हितगुज सागराशी.. :)
ती - हे विशाल सागरा.. केव्हढा हा तुझा पसारा.. तुला किती पाहून घेऊ असं होतंय मला.. दुर् दूरपर्यंत तुझा ठाव लागत नाहीये.. ते आकाश आणि तू दूरवर एक झाल्यासारखे दिसत आहात .. सूर्याचा लाल गोळा तुझ्या कुशीत येऊ पाहतोय बघ .. आणि या तुझ्या असंख्य लाटा .. हातात हात धरून स्वछंदपणे खेळत आहेत .. उंच उसळी मारून पुन्हा तुझ्यात विलीन होत आहेत .. त्यांचा आवाज मला तुझ्याकडे खेचून घेत आहे.. त्यांचा फेसालालेलं रूप मनात साठवून घ्यायचा वेडा प्रयत्न मी करत आहे ..
एक गम्मत सांगू तुला .. तुझ्या एव्हढ्याच ,तुझ्या सारख्याच माझ्याही मनात विचारांच्या अफाट लाटा उसळतात .. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र या वैचारिक लाटा अविरतपणे काम करत असतात .. आणि त्यामध्ये कधी मोती शिंपले सापडतील तर कधी भयंकर प्राणी देखील असू शकतील .. पण पण.. पण एव्हढाच फरक आहे आपल्यात.. तुझ्या लाटांना 'किनारा' आहे.. त्या किनाऱ्यापाशी तृप्त होऊन परत आत जातात आणि पुन्हा किनार्याच्या ओढीने बाहेर येतात.. माझा तसं नाही बुवा.. माझ्या भावनांना,माझ्या विचारांना अजुन तरी कुठे किनारा नाही.. ते स्वतहत्च उगवतात आणि स्वतहतच मावळतात.. मिळेल त्या दिशेला त्या वाहत जातात आणि वाट हरवल्यावर बावरून जातात.. तुझं अंतकरण मोठं आहे ना,तू सगळ्याना सामावून घेतोस.. तसं मलाही घेना.. तुझया लाटांमधे माझ्या भावनाना एकरूप करून घेना.. तुझ्या खार-या पाण्यात माझ्या आसावांना थोडी जागा मिळेल ना..
तो – खरय, तुझ्या मनातले विचारांचे वादळ अगदी माझ्या लाटांच्या तोडिस तोड आहेत.. पण सखे,अशी निराश होऊ नकोस.. जिथे भावनांचा उगम होतो तिथे किनारा नक्कीच असतो.. कदाचित अंतर जास्त असल्याने तुझ्या दृष्टीस पडत नसावा.. इतक्यातच धीर खचून देऊ नकोस.. लवकरच तुझ्या आभाळात तुझा चंद्र उगवेल आणि तुझ्या विचारांना,भावनांना,स्वप्नाना उचित किनाऱ्याची दिशा दाखवेल..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा