Life without Regrets..
माझ्या office चा परिसर खूप सुंदर आहे.. मध्यवर्ती मोठी बाग आणि त्या भोवती इमारती.. हिरवळीच्या कडेची उंच झाडं आणि नागमोडी आकारात बसवलेल्या पांढऱ्या फारश्या अत्यंत सुंदर दिसतात.. संध्याकाळी अंधार पडला कि छोट्या छोट्या दिव्यांनी green-white effect इतका सुरेख दिसतो कि मला रोज मी कुठेतरी hillstation वर आल्यासारखं वाटत.. :)
मूळ मुद्द्यावर येते.. कुठेही building मध्ये किवा canteen मध्ये जाताना फारश्यांवरून जावं लागतं.. हिरवळी मुळे कि काय पण त्या फरशांवर खूप मुंग्या असतात.. प्रत्येक पाऊल टाकताना नकळत माझं लक्ष खाली जातं.. दररोज माझ्या पाया खाली अशा किती मुंग्यांचा जीव जातो कोणजाणे.. खरतर यामध्ये ना त्या मुग्यांची चूक ना माझी.. तरीही मला त्या मुन्ग्यांसाठी उगाच वाईट वाटतं..
हे एक उदाहरण.. असंच असताना आपलं आयुष्य.. खुपदा आपल्या हातून काहीतरी घडून जातं आणि नंतर प्रश्न पडतात आपण बरोबर वागलो का चुकीचं.. बरेचदा कारण नसताना आपण स्वतःवरच अपराधीपणा लादतो किवा सरळ दुसर्यांना दोष देऊन मोकळे होतो.. चूक नेहमी आपली किवा समोरच्यांची असते असा काहीच नसतं.. काहीवेळा आपण प्रयत्न करतो सुधारण्याचा, शांत राहायचा पण असं करता करता विचारांच्या वादळात अजूनच हरवून जातो… कधी कधी सगळं कळूनही आपण परिस्थिती बदलू शकत नाही.. असो..
"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.. दोष ना कुणाचा.."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा