळ्यानि सज्ज झाला की आम्ही शेजारी रांगोळी काढून सजवायचो आणि आई दिवा लावून ठेवायची.. रात्री दिव्याच्या प्रकाशात किल्ला फार सुरेख दिसे.. त्या काळात Digital कॅमरा नव्हता नाहीतर किती photos काढले असते.. आणि दिवाळी संपली की किल्ल्यामधे एक मोठा सुरुंग लावून द्यायचा..
आता वाटतं की दिवाळी हा सण ख-या अर्थाने लहान मुलांचाच असतो.. किल्ला बनवायचा,आकाशकंदील लावायचं,फराळाला आईला मदत करायची,तास अन् तास रांगोळ्या काढायाच्या,नवीन कपडे घालून मिरावायचे,भरपूर फटाके उडवायचे आणि काय काय.. हल्ली दिवाळी म्हणजे खाणं पिणं आणि झोपा काढणं अशी व्याख्या होत चालली आहे.. फार तर फार एखादा दिवाळी पहाटेचा कार्यक्रम.. ;-) कदाचित ही एक phase असेल आयुष्याची.. पुढे एकाचे दोन झाले की ती पहिली दिवाळी खास.. अन् मग दोघांचे चार झाले की पुन्हा बालपणात शिरून दिवाळी नव्या उत्साहाने साजरी होत असावी.. :))
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा