बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी.. :)
उन्हाळा कितीही असह्य झाला तरी संध्याकाळी जेव्हा एखाद्या मोगऱ्याचा सुगंध दरवळतो किवा जेवणात जेव्हा आमरस असतो तेव्हा तोच उन्हाळा कसा सुसह्य होतो हा अनुभव सर्वांनाच येत असेलना.. जीवनातही असं कितीदा होतं.. एखादं वळण रणरणत्या उन्हासारखं लागतं.. आणि अशा उन्हातच कोणाकडून तरी आपणास प्रेमाची गर्द सावली मिळते,जगण्यासाठी एक नवीन उमेद मिळते.. माझ्या आयुष्यात अशीच एक व्यक्ती आहे.. त्या व्यक्तीशी माझं कोणतही नाव नसलेलं असं नातं आहे.. या नात्यात वय, रंग, रूप इत्यादी अशा कोणत्याच गोष्टीचं बंधन नाहीये.. कोणताही भेदभाव नाही, कसलीच अपेक्षा नाही.. एका मनाचं एका मनाशी जुळलेलं शुद्ध, निखळ आणि खरं नातं.. मीच पूर्वी कधी लिहिलेल्या 'नातं' या कवितेचा प्रत्यय त्या व्यक्तीच्या सहवासात येतो.. "नातं असावं देवासामोरच्या समई सारखं,इवल्या ज्योतीने मन प्रसन्न करणारं.."
मनाला कितीही समजावलं तरी ते एका सामान्य माणसाचं मन.. आपल्यकडे नाही ते पाहिजे असा त्याचा हट्ट कायमचा न संपणारा.. आजूबाजूच्या मुलींना बघते, त्यांचे bf किवा नवरे त्यांना खास भेटवस्तू देतात तेव्हा मला वाटत मला का कोणी नाही असं.. तेव्हा मला त्या व्यक्तीकडून बागेतली टपोरी सुंदर फुले मिळतात.. त्या मुलींना त्यांचे partners फिरायला घेऊन जातात, hotelsमध्ये जातात हे बघून मला एकटं वाटतं तेव्हा ती व्यक्ती माझ्यासाठी खास वेळ काढून मला फिरायला घेऊन जाते,ट्रीपला जावू म्हणते.. खुपदा मला काही न काही प्रश्न छळतात ज्याची उत्तरे कोणाकडे नसतात.. पण ही व्यक्ती मी प्रश्न विचारले नसतानी माझी मनस्थिती जाणून घेऊन अप्रत्यक्षपणे उत्तरे देते, मनास थोड्या वेळापुरतं का होईना शांत करते.. खुपदा आपल्याला जी व्यक्ती आवडते तिच्या मागे पडावं लागतं,तिचा सहवास मिळावा म्हणून, तिचे प्रेम मिळावे म्हणून.. पण ही जी खास व्यक्ती आहे तिच्या मागे नाही लागावं लागत मला.. कारण नातं 2way आहे.. दोन्हीकडे भेटायची, बोलायची ओढ आहे आणि दोन्हीकडे समज आहे..
घरच्यान्शिवाय आपल्यावर मनापासून प्रेम करणारी एक व्यक्ती या जगात आहे या विचाराने फार बरं वाटतंना.. माणूस फक्त प्रेमाचा भुकेला असतो,नाहीका.. ती व्यक्ती माझ्यासाठी किती खास आहे याची कल्पना त्या व्यक्तीला नसेल कदाचित.. त्या व्यक्तीचे,त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे आणि त्या व्यक्तीशी ज्यांच्यामुळे माझा परिचय झाला अशा सर्वांची मी ऋणी आहे.. आमचं नातं कायम असंच टिकावं अशी मनापासून प्रार्थना करते.. :)
खुशी तो बहुत है, मगर ये भी ग़म है
के ये साथ अपना कदम दो कदम है
मगर ये मुसाफ़िर दुआ माँगता है
खुदा आपसे किसी दिन मिलाए..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा