Parallel Line..
काही रेघा एकमेकीना अगदी समांतर असतात.. त्यांची दिशा एकच असते पण त्या कधी एक होत नाहीत.. त्यांच्यात कायम एक विशिष्ठ अंतर असतं..
याचप्रमाणे माझ्या आसपास काहीजण आहेत.. त्यांच्या डोळ्यात तीच स्वप्नं आणि ध्येयं आहेत जी माझ्या डोळ्यात आहेत.. ज्या क्षणांनी ते सुखी होतात तशाच क्षणांनी मी सुखावते.. आणि ज्या गोष्टी त्यांच्या मनाला लागतात त्या मलाही दुखावतात.. त्यांच्या मनात ज्या प्रकारचे विचार येतात त्याच उंचीचे विचार माझ्याही मनात तरळतात.. अर्थात या पृथ्वीतलावर कोणतेही दोन जीव अगदी सारखे नाहीयेत.. every person is unique.. तरीदेखील त्यांच्यात आणि माझ्यात खूप काही साम्य आढळते.. आणि गम्मत म्हणजे असं असून देखील आम्ही कधी जास्त जवळ येत नाही.. म्हणतात ना ,opposites are attracted to each other.. आपल्यात नाही ते आपण दुसऱ्यात शोधात असतो.. आणि ते सापडलं की आपल्या तारा जुळतात.. मान्य आहे की नाती जुळताना एक समान धागा लागतोच.. वर वर वाटतं की सगळं सारखं असलं की मैत्र जमतं.. पण खोलवर तपास केल्यास खूप फरक जाणवतो.. याउलट जे तंतोतंत आपल्यासारखे असतात त्यांच्यात आणि आपल्यात नेहमीच एक अंतर रहातं.. आणि समांतर असल्याने अशा व्यक्तींमधल्या भावनांना नात्याला,आनंदाला कधीच भेद जात नाही..
Such parallel lines get crossed by another line which is called a Transversal line.. जीवन यात्रेत एखादं असं वळण लागतं की कोणत्यातरी माध्यमातून, काही कारणाने अशा आपल्यासारख्याच असणाऱ्या व्यक्तींशी आपली ओळख होते,सहवास मिळतो.. जेव्हा अशी आपल्यासारखीच विचार करणारी, वागणारी व्यक्ती आपल्या नजरेसमोर येते तेव्हा फार बरं वाटतं.. कारण प्रवास एकाच दिशेने चालू असतो.. नशीब वेगळं असतं पण प्रयत्न सारखे असतात.. आपलं वागणं त्या व्यक्तीकडे बघून पडताळता येतं.. आपण एकटे असे नाहीयोत ही जाणीव होते आणि अप्रत्यक्षपणे एक प्रकारचा मानसिक आधार मिळतो.. अशा या व्यक्तींमध्ये जरी अंतर असलं तरी त्यांचे एकमेकांकडे लक्ष असते असं माझा अनुभव आहे..
संदीप खरेने म्हणले आहे जसे..
कितीक हळवे कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर..
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी , माझ्यानंतर..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा