गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - 4

कोकणात निसर्गाच्या कुशीत अनेक मंदिरांमध्ये जायचा योग आला.. एका मंदिरात गेले असता कसल्या तरी विचारात मी गाढले होते.. तेव्हढ्यात तिथले पुजारी म्हणाले इथला देव जागृत आहे.. हे जागृत देवस्थान आहे, तुमची मनापासूनची जी इच्छा असेल ती बोला,पूर्ण होईल.. मी बर म्हणलं आणि एकदम ‘blank’ झाले.. :)
काय मागू देवाला? मला काय पाहिजे ते माझ्यापेक्षा त्यालाच नीट माहिती आहे.. आणि मी अम्क अम्क मला दे म्हणलं तर त्यात मी नक्की किती सुखी होणार आहे आणि ते सुख किती दिवस टिकणार आहे? जर मी भलतीच गोष्ट मागितली तर त्याने जीवनात जे अध्याय आधीच लिहून ठेवले आहेत ते काही बदलातील का.. खरतर देवावर मझा पूर्ण विश्वास आहे.. पण देवाकाडे काय मागावं हे आता कळेनासं झालय .. कुठली गोष्ट मागू देवाला की ती मिळाली की मला बास,अजुन काही नको असं वाटेल? माझ्या जवळच्यांपैकी एका व्यक्तीने माझा 'अत्रुप्त,असंतुष्ट,अशांत आत्मा’ असं अचूक वर्णन केलं आहे.. आणि मी अगदी 100% सहमत आहे कारण मी खरच कोणी साधू संत नाहीए.. आपण सगळे अर्जुन नाहीका.. म्हणून ‘मन शांत व्हावं’ अशी प्रार्थना करावी वाटली.. आयुष्यात जे चढउतार येतील त्यास धैर्याने आणि आनंदाने तोंड देता यावं इतकी मनाची शक्ति दे मला अशी मी मनोमनी प्रार्थना केली.. बाकी जो जे वांछील ते तो लाभो ,प्राणिजात!!! बास अजुन काय.. :))

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: