नुकताच मी 'हरिश्चंद्रची फॅक्टरी' मराठी चित्रपट बघितला.. लाई भारी आहे.. सगळ्यांना माहितीच असेल की कथा दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित आहे.. एखादी नवीन वेगळी गोष्टा करायची जबरदस्त इच्छा, त्यासाठी केलेली अतोनात धडपड, प्रचंड आत्मविश्वास, लोकांच्या टिकेला भीक ना घालता कार्याताली सातत्यता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायकोमुलांचा खंबीर पाठिंबा व सहभाग.. मला या गोष्टी फारच भावल्या.. एकवेळ पैशाचे पाठबळ नसेल तरी चालेल,ते मिळवता येतं पण आपल्या जवळच्यांचा आपल्यावरचा विशवस आपल्याला कुठून कुठे न्हेतो हे फाळकेन्च्या कथेतुन स्पष्ट होतं!!! :-)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा