रडले काय अन् हसले काय
भाव माझे, कोणास काय
आयुष्य माझे, अस्तित्व माझे
आहे काय अन् नाही काय...
खचले काय अन् सावरले काय
भोग माझे,कोणास काय
आयुष्य माझे, अस्तित्व माझे
आहे काय अन् नाही काय...
हरले काय अन् जिंकले काय
दैव माझे,कोणास काय
आयुष्य माझे, अस्तित्व माझे
आहे काय अन् नाही काय...
तोडले काय अन् जोडले काय
मन माझे,कोणास काय
आयुष्य माझे, अस्तित्व माझे
आहे काय अन् नाही काय...
खोडले काय अन् लिहिले काय
शब्द माझे,कोणास काय
आयुष्य माझे, अस्तित्व माझे
आहे काय अन् नाही काय...!!!
३ टिप्पण्या:
तोडले काय अन् जोडले काय
मन माझे,कोणास काय
अप्रतिम कविता ..
Nice poem :)
अशी सारखी झुरू नकोस
आहे काय नाही काय म्हणू नकोस
दैव तुझे हरणार नाही शब्द तुझा पुसणार नाही
रडू नकोस खचू नकोस
अशी सारखी झुरू नकोस.
कविता आवडली मनास भिडली
म्हणूनच हि प्रतिक्रिया मना पासून लिहिली
टिप्पणी पोस्ट करा