मनाच्या रांगोळित.. रंग तुझे भरते..
अन् रंगात तुझ्या मी.. चिंब चिंब भिजते..
मनाच्या समईत.. ज्योत तुझी पेटवते..
अन् ज्योतीत तुझ्या मी.. लख्ख लख्ख उजळते.
मनाच्या अंगणात.. वेल तुझा लावते..
अन् वेलीत तुझ्या मी.. गच्च गच्च बहरते..
मनाच्या शृंगारात.. रत्न तुझे चढवते..
अन् रत्नात तुझ्या मी.. दिव्य दिव्य सजते..
मनाच्या मंदिरात.. नाम तुझे चिंतते..
अन् नामात तुझ्या मी.. कोटी कोटी वन्दिते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा