बुधवार, ५ जानेवारी, २०११

मंतरलेले दिवस - ११

आज  कितीवेळ  जागेवरून   हललेच  नव्हते.. शेवटचा  mail करून  जरा  गडबडीतच  निघाले.. थोडी  भूक  लागल्यासारखे  वाटत  होते..  जाता  जाता  कॅन्टीन  मधून  काहीतरी  घेऊन  जावं  म्हणालं.. counter  पाशी बिस्किट घ्यायला   गेले.. बसची  वेळ  होत  होती  आणि  नेमके  सुटते  पैसे  नव्हते.. झालं  मग  काय  तो  कॅन्टीन  वाला  कटकट लागला करायला..  १०  रुपयाच्या  बिस्किटासाठी  १०० ची  नोट  काय देता..  सुट्टे  नाहीयेत नाहीतर दिलेच असते असं म्हणालं तर तो   म्हणे  अजून  काहीतरी  घ्या  वगैरे.. मला  बाकी  घ्यायचे   नव्हतं  त्यामुळे  मी  शेवटचं विचारलं  देताय  का  नाही  तर  राहिल.. मग  तशीच  बाहेर  आले.. बसला  अजून  थोडा वेळ  होता.. बस  थांबतात  तिथेच  एक   दाणेवाला   होता.. दाणे  घ्यावे   का  विचार  करत  अस्नता  तो  म्हणला  'ताई,दाणे  देऊ  का'.. चिल्लर सापडतायत का  बघू लागले  पण  नाहीच मिळाले.. शेवटी  त्याला  म्हणालं  राहूदे ,आता  सुट्टे  नाहीयेत  पुन्हा  कधीतरी  घेईन.. तर  तो  स्वताहून  म्हणला  माझ्याकडे  आहेतना,मी  देतो! :)


तर  हे  असं  आहे  पहा .. त्या  दाणेवाल्याला  गरज  होती  म्हणून  त्याने  ५  रुपयांसाठी  १०० रुपये  सुट्टे  दिले.. आणि  त्या  कॅन्टीन वाल्याला   माझ्या  घेण्या  न  घेण्याने  विशेष  फरक  पडणार  नव्हतं  म्हणून  शेवटपर्यंत  त्याने  काही  सुट्टे   दिले  नाहीत.. असच  असतं ना .. काही  जणांसाठी  आपण just one of d असतो  त्यांना  आपली  मुळीच  गरज  नसते, आपण  असलो  काय अन  नसलो  काय.. मग  ते  लोकं  माज  करतात.. आणि  काही  लोकांसाठी  आपल्या अगदी  किरकोळ  गोष्टीही  विशेष  असतात.. कोणत्या   ना  कोणत्या  कारणाने  त्यांना  आपण  हवे  असतो  म्हणून  ते  आपल्याशी  चांगलं   वागतात..

 वपुंनी  पार्टनर  मध्ये  म्हणालं  आहेना.. "लक्षात ठेव दोस्त,तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस"!!!

1 टिप्पणी:

हेरंब म्हणाले...

मस्त लिहिलंय.. वपुंचं वाक्य एकदम परफेक्ट जागी वापरलं आहे..