कधीतरी अचानक विचारांचे वादळ उठते..
आठवणींची वीज कडाडू लागते..
आसवांचा पाऊस कोसळू लागतो..
अन् मनाचा बांध तुटून जातो..
पण अशा उध्वस्त स्थितीतही एक सुगंध वाहू लागतो..
त्या वेदनेतही एक आनंद जाणवू लागतो..
कारण तेव्हा एक जाणीव जीवाला स्पर्शून जाते..
व्यवहाराच्या आगीत होरपळलेल्या त्या भावनाफुलाच्या, जिवंतपणाची ..
तेवढीच तर एक साक्ष शिल्लक असते..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा