पुणे - आग्रा :)
माझे बाबा आणि मी सकाळी ८च्या बसने पनवेलला निघालो.. एक्सप्रेसवेचा प्रवास सुंदर होता.. एरवी हिरव्यागार असणार्या डोंगर रांगा आता वळलेल्या गवतात सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होत्या.. आमचा अंदाज थोडा चुकाला आणि आम्ही थोडं आधीच पनवेल स्टेशनला जाऊन बसलो.. ३ तास एखाद्या प्लॅटफॉर्म वर टाइमपास करणे जरा कंटाळवाणे आहे.. पण सुदैवाने ते प्लॅटफॉर्म बरेच स्वच्छ होते.. आणि चक्क तिथल्या कॅण्टीनमध्ये चहा चक्क ३रूपायला चांगला मिळत होता, सगळ्याच किंमती कमी होत्या.. J पुण्यात खायचा प्यायचा खर्च जरा जास्तच आहे,मुंबई स्वस्त आहे असा आम्ही निष्कर्ष काढला.. केरळहून निघालेली सुपरफास्ट रेल्वे ठरलेल्या वेळेच्या आधी आली आणि आमचा रेल्वे प्रवास सुरू झाला.. पण यावेळेस प्रवास शांतपणे होणार नव्हता,बरेच घोळ झाले होते.. फार पुर्वीपासून मला मथुरा वृंदावनला जायची इच्छा होती.. मैत्रिणी मैत्रिणी आग्रा मथुरा वृंदावन अशी छोटी ट्रिप करूया हा विचार मनात येताच क्षणी मेल टाकला.. कोणाला तिथे जायची इच्छा नव्हती तर कोणाला इच्छा असून वेळ नव्हता.. शेवटी एका मैत्रिणीचे आणि माझे जायचे ठरले.. सगळं बुकिंग झाले.. मी तर अगदी दिवस मोजत होते.. पण ट्रिपला जायच्या २/३ दिवस आधी त्या मैत्रिणिने काही कारणाने विचार बदलला आणि ट्रिपमधून नाव रद्द केले.. मला मात्र मनातून फार इच्छा होती तिथे जायची आणि इतके प्लॅनिंग करून अशी ऐनवेळेस ट्रिप रद्द करावी बिलकुल वाटत नव्हते.. पण एकटीला घरचे सोडणे शक्यच नव्हते त्यामुळे बाबांनी माझ्यासोबत यायचे ठरले.. येतानाचे विमानाचे तिकीट बदलले, पण जातानाचे रेल्वे तिकीट बदलणे अशक्य होते.. मैत्रिणीच्या तिकिटावर जायचे आणि नंतर टीसी कडून तडजोड करू असे ठरले.. आता होईल ते होईल ,बघुया असा मनाशी निश्चय करून आमचा प्रवास सुरू केला होता.. आपल्यासोबत आपली घरची मंडळी कायम सोबत असतात,बाकीचे कितीही जवळचे म्हणले तरी ते शेवटी त्यांच्या सोईने साथ देतात ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली.. बाबा म्हणले,यापुढे कोणावर विसंबून राहत जाउ नकोस,एकतर आमच्यासोबत प्लान कर,नाहीतर मग पॅकेज टूरस सोबत..
टीसी आल्यावर आम्ही त्यांना सगळी गोष्ट समजावून सांगितली.. सुदैवाने तो एक चांगला माणूस होता.. त्याने आमच्यावर विश्वास ठेवला.. काहीतरी मार्ग काढू असे म्हणून तो विचार करू लागला.. निघायच्या आदल्या दिवशी बाबांच्या नावाचे तिकीट मी ऑनलाइन काढले होते पण ते वेटिंग लिस्टमध्ये असल्याने कॅन्सल झाले होते.. टीसी म्हणाला ते स्टेशन वर जाऊन काढले असते तर कन्सेल झाले नसते आणि मग मी लगेच मैत्रिणीच्या नावावर आड्ज्स्ट केले असते.. आता हा प्रकार आम्हाला अगदी नवीन होता.. आमच्या समोर एक रेल्वे अधिकारी बसला होता.. त्याने आमची सगळी गोष्ट ऐकली होती,तो टीसीला स्पष्टपणे म्हणले बाकी काही असो,यांचे नीट अड्जस्ट करा.. नंतर टीसी म्हणाला पुढच्या स्टेशनवर रेल्वे जास्त वेळ थांबेल तिथे खाली उतरून तिकीट काढता येईल.. बाबांना उतरणे शक्य नव्हते कारण त्यांच्याकडे तिकीट नव्हते.. मी म्हणले मी उतरते तर टीसीने मला खाली उतरून दिले नाही.. तो म्हनला माझी मुलगी तुझया एव्हढी आहे, मी एका वडिलांचे मन समजू शकतो.. त्याने तिसर्या माणसाला ज्याच्याशी आमचा काही संबंध नव्हता त्याला तिकीट आणायला पाठवले आणि तो चक्क तिकीट काढून आला.. त्याची बायको म्हणली आमची मुलगी तुझ्या एव्हढीच आहे.. सर्वांना माझ्यात त्यांच्या मुली दिसत होत्या बहुतेक.. J
टीसीने मग लगेच तिकीट बाबांच्या नावावर केले.. मला काय चालले आहे समजत नव्हते.. कोण कुठली ही माणसे ,आमच्यासाठी त्यांनी एवढे का करावे.. आभार कसे मानू कळेनासे झाले होते.. आमच्या इथे अजुन एक बाबांच्या वयाचे काका काकू होते ते नैनीतालला अध्यात्मिक शिबिराला चालले होते.. ते म्हणले श्रोकृष्णाची इच्छा आहे,तो सगळी व्यवस्था करतो.. तुमचा योग आहे त्यामुळे सगळे सुरळीत होत आहे..आम्हा सर्वांना हे मनोमनी पटले..
एकंदर या प्रकरणामुळे आमच्या डब्यातल्या बर्याचजणांची करमणूक झाली आणि प्रवास मस्त झाला.. :-)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा