भिजलेल्या मातीत अंकुर फुटेल कधीतरी
सारवलेल्या अंगणात सडा पडेल कधीतरी..
अवखळ वाऱ्याला दिशा सापडेल कधीतरी
वाहत्या प्रवाहाला उसंत मिळेल कधीतरी..
निळ्या नभांगणात नक्षत्रे चमकतील कधीतरी
वेळूच्या बनात चांदणं पसरेल कधीतरी..
ओघळणाऱ्या आसवांचे मोती होतील कधीतरी
भरगच्च मनाचे ओझे संपेल कधीतरी..
कधीतरी शब्दाचा अर्थ कळेल कधीतरी
अन त्या अर्थाचा बोध होईल कधीतरी..
सारवलेल्या अंगणात सडा पडेल कधीतरी..
अवखळ वाऱ्याला दिशा सापडेल कधीतरी
वाहत्या प्रवाहाला उसंत मिळेल कधीतरी..
निळ्या नभांगणात नक्षत्रे चमकतील कधीतरी
वेळूच्या बनात चांदणं पसरेल कधीतरी..
ओघळणाऱ्या आसवांचे मोती होतील कधीतरी
भरगच्च मनाचे ओझे संपेल कधीतरी..
कधीतरी शब्दाचा अर्थ कळेल कधीतरी
अन त्या अर्थाचा बोध होईल कधीतरी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा