बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

मंतरलेले दिवस - 2

HSBC सोडून नुकतीच Infy मध्ये भरती.. नवीन जागा,नवे लोक,सगळं कसं नवीन नवीन होतं.. त्यातले काही दिवस अगदी खास होते कारण त्या दिवसात ना HSBC चा रखड़लेला पगार ना Infy चा नवीन पगार.. खात्यात आधीचे थोड़ेफर पैसे शिल्लक होते पण पण.. HSBC GLT 2.0 च्या कॅंटीन मध्ये खाल्यानन्तर जगाच्या पाठिवरचं कोणतही कॅंटीन "BEST' वाटणं यात माझी चूक नव्हति.. :-P
Infy मधले प्रशस्त Canteen आणि मुख्य म्हणजे 'Bench' वरचे दिवस.. त्यामुळे सकाळ दुपार सन्ध्याकाळ आम्ही फक्त चरतच होतो.. हळु हळु जाणवलं की 'bank balance' अधोगतिला जाउ लागला आहे.. तसे माझे वयक्तिक खर्च विशेष नसतात.. मी अज़ून तरी 'free bird' आहे, no committments, nothing.. शिवाय 'home loans','car loans' वग़ैरे मोठ्या लोकांच्या गोष्टी मला लागू पड़त नाही.. असं असलं तरी काहीना काही खर्च तर माणसाला असतोचना.. आजून एक महिना जायचा होता.. याच विचारात गढले असताना अचानक आकाशवाणी झाली.. हाहाहा.. म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्रावरून phone आला.. "तुमचा cheque घेऊन जा!!!" माझ्यासाठी ही आश्चर्याची बातमी होती.. कारण radio वर कविता वाचायची संधी मिळाली हेच खूप होतं त्याबदल्यात पैसे मिळतील हा विचार माझ्या मनाला चुकुनही शिवला नव्ह्ता.. अर्थात ती रक्कम जास्त नव्हती पण माझं बाकी कुठंही अर्थाजन होत नव्ह्तं तेव्हा अगदी त्याच वेळी हा cheque मिळणं हा मोठा योगायोग होता.. देवाचं आपल्याकडे नेहमी लक्ष असतं ,आपण एकटे कधीच नसतो ही गोष्ट मला प्रत्येक घटनेनंतर जाणवते!!! :-)

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

ऋण...




पावसाची एक सर येता,

चटके उन्हाचे विरून जातात..


अन् गंध मातीचा सुटता,


हिरावाईचे गालीचे पसरतात..


मग वळून मागे पाहता,


ऋण त्या उन्हाचे स्मरतात..


ऋण त्या उन्हाचे स्मरतात...!



सुखाचा एक क्षण येता,

क्षण दुखांचे संपतात..


अन् नव चेतना मनास मिळता,


जीवनास सुंदर फुलवतात..


मग वळून मागे पाहता,


ऋण त्या दुखाचे स्मरतात..


ऋण त्या दुखाचे स्मरतात...!

रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

रूक्मिणी स्वयम्वर..

पूर्वीच्या काळी ईच्छित वर प्राप्तीसाठी मुली 'रूक्मिणी स्वयम्वर' पोथी चे वाचन करायच्या.. त्यापद्धतीने एक दिवस माझ्या आजीनेही मला ती पोथी वाचायला दिली.. मला मुळात वाचनाची आवड आहे.. त्यातून हा विषय थोडा interesting होता, म्हणलं वाचून बघावं,काय हरकत आहे.. आतापर्यंत ही गोष्ट इकडून तीकडून ऐकली होती त्यामुळे अगदीच नवीन नव्हती.. पण या पोथितुन बरच खोल वर्णन वाचायला मिळालं..
विदर्भातल्या भीष्मक राजाची 'रूक्मिणी' ही एकदम बुद्धिवान,रुपवान,शीलवान आणि उदार मनाची अशी एकुनति एक कन्या.. त्याच्या राजवाड्यात बरेच सधुसन्त कीर्तन करायला यायचे.. त्यांच्याकडून रूक्मिणिने श्रीकृष्णबद्दल बरच ऐकला होता.. कोणी त्यांच्याबादल सांगायला लागला की तिला अजुन ऐकावसं वाटे.. श्रीकृष्णांच्या किर्ती,रूप, ऐश्वर्य आदी गुणांनी ती खुपच प्रभावित झाली होती.. लग्न करेन तर श्रीकृष्णांशीच असं तिने मनोमानी ठरवलं होतं.. पण तिच्या बंधूंनी तिचं लग्न शिशुपालाशी ठरवून ठेवलं होतं.. रूक्मिणी एक राजकुमारी होती, खंबीर मनाची होती.. तिच्या विश्वासातल्या सुपात्र ब्राम्हणाला तिने एक पत्र लिहून श्रीकृष्णांना सुपुर्त करायला सन्गितलं..
ही कथा वरवर पाहता साधी वाटते.. पण मला रुक्मिणिच्या धाडसाचे फरच कौतुक वाटतं.. त्या काळी मुली उंबरठा ही ओलांडून जात नसत.. तरी खास पत्र लिहून श्रीकृष्णांना निरोप पाठवायचा तिला कसं सुचलं असेल.. त्या ब्राम्हणावर किती विश्वास ठेवावा लागला असेल,त्याने मधेच कुठे बातमी फोडली असती तर.. आणि तो निरोप वेळेत मिळणं खूप मह्त्वाचं होतं.. इकडे रूक्मिणी-शिशुपालाच्या लग्नाची जोरात तयारी चालू होती.. त्या काळात दळणवळणाचं विशेष साधन नव्ह्तं.. विदर्भ ते द्वारका असा प्रवास त्या ब्राम्हणाने खडतर प्रवास कसा संपवला असेल..
शिवाय रूक्मिणिने केवळ श्रीकृष्णांबद्दल ऐकलं होतं.. ते पत्र वाचून श्रीकृष्ण कशी प्रतिक्रिया करतील , ते वेळेत येतील का वगैरे कितीतरी प्रश्‍न तिच्या मनात आले असतील.. तिने पत्रात सरळ सरळ लिहिलं होतं की इथून माझं हरण करून पाणिग्रहण करावं..माझी शिशुपलाशी लग्न करायची मुळीच इच्छा नाही त्या अगोदर इकडे यावं.. एव्हढच म्हणून ती थांबली नव्हती तर कुठून पळवणं सोपं जाईल अशी सोयीस्कर योजना तिने श्रीकृष्णांना पत्रातून सविस्तरपणे कळ्वली होती.. यालाच 'settings' म्हणतात !!! :) त्या काळी लग्नाच्या आधी देवीच्या मंदिरात जायची पद्धत असायची त्या वेळेस त्या मंदिरात तिचे बंधू वगैरे नसतील तर तिथून पळवता येईल अशी बीनचुक आखणी तिने केली होती.. आणि नंतर अगदी तसंच घडलं हे विशेष..
असं म्हणतात की रूक्मिणी लक्ष्मी देवीचा एक अवतार आणि श्रीकृष्णंबद्दल वेगळं काही सांगायला नको.. तरीही त्याकाळात एका स्त्रीने प्रेमात पडून एका पुरुषाला पत्र लिहावं आणि पळून लग्न करायची योजना आखणं याचं मला थोडा जास्तच नवल वाटलं! :))

लहानपण देगा देवा!!! :)

शनिवार संध्याकाळी घरजवळच्या टेकडीवर फिरायला गेले होते.. मनसोक्त भटकून, सूर्यास्त आणि चन्द्रोदयाचे दर्शन घेऊन घरी परतत होते.. त्या टेकडीच्या आसपास नवीन बांधकाम चालू आहेत.. रस्ता छोटा आणि कडेला मोठमोठ्याल्या इमारती.. तिथेच कुंपणापालिकडे बांधकाम करणार्‍या लोकांची वस्ती.. वीकेंड ईव असल्याने साहजिकच रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होती..
एकएकी तारेच्या कुम्पणातुन एक छोटसं गोंडस पोरगं रस्त्यावर धावत सुटलं.. नुकतच चालयलां लागलं असेल कदाचित.. अंगावर एकही कपडा नव्हता,उन्हामुळे काळवन्डलं होतं.. त्याच्याकडे बघेस्तोवर मागून एकदम एक कार जोरात आली.. एव्हद्या लहान रस्त्यावर इतका वेग कसा असा म्हाणेपर्यंत ते छोटासा पोर रस्त्याच्या मधे.. अचानक काय करावं सुचलं नाही.. मग मी त्या गाडीला हात करून थांबवला आणि बाळाचा हात धरून कडेला नेलं.. त्या अवघ्या क्षणात काहीही घडू शकलं असतं,तो कारवाला ही थोडा घाबरला होता.. पण पण याची त्या मुलाला किंचिती कल्पना नव्हती.. त्याला मी धरलं तेव्हा त्याने इतकं गोड स्माइल दिलं की ते आता अठवलं तरी माझया चेहर्यावर आपोआप हास्य खुलत आहे.. :-)
तो मुलगा पुन्हा रस्त्यावरच पळत होता.. त्या कुंपणाच्या पलीकडे झोपडितल्या बाईला म्हणलं मी की या मुलाकडे लक्ष द्या,जोरात गाड्या येत आहेत.. ती बाई चुलीवर भाकरी थापात होती.. जोरात ओरडून बोलली की ‘इसका बाप कूच ध्यान नाही देता,मै कहा कहा देखु..’ तिचा बोलणं ऐकून त्या मुलाचे वडील आले तेही ओरडत की.. ‘एछोकरे रस्तेपे क्यो खेल राहा है..’ त्याने अलगदपणे त्या बाळाला उचलून कुम्पणाच्या आत घेतलं.. एव्हढं सगळं होत असताना त्या बाळाला कशाचही भान नव्हतं.. आई वडील काय ओरडत आहेत किवा रस्त्याच्या जोरात गाड्या या कुठल्याच गोष्टीचा भय नव्हता त्याला..
खरच बालपण सगळ्यात सुखाचा असतंना.. ना कसली काळजी,चिंता,भीती,शंका,संशय, ना कसले प्रश्‍न.. त्याना खेळायला काहीही चालतं.. कुठेही असलेतरी ते आपल्याच विश्वात हरवलेले असतात.. त्या मुलाचा तो निरागस चेहरा अजूनही माझया डोळ्यसमरून हलत नाहीय..!!!:-)

मंतरलेले दिवस - 1..

वाटचाल नवीन आयुष्याची ..

नुकताच पाऊस पडून गेला होता.. काळसर रस्ते ओलसर दिसत होते.. समोरची टेकडी हिरवी शाल अथरून बसली होती.. सभोवताली लुसलुशित गवत पसरलं होतं.. हिरव्यागार पानानवरचे टपोरे थेंब कोवळ्या उन्हात चमकत होते.. लिलीची श्वेतवर्ण फुले लक्ष वेधून घेत होती.. कारंज्याचे तुषार स्वछन्दपणे खेळत होते.. खळखळत्या पाण्याचा नाद चालू होता.. तळयातल्या नितळ पाण्यात लालसर गोटे विसावले होते.. आणि ती, ती तिच्या नवीन आयुष्याची वाटचाल सुरू करत होती.. :)

Give me some sunshine
Give me some rain
Give me another chance
I wanna grow up once again!

केळफा... :)

नुकताच मी 'हरिश्‍चंद्रची फॅक्टरी' मराठी चित्रपट बघितला.. लाई भारी आहे.. सगळ्यांना माहितीच असेल की कथा दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित आहे.. एखादी नवीन वेगळी गोष्टा करायची जबरदस्त इच्छा, त्यासाठी केलेली अतोनात धडपड, प्रचंड आत्मविश्वास, लोकांच्या टिकेला भीक ना घालता कार्याताली सातत्यता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायकोमुलांचा खंबीर पाठिंबा व सहभाग.. मला या गोष्टी फारच भावल्या.. एकवेळ पैशाचे पाठबळ नसेल तरी चालेल,ते मिळवता येतं पण आपल्या जवळच्यांचा आपल्यावरचा विशवस आपल्याला कुठून कुठे न्हेतो हे फाळकेन्च्या कथेतुन स्पष्ट होतं!!! :-)

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०

आताशा मनास..

कधी उन्ह पावसात
कधी पाऊस उन्हात
आताशा मनास,
हे ऋतू कळेनात

कधी सत्य स्वप्नात
कधी स्वप्न सत्यात
आताशा मनास,
या स्थिती कळेनात

कधी जग शून्यात
कधी शुन्य जगात
आताशा मनास,
ही गणितं कळेनात

कधी वाद प्रेमात
कधी प्रेम वादात
आताशा मनास,
हे भाव कळेनात

कधी मी मनात
कधी मन माझ्यात
आताशा मानस ,
ही मने कळेनात