श्यामवर्णी तू मेघराजा तू.. अंगणात माझ्या बरस रे..
असंच अविरत अन वेड्यागत.. सरींवर सर कोसळ रे ..
लडिवाळपणे नाचत वाजत.. चिंब चिंब भिजव रे..
जड देहाचे जड वस्तूचे.. विस्मरण मला घडव रे..
शुभ्र मोती तव बिंदूंचे.. खोल खोल रुजव रे ..
विरघळवूनी विचार सारे.. मनात अत्तर शिंपड रे..
कणकण सारे निर्मळ करुनी.. आसमंत हा सजव रे..
क्षणक्षण नवचैतन्याने भरुनी.. अंतरंग हे फुलव रे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा