या हातावर ओली मेंदी .. रंगेल का रे कधीतरी..
या हातात हिरवा चुडा.. चढेल का रे कधीतरी..
या अंगावर पिवळी हळद.. उठेल का रे कधीतरी..
या कपाळावर सौभाग्य कुंकू.. लागेल का रे कधीतरी..
या गळ्यासाठी काळे मणी.. ओवेल का रे कोणी कधी..
या पायात नक्षी जोडवी.. घालेल का रे कोणी कधी..
या हातास हातात कोणी.. कायमसाठी घेईल का रे कधी..
या मनफुलास हृदयात कोणी.. धृवपद देईल का रे कधी.
नसेल असा जरी कुठे कोणी.. हरकत नाही खरं माझी काही..
तूच यावे हरी माझ्या घरी.. घेऊन जावे मज तुझ्या द्वारी..
घेऊन जावे मज तुझ्या द्वारी..!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा