पाहिजे तेव्हा गोड
पाहिजे तेव्हा तिखट
हवी तश्या चवीने खाता येते
म्हणून मला पाणीपुरी आवडते..
सोबत असलीतर ठीक
सोबत नसलीतरीही ठीक
हवी तेव्हा एकटीएकटी खाता येते
म्हणून मला पाणीपुरी आवडते..
लहानग्यांना आकर्षित करते
मोठ्यानाही मोहित करते
हव्या त्या वयात खाता येते
म्हणून मला पाणीपुरी आवडते..
कोणालाही मागता येते
कोणालाही देता येते
हवी तितकी मनसोक्त खाता येते
म्हणून मला पाणीपुरी आवडते..
सुखात खावीशी वाटते
दुखातही बरी वाटते
क्षणभर स्वतःचा अन जगाचा विसर पाडते
म्हणून मला पाणीपुरी आवडते..!!!
1 टिप्पणी:
वृंदा..पाणीपुरी कविता आवडली
खुप सुंदर :-)
तुमच्या ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) उदा.http://vrindapanchawagh.co.cc मिळवायचे असेल..तर सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे.
धन्यवाद
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/free-domain.html
टिप्पणी पोस्ट करा