हा लेख मी पंकज आणि दीपाली यांचे खास आभार मानण्यासाठी लिहित आहे.. :-)
त्यादिवशी पंकजचा mail आला एक महत्वाचं काम आहे,फोन कर किवा नंबर दे.. मी online होतेच, लगेचच त्याला call केला.. तो म्हणला दृष्टीकोन २०१० प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी सूत्र संचालन करणारं कोणीतरी हवय.. मी दीपालीच नाव सुचवलं.. ती या क्षेत्रात expert आहे आणि तिला बराच अनुभव आहे म्हणून.. मग दीपालीला फोन केला आणि पंकजशी बोल म्हणलं.. weekday असल्याने ऑफिसचा load बघून रविवार पर्यंत final करायचा असा त्यांचं ठरलं..
त्यानंतर याबद्दल माझं ना पंकजशी ना दिपालीशी कोणाशीच बोलणं झालं नाही.. मला वाटलं एव्हाना त्यांचं ठरलं असेल सगळं.. पण मंगळवारी सकाळी कळलं कि नेमकं त्यादिवशी client visit मुळे दीपालीला जमणार नाहीये.. मग पंकज म्हणला बघ आता कोणीतरी.. आज मंगळवार , कार्यक्रम शुक्रवारी.. आता २ /३ दिवसच राहिले होते.. कोणाला विचारावं बघत होते..
दिपालीशी बोलता बोलता आम्हा दोघींना वाटलं कि मी स्वतः प्रयत्न करावा का.. ती म्हणाली तुला कविता वाचायची सवय आहेच ,जमेल तुला .. मग पंकजला विचारला कि मी केलं तर चालणार आहेका तर तो म्हणला कि मी सगळ्यात पहिल्यांदा विचारलं होतं तेव्हा तू करावस अशीच अपेक्षा होती,तूच कर.. मी पुन्हा त्याला म्हणालं मला कवितेच्या कार्यक्रमाचा अनुभव आहे बाकी मी असं बाहेर कुठे सूत्रसंचालन केलं नाहीये.. तर तो म्हणला आपल्याला heavy निवेदन नकोय,कार्यक्रम कार्यक्रम informal असेल ..
झालं मग खूप mails mails.. पंकजला ३ दिवस खूप mails करून त्रास दिला.. :)) सगळ्यात आधी कार्क्रमाची रूपरेषा सांग म्हणलं .. मग त्याने कोण कोण येणार वगैरे बद्दल माहिती पाठवली,बर्याच links पाठवल्या.. मंगळवारी रात्री बरिस्तामध्ये भेटायचं ठरलं, तिथे गाईडलाईन्स मी, भूषण माटे (वसंतोत्सव सारखे कार्यक्रम अरेंज करण्याचा दांडगा अनुभव) आणि सुहास (आमची वन मॅन आर्मी) यांच्याकडून मिळतील असं पंकजने सांगितले..
त्या रात्रीची गम्मत म्हणजे पंकजला मी पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटणार होते.. :) गेले कित्येक महिने आम्ही mails मधून बोलत होतो.. तिकडे बरीस्ताच्या बाहेरच मोठा ग्रुप चर्चा कारत बसला होता.. पंकजने सर्वांशी ओळख करून दिली.. मी तर त्या वातावरणाने एकदम भारावून गेले.. एकतर ते सगळे gr8 photographers होते.. आणि तिकडे सगळ्यामध्ये उत्साह अगदी सळसळत होता.. रात्र झालीये वगैरे वाटत नव्हतं.. तिथे पंकज, सुहास, भूषण आणि सकाळचे मिलिंद वाडेकर यांची भेट झाली.. त्यांच्याशी कार्यक्रमाची रूपरेषा ,क्रम याबद्दल चर्चा करून मी लगेच निघाले.. १०वाजता आमच्या गदाजे दरवाजे बंद होतात ना ..
बुधवारी पंकजने पाठवलेली सगळी माहिती वाचून काढली.. फोटोग्राफर्स@पुणे हा ग्रुप गेले सलग ३ वर्ष छायाचित्रांच प्रदर्शन आयोजित करतो.. आणि त्यातून जमा होणारा निधी विद्या महामंडळाच्या special abilities असलेल्या विद्यार्थ्यांना दिला जातो.. व्यासपीठावर सकाळ’चे मिलिंद वाडेकर, डीएनए’चे विलास अवचट, अविनाश गोवारीकर, आणि विद्या महामंडळाच्या मॅडम, इंकफ्लोटचे सुनील जुनेजा असे लोक असतील असं पंकजने सांगितले.. त्या सर्वांबद्दल थोडी माहिती वाचली आणि त्यातून एक कच्चा मसुदा तयार केला.. दीपालीला म्हणलं आज रात्री मी तुझ्याकडे येतीय.. माझ्याकडे data तयार होता पण मला सूत्रसंचालनाची भाषा दिपालीकडून शिकायची होती.. ती जवळच रहात असल्याने रात्री ८.३०ला तिच्या घरी गेले.. ती ऑफिसमधून नुकतीच आली होती आणि तिला स्वयपाक करायचा होता.. तरी तिने माझ्यासाठी आवर्जून वेळ काढला.. मी लिहिलेलं तिला दाखवलं मग तिने काही typical वाक्य सांगितली जसे कि '... यांना व्यासपीठावर पाचारण करते'! तिच्याशी बोललं कि माझा आत्मविश्वास नेहमीच वाढतो.. तिला खूप अनुभव आहे या क्षेत्रात त्यामुळे तिने बर्याच टिप्स दिल्या.. हे सगळं झाल्यावर तिने नुकत्याच लिहीहिलेल्या '4th seat' या लेखावर आम्ही खुप वेळ बोलत बसलो.. १० वाजले तरी आमच्या गप्पा काही संपेना.. तिला म्हणलं घरून फोन यायच्या आधी आता निघते.. hsbc मध्ये असताना बसमध्ये आमच्या अशा गप्पा खूप रंगायच्या, i really miss those days.. असो.. रात्री घरी आल्यावर मग सगळं एकत्र लिहून पंकजला mail केलं.. त्याने लगेच reply केला,थोडे बदल सुचविले..
गुरुवारी काय काय बोलायचं final झालं होतं पण आता वाचायची practice करायची होती.. ६च्या बसने घरी आले आणि लगेच आमच्या इथल्या भीमसेन जोशी उद्यानात गेले.. बागेत गारठा जाणवत होता.. विशेष कोणी नव्हतं त्यामुळे थोडावेळ तिथे मोठ्यांदा वाचायचा सराव केला.. बागेतल्या थंडीमुळे कि काय मला सर्दी झाल्यासारखं वाटू लागलं.. वाटलं आता उद्या कसं होणार आणि लवकर झोपून गेले..
3 dec,10.. कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरु होणार होता .. मी आणि बाबा तिथे थोडं आधी पोहचलो.. बाबानाही प्रदर्शन बघता येईल म्हणून चला म्हणलं होतं.. तिथे गेले तेव्हा तयारी चालू होती.. क्षितिजा भेटली.. पंकजने विचारलं तू तिला कशी ओळखतेस,मी म्हणलं hsbc जिंदाबाद.. :) मग थोडावेळ तिथल्या फोटोमध्ये मी हरवून इतकी गेलेकी मला सूत्रसंचालन करायचं आहे याचा विसर पडला.. सगळेच photos एक से एक होते.. बाहेर सर्व छायाचित्रकारांचे छायाचित्र लावले होते.. माझ्या ओळखीतले तिथे पंकज,क्षितिजा आणि धृवचे photos होते.. तिथले photos आणि बाकी सगळं पाहून बाबा म्हणले तुला या लोकांनी सुत्रासंचालानासाठी कसं काय बोलावलं.. खरंतर मी सगळी स्टोरी घरी आधीच सांगीतली होती पण माझं सारखच काहीना काही चालू असत त्यामुळे तेव्हा त्यांनी seriously ऐकलं नव्हतं.. मी:पंकजने विचारलं.. बाबा: पंकजशी तुझी कशी काय ओळख.. मी: सिद्धार्थ कडून पंकजशी ओळख झाली.. सिद्धार्थ मुळे मला बरेच चांगले मित्रमैत्रिणी मिळाले इति..
त्यानंतर पंकज/सुहास/भूषणने ऐन वेळेसचे थोडे बदल सांगितले.. तिथे खूप मोकळे वातावरण होते त्यामुळे माझ्या मनावरचे दडपण एकदम कमी झाले.. p@p च्या सदस्यांबरोबर, विद्या महामंडळाच्या शिक्षिका ,पत्रकार वगैरे यांच्याशी ओळख झाली .. थोड्यावेळातच पाहुण्यांचे अविनाश गोवारिकरांचे आगमन झाले.. पण त्यांनी आल्यावर थेट photos बगःयला सुरुवात केली.. त्यांचं बघून झाल्यावर कार्यक्रम सुरु करण्याचं मला सांगण्यात आलं.. ठरल्याप्रमाणे मी बोलायला सुरुवात केली.. सुरुवात नीट होणं महत्वाचं होतं नंतर फक्त बाकीच्यांना call द्यायचे होते.. एकामागून एक सगळं इतक्या पटापट होऊनही गेलं.. आधी mike लांब धरल्याने मागे नीट आवाज गेलं नव्हता.. मध्ये पाहुणे बोलत असताना एकाने mike जवळ धरायला सांगीतले.. तेव्हाढ्यातल्या तेव्हढ्यात मी त्यांना विचारलं कि मी फार fast बोलले का तर ते म्हणले नाही तसं नाही,चांगलं बोलत आहेस, फक्त mike जवळ धर.. सगळ्या पाहुण्यांचं बोलून झाल्यावर सगळ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.. आणि मला हुश्श झालं..
खरंतर मी थोडावेळच बोलले आणि कदाचित ते किरकोळ होतं पण माझ्यासाठी ते खूप होतं.. क्षितिजा म्हणली चांगलं झालं तुझं म्हणून.. बाबांना विचारलं ते म्हणले आधी आवाज कमी आला पण नंतर व्यवस्थित झालं.. मग मला बरं वाटला.. fc रोडवरून १२.१५ची infy बस पकडायची होती .. म्हणून मग पंकज ,सुहास ,भूषण यांच्याशी बोलून मी लगेचच निघाले.. मला संधी दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानले..
हे सगळं इतकं सविस्तर पणे सांगायचं कारण कि पंकज आणि मी कधीही भेटलेलो नसताना त्याने माझ्यावर इतका विश्वास दाखवला होता याचं मला खूप कौतुक वाटलं.. अशा या विश्वासाच्या जोरावर कोणीही चांगलं काम करू शकतं,नाहीका.. आणि दीपालीचे मला खूप मार्गदर्शन मिळाले.. त्या दोघांमुळे माझ्यातला आत्मविश्वास दुणावला आणि मी सूत्र -संचालनाचे काम माझ्यापरीने पार पाडू शकले.. त्यांची मी मनापासून ऋणी आहे.. :))