ताजमहल!!! :)
सकाळी ६.३०लाच ताजमहल् बघायला निघालो.. माझ्या दोन्ही पायाना फोड आले होते त्यामुळे अख्खा दिवस लगंडत होते.. ताजच्या कॅम्पसमध्येच आम्ही राहत असल्याने चालत जाण्यासारखे अंतर होते.. भारतीयांसाठी ३०रुपये तर फोरेनर्ससाठी २०० रुपये प्रवेश फी होती.. तिकीट काउंटरपासून साधारण १किमी ताज उभा होता.. त्या परिसरात बाहेरील गाड्यांना परवानगी नव्हती म्हणून अंतर्गत शटल्स ठेवल्या होत्या.. इतक्या सकाळीही ताजमहल् पाहण्यासाठी बरीच गर्दी होती,विशेष करून फोरेनर्स लोकं जास्त होते.. मुख्य द्वरापाशी येताच समोर ताजमहल्चे अतिशय सुंदर दर्शन झाले.. पुर्वीपासून त्याचे इतके फोटो पहिले होते की आपण पहिल्यांदाच ताज महल् पाहतोय असे मला बिलकुल वाटले नाही.. पण सोनेरी कोवळ्या किरणांमध्ये तो महल् खरच फार सुंदर दिसत होता.. समोरच्या तळ्यामध्ये उमटलेले प्रतिबिंब मनाला मोहवून टाकत होते.. सभोवतालची बाग अजुन शोभा वाढवत होती.. कारंजे मात्र बंद होते, ते चालू असते तर अजुन सुरेख दिसले असते कदाचित.. फोटो किती काढू अन् नको असे प्रत्येकालाच होत होते.. या बाजूने त्या बाजूने, मधून, जवळून, लांबून अश्या किती असंख्य दिशेने क्लिकक्लिकाट चालू होता.. बाकी त्या मार्बेल नक्षीकामाबद्दल, तिथल्या कोरीव कामाबद्दल वेगळे काय सांगायचे.. ती खरच किती नशिबवान होती जिच्या प्रेमाखातर हा महल् बांधला गेले होता.. या व्यवहारी जगात खरच कोणी कोणावर इतके प्रेम करते तर..
मुख्य महालात चप्पल शूजला परवानगी नव्हती.. आणि आतमध्ये फोटोस सुधा काढून देत नव्हते.. तेजोमहालय बद्दल नुकातच माझ्या लंचग्रूप मध्ये खूप चर्चा झाली होती.. त्यामुळे तिथे पुर्वी महादेवाची पिंड होती आणि नंतर त्याला ताज महालात रुपांतर केले गेले अशी काही माहिती मिळाली होती..आत गेल्यावर मी पाहत होते कुठे पिंड दिसत आहेका पण खाली जायचा रस्ता बंद केला होता.. बाकी काही असो, एक गोष्ट फार खटकली.. जगातले सातवे आश्चर्य म्हणल्या जाणार्या या महालात अगदी मुख्य दालनातसुद्धा कचरा पडलेला दिसला तेव्हा फार कसेतरी झाले.. निदान ही जागा तरी स्वच्छ ठेवायला जमात नाही का आपल्या सरकारला.. देशविदेशातून लोकं येतात त्यांच्या मनात भारताविषयी काय मत होत असेल हे बघून.. असो.
ताजमहाल पाहून झाल्यावर आमची ट्रिप संपली.. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता.. जाता जाता आग्र्याची प्रसिद्ध लस्सी ड्रायवरने आवर्जून घ्यायला लावली.. ३/४ दिवसाच्या या छोट्या कालावधीत बरेच काही मिळवाल्याचा आनंद मनातून ओसंडून वाहत होता!!!

२ टिप्पण्या:
kupach chhan lekh. Kahi photos pan takle aste tar ajun majja aali asti
Thank you Amol.. :) photos taken nakki..
टिप्पणी पोस्ट करा