त्या दिवशी उशीर झाला होता.. office नंतर बाहेरचं काम आटपून बालगंधर्व जवळ बसची वाट बघत थांबले होते.. रात्रीचे ८.३० वाजलेतरी बस गच्च भरून जात होत्या.. पूर्वी लाल डब्ब्याने बराच प्रवास केल्याने गर्दीत घुसून जागा मिळवायचं कौशल्य मला चांगलं अवगत आहे.. भरलेल्या बसमध्ये बसायला जागा मिळण्याचं सुख काय असतं ते रोजच्या प्रवाश्यांना नेमकं समजू शकेल.. असो.. तर बस धावत होती.. थंड हवा वहात होती आणि सोबत मी गाणी ऐकत होते.. नाही नाही , romantic असं काहीच घडलं नाही तेव्हा.. :P
त्या गर्दीत एक वयस्कर माणूस उभा होता.. नीट बघितल्यावर कळलं त्याचा तोल जात होता आणि तो वेग कमीजास्त होईल तसा इकडे तिकडे पडत होता.. त्या माणसाला कसलीच शुद्ध नव्हती.. आणि लोक त्याच्याकडे बघून हसत होते.. न राहवून मी त्या माणसाला बसायला जागा दिली.. लगेचच शेजारचा माणूस मला म्हणला तो पिलेला आहे त्याला कशाला जागा दिली? आणि मग बाकीचे लोक त्याच्याकडे बघून अजूनच हसायला लागले..
मला माहिती होता खरतर ,दारूचा एक विशिष्ठ वास येतच होता.. आणि मला स्वतःला दारू व दारू पिणाऱ्याबद्दल अतिशय चीड आणि तिरस्कार वाटतो.. पण माणसाची परिस्थिती खूप वेगळी वाटली.. बाबांच्या वयाएव्हडा वयस्कर माणूस होता,कपड्यांवरून साधा वाटत होता.. म्हणजे तरुण आहे म्हणून किवा पैसे आहेत म्हणून उधळण्यासाठी दारू घेतली नसावी त्याने असं मला वाटलं..
काहीतरी वेगळं कारण असेल असं उगाच विचार आला आणि कसातरी झालं.. आणि समजा त्याने व्यसनापोटी दारू घेतली असली तरी त्याला हसायचा का? असं केल्याने तो माणूस अजूनच चुकीच्या मार्गावर जाण्याची जास्त शक्यता असते.. खरतर अशावेळेस कोणाचातरी आधार हवा असतोना ? पण अशा वेळी सगळे हात वर करतात.. मनुष्यावर कधी कुठली परिस्थिती ओढवेल कोणालाच सांगता येत नाही.. मग दुसर्यांच्या दुखावर,वाईट गोष्टींवर ,कमतरतेवर ,अपयशावर किवा चुकावर आपण का हसावं? एकतर मदत करावी आणि ते जमत नसेल तर गप्प बसावं, नाही का?
२ टिप्पण्या:
मंतरलेले दिवस म्हणण्यासारखं काय होतं या लेखात?
बाकी ठीक.
वृंदा..
Chan kelas tu.
Mala tuzya baddal abhiman vatato.
Tu je kelas tytunch tuzya manacha mothe pana vatato.
टिप्पणी पोस्ट करा