ऋण...
पावसाची एक सर येता,
चटके उन्हाचे विरून जातात..
अन् गंध मातीचा सुटता,
हिरावाईचे गालीचे पसरतात..
मग वळून मागे पाहता,
ऋण त्या उन्हाचे स्मरतात..
ऋण त्या उन्हाचे स्मरतात...!
सुखाचा एक क्षण येता,
क्षण दुखांचे संपतात..
अन् नव चेतना मनास मिळता,
जीवनास सुंदर फुलवतात..
मग वळून मागे पाहता,
ऋण त्या दुखाचे स्मरतात..
ऋण त्या दुखाचे स्मरतात...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा