कधी उन्ह पावसात
कधी पाऊस उन्हात
आताशा मनास,
हे ऋतू कळेनात
कधी सत्य स्वप्नात
कधी स्वप्न सत्यात
आताशा मनास,
या स्थिती कळेनात
कधी जग शून्यात
कधी शुन्य जगात
आताशा मनास,
ही गणितं कळेनात
कधी वाद प्रेमात
कधी प्रेम वादात
आताशा मनास,
हे भाव कळेनात
कधी मी मनात
कधी मन माझ्यात
आताशा मानस ,
ही मने कळेनात
1 टिप्पणी:
Khup Chhan kavita aahe.. !!
-Nikhil
टिप्पणी पोस्ट करा