भूत नाही.. भविष्य नाही.. वर्तमान ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचा.. काळ कोणता आहे बरं..
उंच नाही.. खोल नाही.. सपाट ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचं.. माप काय आहे बरं..
कृष्ण नाही.. धवल नाही.. रन्गहिन ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचा.. रंग कसा आहे बरं..
कोरं नाही.. मळकं नाही.. पुसट ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचा.. रूप कसं आहे बरं..
गोड नाही.. तिखट नाही.. कडवट ही नाही खरं..
तुझ्या माझ्या नात्याचि .. चव कशी आहे बरं..
नाही नाही म्हणलं तरी.. काहीतरी आहे खरं..
तुझ्या माझ्या नात्यावर.. कविता कशी लिहावी बरं.. ? :-)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा