सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..
स्वप्नात येतात परी..
गोष्टीत येतात राक्षस..
परी, राक्षस खरे का खोटे..
सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..
भीती वाटते भूतांची…
गोष्टी आवडतात देवांच्या..
देव, भूत खरे का खोटे..
सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..!!
1 टिप्पणी:
खरे काय खोटे काय यानी उत्तरे आकलनाच्या वैयक्तिक कुवतीवर अवलंबून असतात.
टिप्पणी पोस्ट करा