सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - ७


गोष्ट एका हट्टखोर मुलीची.. :)


त्या   दिवशी  sms आला “moonlight trek over this weekend”..   असे सारखेच काहीना  काही sms  येत असतात..  पण ‘कात्रज –  सिंहगड moonlight trek’  हे  माझं  फार  पूर्वीपासूनचं  स्वप्न होतं  म्हणून  लगेच  फोन   करून  माहिती काढली..  शनिवार,अजून  अवकाश  होता  तोपर्यंत  कोणी  मैत्रिणी  तयार  होतात  का  पाहू म्हणलं..  सगळ्या ‘single’ मैत्रीणीना, अगदी ज्या नेहमी 'नाही' म्हणतात अशांना  देखील  मी  नवीन  उत्साहाने  आणि  आशेने  पौर्णिमेच्या  रात्रीचं  वर्णन  करून trek  बद्दल विचारलं..  पण  सगळ्याजणी ‘नाही’ म्हणाल्या.. ‘नाही’  ऐकायची  आता  सवय   झाली  आहे  त्यामुळे   मी फार  मनाला  लावून  घेतलं नाही..  प्रत्येकाच्या  वेगवेगळ्या priorities  असतात  मी  समजू शकते..  पण  मोठा  प्रश्न हा  होता कि  आता घरच्यांना  कसं पटवायचं! Yes  मग  शनिवारी  सकाळी  आमच्या  घरी रामायण घडलं..  :)

मी: आई,  मी  परवा  म्हणत  होतेना  पौर्णिमेच्या  रात्री moonlight trek आहे..  मला  केव्हापासून  करायचं  तो trek..  मी  जाऊ काग?
आई: हेबघ,  मला  काही  विचारू  नकोस trek  चं वगैरे..  बाबांशी बोल..
मी: बाबा..
बाबा:  रात्रीच्या ट्रेकला  मुळीच  जायचं नाही..  सकाळी  जाऊन  संध्याकाळी यायचं  असेल  तर जा..
मी:  अहो बाबा,  हा  खास  रात्रीचा  ट्रेक आहे..  आणि  वर्षातून  कधीतरीच  हा  ट्रेक असतो..  चांदण्यात  मस्त  फिरत फिरत..
बाबा: काहीतरी काढत  असतेस तू.. आता  तर कोकणात जाऊन आलोना.. सारखं सारखं काय ..
मी: कोकणाचा आणि ट्रेकचा काय संबंध.. तुम्ही  शबाताईला विचारा.. तिने पुर्वी केला होता हा ट्रेक.. सगळेच करतात.. खूप प्रसिद्ध ट्रेक आहे हा..
बाबा: कोण कोण आहे ट्रेकला?
मी: जंगल क्लब ट्रेक ग्रूप.. २०/२५ जण असतील.. 3 अनुभवी लोक ‘लीडर’ आहेत या ग्रूप चे..
बाबा: तुझ्या ओळखीच्या मैत्रिणींपैकी कोणीच नाही?
मी: नाही.. :(
बाबा: नाहीना, मग तुला कसं काळात नाही.. रात्रीच्या ट्रेकला नाही जात नसतात असं ..
(झालं माझ्या  डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या..)
मी: बाकीच्याना मी कालपर्यंत  विचारत होते.. कहीना आवड नाही तर कहीना वेळ नाही.. मी काय करू मग?त्या नाही म्हणतात म्हणून माझं  रद्द  का करू? उद्या त्यांच्याकडे वेळ असेल आणि मझयाकडे नसेल.. सगळ्यामैत्रिणिंची लग्न झाली   किवा ठरली आहेत,त्या व्यस्त आहेत.. मग मी का त्यांच्यावर अवलंबुन राहू..
बाबा: अग तेच तर आम्ही म्हणत आहोत.. सगळ्या जणीन्सारखी तू वाग आता.. लग्न झाल्यावर नवार्‍या सोबत पाहिजे तिथे  वाटेल तितक  फिरायला जा आमची काही हरकत नाही..
मी: याचा अर्थ लग्न होईपर्यंत मी दारं खिडक्या बंद करून घरी बसू का.. या वीकेंड्ला काही plan नाहीतर मग काय हरकत आहे ट्रेकला जायला.. मुली हिमालयात ट्रेकला जातात आणि मी साधं सिंहगडला जाऊम्हणत आहे..  तुम्ही सगळे मला हट्टी म्हणता.. पण मी कोणत्या वाईट गोष्टीसाठी हट्ट करते का.. तुम्ही कोणीसमजून घेत नाही मला..  (गंगा जमुनेला पूर आला)
बाबा: तू  ठरवलं आहेस जायचं तर आम्हाला विचारतेस कशाला..
मी: असं काही नाहीए.. मी तुम्हाला विचारात आहे,जाऊ का म्हणून..  माझं फक्त एव्हाढच म्हणणं आहे की तुम्हीत्या ऑफीस मध्ये  चला,आपण सगळी नीट माहिती काढू मग ठरवू.. म्हणजे मग तुम्हालाही काळजी वाटणारनाही..

अशा रीतीने बाबांकडून परवानगी मिळवली.. ट्रेकला कोण कोण सोबत येणार,किती मुली वगैरे खात्री  करून मग बाबा हो म्हणाले.. ज शुक्रवारी रात्री पाऊस धोधो कोसळाला होता त्यामुळे ट्रेक ‘मूनलाइट ट्रेक’ कसा होणार अशीशंका होती मला.. म्हणलं जाऊन तर बघुया.. शनिवारी नल स्टॉप जवळ पिक अप पॉइण्ट होता.. बस मध्ये लीडर सोबत ओळख झाली.. बाकी सगळे आपल्या आपल्या ग्रूप मधे होते.. बस सुटल्यावर  वाटू लागलं आपणएकटं चाललोय हे बरोबर आहे का वगैरे..  खिडकीतून  बाहेर पाहिलं तेव्हा तो माझा चांदसखा हसत म्हणाला ‘मी अहेना तुझ्यासोबत!’ :) घरी एकदा फोन करून सान्गितलं की ग्रूप चांगला आहे तुम्ही शांतपणे झोपा,सकाळी फोन करेन..
रात्री  १० वाजता आम्ही कात्रज घाटापासून चढायला  सुरुवात केली..  तिथे  पहिल्यांदा  सगळ्यांच introduction झालं..  आम्ही  एकूण २०   जण होतो..  ५/६   मुलींच्या  ऐवजी मी धरून आम्ही तिघीच होतो.. आमच्यातले तिघेजण  थोडे  वयस्कर  काका  होते  पण  त्यांचा  उत्साह  सगळ्यात  दांडगा होता..  एक  इयत्ता  सातवीतला  छोटू होता,सर्वात पुढे पळत होता..   त्याचे  वडील  त्याला  सगळ्या trek ला  आवर्जून  घेऊन जातात..  इतक्या लहान  वयात  त्याचे  बर्यापैकी treks  झाले  आहेत,हे  पोरगं  मोठेपणी  नक्की  मोठा trekker होणार!

सरांनी सूचना आणि घोषणा  देऊन  डोंगरांची  वाट  सुरु झाली ..  डोंगरावर  सर्वत्र गुढघ्याच्या उंची  एव्हढ  वाळलेलं  गावात  पसरलं  होतं  आणि  त्यामधून  एक  छोटीशी पायवाट.. torch  ची  गरज  भासत  नव्हती  इतकं  स्वच्छ  टिपूर  चांदणं  पडलं होतं..  एका  बाजूला  डोंगरांच्या रांगा..  आणि  दुसरीकडे  खालती  कात्रज  घाट  आणि ‘ आमचं पुणं’ दिव्याच्या  प्रकाशात  झगमगत होतं!  उकाडा  जाणवत  नव्हता  ना  थंडी  वाजत  होती  अशी  एकदम  आल्हाददायक  हवा होती.. photos  काढायचे  प्रयत्न  करत  होते  पण  जमलं नाही.. एकतर  रात्रीचे photo  मला  काढता  येत  नाही  किवा  माझ्या   कॅमेराचा problem होता..  आमच्यापैकी  एकजण photography  course  करणारा होता..   तो सगळीकडे  अगदी  stand  काढून  सगळं set  करून photo काढायचा.. त्याला   म्हणलं  मला नंतर  सगळे photos पाठव   आणि  मग  मी कॅमेरा  आत  ठेवून   मोकळेपणाने  ट्रेकचा  आनंद  घेऊ लागले..  आता  सगळे  एका  मागून  एक  चालत  होते  त्यामुळे  एकत्र  झाले होते.. ‘ जगते राहो’ ‘ हर  हर महादेव'  वगैरे  गर्जना  चालू होत्या..  या  सगळ्या  वातावरणात  आपण  अपरात्री  कुठतरी  अनोळखी  लोकांसोबत  भटकतोय  असं  मुळीच  वाटत नव्हतं..

"पर्वतांची दिसे दूर रांग.. काजळाची जणू दाट रेघ !!!"  पहिला  डोंगर  संपला  असं  कळल्यावर  आम्हाला  किती  आनंद  झाला  काय सांगू..  तिथून   पुढे  एकदम  दूरवर  सिंहगड  च्या tower   वरचा  लाल  रंगाचा  दिवा  चमकताना  दिसू लागला..  अरे  बापरे  एव्हढा  लांब  कसा  काय  जाणार आपण  असे   प्रश्न  सगळ्यांनाच   पडू लागले..  ट्रेक  खरतर  अवघड नव्ह्ता..  पण  असे १५   डोंगर  पार  पडायचे  होते  हि  खरी  गम्मत होती..  या  अशा  ट्रेकची  कल्पना  सर्वात  प्रथम  कोणाच्या  डोक्यात  आली  असेल,हि  छोटीशी  पायवाट  कोणी  केली  असेल  असे  असंख्य  प्रश्न  माझ्या  मानता  येत होते..
१२.३०ला    एका  पठारावर break  घेतला  तिथे  आम्ही sandwiches बनवले.. :)  खरतर   रात्री  जेवूनच  आलो  होतो  तरी sandwiches  वर  ताव  मारताना  तसं  काही  जाणवलं नाही ..   माझ्यासोबत  ज्या  दोघी  मुली  होत्या  त्या  त्यांच्या  मित्रांसोबत  आल्या होत्या..  त्यातली  एकजण  मागे  पडत  होती  म्हणून  तिचे  मित्र  तिच्या  सोबत  मागे होते..  आणि  दुसरी  ऋजुता  माझ्यासोबत  पुढे होती..  आम्ही  दोघी  पूर्ण  ट्रेक  एकत्र  होतो  त्यामुळे मी  एकटी  वैगरे   नव्हतेच मुळी.. मध्ये breaks  घेत  पुढे  पुढे  जात होतो..  हजेरी  घेता  घेता   सरांनी   मधेच  एक dialogue  मारला “ आपल्यातली  संख्या  जास्त  तर  झाली  नाहीना  ते पहा ..  रात्र  पौर्णिमेची आहे”   तेव्हा  जाणवलं  कि  आम्ही  असे  एकटेदुकटे  फिरत  आहोत  पण  भूताखोरांचा   विचार  चुकूनही   मनात  डोकावला नाही..  साग्लायचे  काहीना  काही jokes  चालू  होते  अर्थात  मी silent mode  ला होते..  मलाना  किती  आणि  काय  काय  पाहून  घेऊ  असं  होत होतं.. “ चांदण्याचे  कोटी कण,  आठवांचे  ओले सण !”

एका  break  मध्ये  गाण्याचा  कार्यक्रम झाला..  तेव्हा  मी  सगळ्यांची  परवानगी  घेऊनच  मग  माझी  कविता ऐकवली.. ;)  सहसा कवितेमध्ये तेही आमच्यासारख्यांच्या  कवितेमध्ये  फार  कमी  लोकांना  उत्साह असतोना..  पण  ते  बिचारे  दामले  होते  म्हणून  कि काय..  काही  आढेवेढे न   घेता  त्यांनी  कविता  ऐकून घेतली!!  मध्ये  अधे glucose/ लिंबू  सरबताचे  डोस   चालू होते..  मग  यापूर्वी  कोणी  किती trekking  केलं  याबद्दल  जोरात  चर्चा  सुरु झाली..  मधेच  कधीतरी mobile  ची  आठवण  झाली  म्हणून  काढून  पाहिला   तर ४   वाजले होते , वाटतही नव्हतं..  मी  आणि  रुजुताने  सरांना ‘ चहा चहा ’  म्हणून  बराच  त्रास दिला..  सिंहगडावर   चहा  मिळेल  अशी  अशा  दाखवून  त्यांनी  आम्हाला  प्रोत्साहन  दिलं .. ;) नंतर   नंतर  आम्ही  सरांना  विचारायचो  अजून  किती  डोंगर  राहिले  तर  ते  म्हणायचे  तो  काय  दिसतोय न  सिंहगड , आलोच  आता जवळ  आलो आपण.. trekkers  लोकांचा  हा typical dialogue  आहे  हे  मी  जाणून होते..  म्हणलं  तो  चंद्र  पण  जवळ दिसतोय,  जायचा  का तिथे.. ;)  कधीतरी  मधेच वाटलं ..  आपण  कुठे  चाललो आहोत ,कशासाठी..  हे  बरोबरचे  कोण आहेत..  तेव्हा  जाणवलं  कि  आता  आपल्याला  झोप  यायला  लागली आहे .. hahaha..

आता   सिंहगड   थोडा  जवळ  वाटू लागला..  आणि  नेमके  तिथे  थोडे  ढग आले..  बघता  बघता  चंद्र  ढगात  दिसेनासा  झाला  आणि  एकदम  अनाधार पाडला..  इथे torch  ची  गरज पडली..  तेव्हा  मागे  वळून  पाहिलं तर  प्रत्येकच्या torche  चा  प्रकाश  एका  रांगेत इतक a  सुंदर  दिसत  होतं  कि  मला  वाटलं  काश  मी  असं photo  काढू  शकले असते..  त्या  डोंगराच्या  वर येईपर्यंत  चक्क   उजाडला होतं..  आम्हला  वाटलं  आतातरी  आला  पण  अजून ३   डोंगर  राहिलेच होते..  घरी  फोन  केला  तेव्हा  बाबांना  म्हणालं  अजून  आम्ही  सिंहगडला पोहाचायाचोत..  बाबा  म्हणले  रात्रभर  काय  केलं मग .. :)

पण  आता  खरच  बास  वाटू  लागलं होतं..  शेवटचा  टप्पा  नाही  म्हणायला  थोडा  कठीण वाटला ..  अजून  नाही  चालवणार  पुढे  असं  होत होतं..  थोडं  चाललं  कि break  असं  प्रकार  चालू होता..  शेवटी  ८.३०ला  आम्ही  जेव्हा destination  गाठलं  तेव्हा   आम्ही  आनंदविभोर झालो.. :)  यावेळेसची  कांदा भाजी + झुणका  भाकर +  चहा   सगळ्यात बेष्ट होता..  शेवटी group photo  काढून  सगळे  बस  मध्ये  बसले आणि एका  क्षणात  गाढ  झोपून गेले..   अशा  ट्रेक  नंतरची  ती  झोप किती  लई  भारी  असते  हे  अनुभवी  लोकच  समजू शकतात..

घरी येताना मनातून मी आई बाबांचे खूप आभार मानले.. ते हो म्हणाले म्हणून मला इतका छान ट्रेक चा अनुभव घेता आला.. आणि तसही माझे हट्ट आईबाबा नाहीतर कोण पुरवणार!!! :)

1 टिप्पणी:

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

तो काय दिसतोय न XXगड , आलोच आता जवळ आलो आपण...