काहीजण देतात.. काहीजण घेतात.. प्रेमात तर सारे पडतात..
हेही करतात.. अन तेही करतात.. प्रेम तर सगळेच करतात..
कोणी घरावर.. कोणी जगावर..
पण प्रेम तर सगळेच करतात..
कोणी मोजूनमापून.. कोणी भरभरून..
अहो प्रेम तर सगळेच करतात..
कोणी लपूनछपून.. कोणी मुक्तपणे..
मात्र प्रेम तर सगळेच करतात..
कोणी हेतुपुरस्त.. कोणी निरपेक्ष..
तरी प्रेम तर सगळेच करतात..
कोणी डोळसपणे.. कोणी डोळेमिटून..
नक्की प्रेम तर सगळेच करतात..
काहीजण प्रेम शिकतात.. काहीजण प्रेम शिकवतात..
असो प्रेम तर सगळेच करतात..
४ टिप्पण्या:
सुंदर , अतिशय सुंदर . .. आणि अशा सुंदर कवितेवर सगळेच टिप्पणी करतातच.
कोणी जिंकतात कोणी हरतात
प्रेमाची लढाई सगळेच लढतात ......
खूपच छान जमलीय कविता.
छान आहे कविता ..
सुंदर ..
टिप्पणी पोस्ट करा