ये लम्हे, ये पल हम बरसो याद करेंगे..
सहसा एखद्या कंपनीचे मूल्यमान पगार, पगार वाढ, बोनस, कामाचा दर्जा, परदेशगमनाच्या संधी वगैरे यामध्ये केले जाते.. या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण इन्फीमध्ये या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी आहेत ज्या मला मनापासून फार आवडतात.. इथे वर्शोन्वर्शे राहून सुद्धा कोणाला कदाचित काही गोष्टी माहिती नसतील मात्र मी इथे पहिल्यापासून सर्व गोष्टींचा मनमुराद आनंद उपभोगत आहे.. नव्याचे नऊ दिवस ओसरल्यावरही हा आनंद टिकून आहे हे विशेष..
मला बरेचजण म्हणतात तू अगदी रोज न चुकता उत्साहाने GMमेल कशी काय पाठवतेस.. All credit goes to infy campus.. इथे रोज सकाळी आल्यावर रन्गिबिरन्गि फुलांचे ताटवे आणि गलिच्यासारखी पसरलेली हिरवळ पाहून मन टवटवीत होते.. मध्ये मोठी बाग आणि त्या भोवती १५/१६ छोट्या छोट्या बिल्डिंग्स असे कॅम्पस आहे.. बिल्डिंग्स आणि बागेच्या मध्ये चालण्यासाठी पांढर्या फरशा टकल्या आहेत.. ते हिरवे आणि पांढरे कॉम्बिनेशन अप्रतिम दिसते.. त्यात भर म्हणजे संध्याकाळी अंधार पडला की छोटे छोटे दिवे त्या बागेची शान जास्तच वाढवतात.. फरशान्च्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडं आहेत.. त्यामुळे उन्हळ्यातही इथून चालताना उन्ह जाणवत नाही..
बागेत हिरवळीच्या मध्ये विविध फूलझाडे नागमोडी वळणात लावले आहेत जणू की नदीचा प्रवाह वाहत आहे.. आणि त्यावर एके ठिकाणी छोटा लाकडी पूल बांधला आहे.. तो पूल म्हणजे कॅम्पस मधली बेस्ट जागा आहे,तिथे कायम फोटोसेशन चालते.. आणि विशेष म्हणजे १२ महिनेही इथली झाडे फुलांनी बहरलेली असतात.. शिवाय वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट सुद्धा ऐकायला मिळतो.. चिमुकल्या खरुताई पळत दिसतात तेव्हा छान वाटते.. तिथून पुढे मग अम्पी थेअटर - ओपन थेअटर आहे.. स्टेज भोवती वर्तुळाकारात फारशांनी पायर्या केल्या आहेत.. खास कार्यक्रम असेल तर हा भाग लाइटग्सने फुलतोच पण एरवी सुद्धा इथे थोडावेळ येऊन बसले की खूप शांत वाटते.. सहसा इथे कोणाला बसून देत नाही असे मी ऐकले आहे पण मला नाही उठवले आजपर्यंत.. पाऊस असेल तर अजुनच मजा येते.. कितीही काम असले तरी सकाळी किंवा संध्याकाळी एक चक्कर मारायचा मोह मी अवरू शकत नाही..
इथे खाण्यापिण्याची चन्गळ आहे.. ३ फूड कोर्ट मध्ये खूप सारे पदार्थ.. पण याहून खास गोष्ट म्हणजे MDP चा चहा.. टपरी सारखे फिल येईल अशी त्यांची स्वतंत्र गाडी.. आल्याचा चहा.. सकाळ संध्याकाळ इथे चहासाठी कायम गर्दी असते.. एक मोठी चक्कर मारुन चहा प्यायचा हा नित्य कार्यक्रम असतो माझा.. एकतर चालण्यासाठी इतकी स्वच्छ सुंदर प्रदूषणमुक्त जागा मिळणे हल्ली अवघड झाले आहे.. मग माझ्या सारख्या एकंतात रमणार्या मुलीला अजुन काय पाहिजे.. सोबत असली तरी चालते आणि नसली तरी विशेष फरक पडत नाही..
या व्यतिरिक्त मला आवडणारी जागा म्हणजे इथला मेडीटेशन हॉल.. बाहेरून चेंडू च्या आकारात दिसणारा हा हॉल आतून खूप सुंदर आहे.. मला मेडीटेशन वगैरे फारसे जमत नाही.. पण कधी वाटले तर इथे येऊन बसले की एकदम शांत वाटते.. आजकालच्या तणावाच्या जीवनात या अशा जागा फार उपयोगी आहे.. अर्थात आपण त्याचा सदुपयोग केला तर.. त्या बिल्डींग मध्ये समोरच बॅडमिंटन हॉल आहे.. जसे जमेल तसे आम्ही मुली बॅडमिंटन खेळायला जातो,मजा येते.. शिवाय इतर स्पोर्ट्स आणि जिम सुद्धा आहे जिथे मी अजुन एकदाही कधी गेले नाही.. तिथे खाली स्विम्मिंग टॅंक आहे.. निळ्या रंगाचे भासणारे ते स्वच्छ पाणी बघून डोळ्यांना फार बरे वाटते.. :)
अजुन आवडती जागा म्हणजे इंफिची लायब्ररी.. अभ्यासाची पुस्तके नाही वाचली मी तिथे कधी पण सुधा मुर्तींची सर्व पुस्तके वाचून काढली आणि त्यांचे समाज कार्य बघून मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली.. इतक्या मोठ्या व्यक्ती असूनही त्यांचे लिखाण किती साधे सुधे,अगदी आपलेच वाटणारे.. भावनांचा आणि व्यवहाराचा सुंदर मिलाप त्यांच्या लिखाणात जाणवतो.. Am really her biggest fan..
हे सगळे मी दिखावा करण्यासासाठी बिलकुल सांगत नाहीए.. मी मनापासून या गोष्टी एन्जॉय करते म्हणून नमूद करून ठेवत आहे.. मला माहिती नाही मी इथे कधी पर्यंत असेल.. पण पुढे जेव्हा कधी ईनफी सोडायची वेळ आली तर तेव्हा या सार्या गोष्टींची आणि या दिवसांची फार आठवण येईल हे मात्र नक्की!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा