गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

मंतरलेले दिवस - ५३

 सागरा प्राण तळमळला..

मंतरलेल्या क्षणांमधे भर म्हणून नुकतच अंदमानला जायचा योग आला.. तिथले द्वीप खूप सुंदर आहेत हे वेगळे सांगायला नको.. पण तिथे जाताना फक्त तिथल्या सौंदर्याचे आकर्षण नव्हते.. पोर्ट ब्लेअर मधले सेल्यूलर जेल बघणे हा ट्रिप मधील अतिशय महत्वाचा घटक होता..  नुकतच 'माझी जन्मठेप' वाचले असल्याने तिथल्या बराक्या बराक्या गोष्टी मला आठवत होत्या.. अगदी जेलच्या मुख्य गेट पासूनचे वर्णन प्रत्यक्ष गेटमधून आत जाताना आठवत होते.. गाइड माहिती सांगत होता त्या गोष्टी ऐकून आम्ही सगळेच निशब्द होत होतो.. थोड्यावेळाने मी गाइडला म्हणले सावरकरांची खोली कधी दाखवणार.. फार उत्सुकता होती त्या जागी जायची.. त्याकाळच्या वस्तू , तेलाचा घाणा, फाशी द्यायची जागा इत्यादी पाहत पाहत सावरकरांच्या खोली पाशी आलो.. मी गेल्या गेल्या तिथल्या भीती पहिल्या , काही दिसतय का जवळ  जाऊन पहिले..  कारण त्या भिंतीमध्ये त्या काळी सावरकरांनी त्यांच्या कविता लिहून ठेवल्या होत्या.. अर्थात आता रंग दिल्याने कविता नव्हत्या.. समोर सावरकरांचा फोटो आणि कमलाकाव्याच्या काही ओळी लिहिलेली तासवीर् भिंतीवर  दिसली.. आणि त्यांच्या नावाची एक पाटी होती.. बंदिस्त असतानाही त्या जागेवर सावरकरांनी प्रचार केला, कैद्यांना शिक्षण दिले , जन जागृती केली आणि महाकाव्य रचले..  गर्दी असूनही थोडावेळ मी तिथे खाली बसले.. तिथून  माझा पाय निघतच नव्हता..  मराठी लोकांना सावरकारांमुळे काळ्या पाण्याची शिक्षा काय होती याची कल्पना आहे.. पण इतर लोक साईटसीन्गचा भाग म्हणून ते जेल पहात होते.. सर्वाना इथल्या कैद्यांनी भोगलेल्या यातानांची जाणीव व्हावी यासाठी संध्याकाळी 'लाइट & म्यूज़िक' शो दाखवण्यात आला तो फरच हृदयसपर्शी कार्यक्रम होता.. सावरकारंबद्दल सांगताना 'जयोस्तुते' गाणे लावले गेले..  जेल्च्या मोठ्या मोकळ्या परिसरत मोठ्या आवाजात या गाण्याचे स्वर दुमदुमत असताना मराठी उर भरून आले.. कारागृहातून बाहेर आलो तर समोरच्या बागेत सावरकरांचा आणि बाकी राजकैदयांचे पुतळे होते..

हे सगळं पाहून आम्ही भारावून गेलो पण तरी मनात काहीतरी चुकल्या सारखे वाटत होते.. स्वतहाचे घरदार सोडून हे लोक देशासाठी धाडसी पराक्रम करताना पकडले गेले होते.. परत कधी घरी जाऊ की नाही अशी शंका असूनही रडत न बसता धीर दाखवून साखळ्यामधे बंदिस्त असतानाही सावरकरांनी मातृभिमिसाठी जे काही करता येणे शक्य होते त्याहून कितीतरी पटीने जास्त काम केले.. आणि त्या जेलमधे आता त्यांचा फक्त एक फोटो आहे.. बास.. अगदी कोणाला काही वाटू नये म्हणून पुतळे समोरच्या उद्यानात बांधले आहेत.. एरवी आपल्याकडे वाईट कृत्ये करणार्‍या नेत्यांचे पुतळे आणि त्यांच्या वाढ दिवसाचे फलक आणि मोठाले छायाचित्रे जागोजागी पाहायला मिळतात.. हा कसला न्याय? सावरकरांच्या जागी कदाचित कोणी अमराठी माणूस असला असता तर कदाचित त्या जेल मध्ये त्यांच्या स्मृति प्रत्यर्थ त्याना मान देण्यासाठी विशेष योजना केली गेली असती असं मला वाटलं.. अर्थात हा वादाचा मुद्दा आहे.. मला राजकारण नीट काळत नाही त्यामुळे याबद्दल मी जास्त लिहीणे योग्य नाही..

असे अनुभव आपल्या जीवनात बरेचदा येतात.. एखाद्यासाठी आपण जीव तोडून काही करतो पण ती व्यक्ती मात्र कधी कधी आपल्या कश्टान्ची अन् भावनांची किंमत माती मोल ठरवते.. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हा आपल्यासाठी हितकारक उपदेश.. पण त्यांच्या बाजूने ते बरोबर वागत आहेत का हे ते एकदाही पाहत नाही याची कधी कधी खंत वाटते.. नुकसान त्यांचे होत आहे हे जाणून त्यांची कीव येते.. कारण  सगळा हिशोब देवाच्या दरबारात परमेश्वर अचूक करत असतो..  तिथे तुम्ही आम्ही कोणी नसतो.. मला खात्री आहे भारतात सावकारांच्या पराक्रमाला दाद जरी कमी मिळाली असेल तरी भगवंत धामत ते महात्मा म्हणून वावरत असतील!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: