गेल्या काही दिवसांपासून मी 'श्रीकृष्ण पूर्ण पुरषोत्तम भगवान' वाचत आहे.. त्यामध्ये छोट्या छोट्या कथांमधून अध्यात्म खूप सुंदरपणे सांगितलं आहे.. नेहमीसारखच काळ रात्री झोपताना ती कादंबरी वाचायला घेतली आणि.. आणि जीवनातलं एक रहस्य उलगडलं.. :)
आपण नेहमीच ऐकतो कि या सृष्टीचा निर्माता,पालनकर्ता आणि संहारकर्ता 'तो' आहे.. सर्व कारणांचे कारण तोच आहे.. आपण जन्माला येतानाच त्याने आपल्या जीवनाचे अध्याय लिहून ठेवलेले असतात.. आपल्या हातून जे काही घडते त्यामागची प्रेरणा आपल्याला परमेश्वर तथा परमात्म्याकडून मिळत असते..
बर हे असं सगळं आहे तर मग कधी कधी माणूस दुखी का होतो? कितीही प्रार्थना केलीतरी प्रत्येक माणसाला कधीना कधी संकटांचा तडाखा का बसतो? याला एक कारण असं असू शकतं कि आपली गतजन्माची कृत्ये.. पण मग देव आपल्या हातून असे कर्म का घडवून आणतो कि ज्याने आपणास खूप दुख होतं,त्रास होतो? असे प्रश्न मला नेहमीच पडतात! (दिल तो बच्चा है जी)
काल मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं.. आणि अगदी मनोमनी पटलं.. :)
"दुखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही!!!"
सर्वसाधारणपणे माणूस देवाची प्रार्थना करतो ते भौतिक गोष्टी मागण्यासाठी.. अगदी लहानपणीपासून सुरुवात होते पहा.. देवा मला परीक्षेत चांगले गुण मिळूदे.. मला चांगली नोकरी मिळूदे.. माझं स्वतःच घर/गाडी होऊदे.. देवा मला चांगला जोडीदार मिळूदे.. माझी तब्येत चांगली ठेव.. इत्यादी.. इथेच गोचा होतो.. सगळे ग्रंथ हेच सांगतात कि मानवी जीवनाचा खरा हेतू पैसे मिळवणे/लग्न/मुलबाळ होणे हा नाहीये.. परमेश्वराला ओळखणं आणि मी कोण आहे याचा शोध घेणं हा खरा उद्देश आहे.. अर्थात त्यासाठी संसार सोडून सन्यास घेतला पाहिजे असं काही नाहीये.. तर नित्य कर्म करता करता देवाची शुद्ध भक्ती करावी असं अभिप्रेत असतं.. म्हणून देव आपल्या भक्तांना कधी कधी भयंकर प्रतिकूल परिस्थितीत टाकतो कि जेणेकरून आपल्या मनात शुद्ध भक्तीभाव निर्माण व्हावा.. तो मुद्दाउन एका क्षणी सुखाची सावली अन दुसऱ्या क्षणी दुखाची झळ देतो त्यामुळे भक्ताच्या मनातून मायावादी भौतिक गोष्टींची आसक्ती कमी होऊ लागते.. त्या वेळेस भक्ताला जाणीव होते कि आपण जे आपलं म्हणून मिरवत आहे ते काही आपलं नाहीये आणि ओघाने माणसाचा अहंकार कमी होतो.. आपल्या मनातल्या वासना,अहंकार वगैरे वाईट गुण गेले कि आपण शुद्ध भक्तीच्या मार्गावर येतो आणि मग आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थाने वाटचाल सुरु होते..
असं म्हणतात कि आपण जशी कृत्य करतो तशा योनीमध्ये आपला जन्म होतो.. वाईट कृत्य केल्यावर नीच योनीत प्रवेश मिळतो.. चांगली कृत्ये केलीतर स्वर्गात जागा मिळते .. आणि जेव्हा पाप पुण्याची संख्या बरोबर सारखी होते तेव्हा मनुष्यजातीत जन्म होतो.. नीच योनिबद्दल काही वेगळं सांगायला नको.. स्वर्गाबद्दल असं बोललं जातं कि संचित पुण्य संपला कि स्वर्गातून पुन्हा खालच्या योनीत आणलं जातं.. याचा अर्थ स्वर्ग हेही शाश्वत स्थान नव्हे.. आता उरला तो मनुष्यजन्म.. जीवाला हि मिळालेली एक सुवर्णसंधी असते.. माणसाने जर आपल्या जन्माचा अंतिम हेतू ओळखला नाही ,जर तो मिथ्या क्षणिक भौतिक जाळ्यात गुंतून पडला तर त्याचा मनुष्य जन्म फुकट वाया जातो आणि मग त्याला पुन्हा इतर योनीत जावे लागते अशा रीतीने तो जन्म मरणाच्या चक्रात फिरत राहतो.. पण जर एखाद्याने प्रपंच सांभाळता सांभाळता परमेश्वराला ओळखण्याचा,त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याला परमेश्वराच्या शाश्वत दिव्य धामात कायमसाठी प्रवेश मिळतो.. आणि त्याच्या जन्माचं सार्थक होते..
मी हे सगळं लिहित आहे याचा अर्थ असं नाहीये कि मला हे जमतं.. खरतर मी आतापर्यंत दासबोध आणि अजून अध्यात्मिक ग्रंथ/पुस्तके वाचले आहेत त्यातून सार शोधण्याचे प्रयत्न करत आहे.. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.. :)
ग दि माडगुळकरांनी म्हणले आहेना..
तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
1 टिप्पणी:
chhan lihila aahes ... Its great that you get time to writesomething daily .. :)
Keep penning ..
Cheers
Sonia
टिप्पणी पोस्ट करा