सुट्टीचा दिवस.. सह्याद्रीतली नसली तरी पुण्यातली भटकंती चालूच होती.. लाडक्या भाच्याला भेटायला गेले होते.. तिकडे जाताना नेहमीप्रमाणे सोबत भरपूर खाऊ आणि त्याच्यासाठी घेतलेल्या वस्तू होत्या.. त्याच्यासोबत मनसोक्त खेळून परत निघाले.. गाडीवर असताना मैत्रिणीचा फोन आला तो घेणे महत्वाचे होते म्हणून गाडी बाजूला घेऊन थांबले.. फोनवर बोलता बोलता माझ लक्ष रस्त्याच्याकडेला गेले.. रस्ता खोदून काम चालू होते ही काही नवीन गोष्ट नव्हती.. पण उन्हात घाम गाळुन केबल टाकायचे काम करत असलेल्या लोकांमधे एक छोटा मुलगा त्याच्या आई वडिलंसोबत काम करताना दिसला..
आई वडील खोदकाम करत होते आणि त्या मुलाने केबल धरली होती.. माझं लक्ष गेलं कारण त्या बारक्याला त्याचे वडील कशावरून तरी रागावत होते.. एकतर त्याचे वय काय आणि त्यात उन्हाची वेळ.. या वयात इतर मुले खेळ खेळण्यात दंग असतात आणि हा बिचारा कष्टाचे काम करत होता.. ही विषमता मला नेहमीच अस्वस्थ करून टाकते.. आपल्याकडे लहान मुलांचे पालक किती लाड करतात.. मी मोठी होऊनही माझे आईबाबा मला किती जपतात... आणि नुकतच मी तर भाच्याचे कौतुक करून आले होते.. त्याप्रमाणे या मुलाच्या आईवडिलांनाही तसंच काही वाटत असेल पण कदाचित परिस्थितीमुळे त्यांना मुलाला काम करायला लावण्यास भाग पडले असेल..
नुसता विचार करण्यात काही अर्थ नाही म्हणून मी लगेचच गाडी मागे फिरवली.. कोपर्यावर दुकाने होती तिथे गेले.. खरंतर मला त्या छोट्यासाठी छान टोपी घ्यावी वाटली.. पण तिथे तसे दुकान नव्हते.. आणि लांब जाऊन टोपी घेऊन परत येईपर्यंत कोण जाणे हे लोकं कुठे असतील.. मग मोठा रुमाल विकत घेतला.. बिसकिट्स आणि चोकोलेट्स घेऊन पुन्हा त्याठिकाणी गेले.. द्यायचे कसे,सुरूवात कशी करावी ,त्यांना आवडेल का असं दिलेले,ते स्वीकार करतील का वगैरे मनात विचार चालू होते..
शेवटी थेट त्या मुलाजवळ गेले आणि नाव विचारले.. ते लोक मराठी नव्हते,त्याने काहीतरी नाव सांगितले ते मला कळले नाही.. मग मी त्याच्या हातात पिशवी दिली.. त्याने घेऊन त्यात काय काय आहे ते पहिले आणि त्याच्या चेहरयाची कळी एकदम खुलली.. त्याने लगेच त्याच्या आई वडिलांकडे पहिले.. ते सुधा अतिशय खुश झाले.. आणि त्या सर्वांचे हसरे चेहरे पाहून मला फार आनंद झाला जो मी शब्दात सांगू नाही शकत..
काही जणांना वाटते हिला काही जबाबादार्या नाही,भरपूर रिकामा वेळ असतो म्हणून असले करायला सुचते.. :) कदाचित असं काही खास करण्यासाठी माझा जन्म असेल म्हणून देवाने मला बाकीच्या कशात अजुन अडकवले नसावे.. :) God knows.. देवाची लीला अगाध आहे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा