कधी भारावतं
कुठे अडकतं
मग हरवतं
अन वेडावतं
शेवटी माझ्याच हृदयाची धडधड वाढवतं..
म्हणून हल्ली मी मनाला एकटं कुठे सोडत नाही..
कधी उडतं
कुठे धावतं
मग पडतं
अन लागतं
शेवटी माझ्याच डोळ्यात पाणी आणतं.. म्हणून हल्ली मी मनाला एकटं कुठे सोडत नाही..
कधी भासतं
कुठे वाहतं
मग खेळतं
अन रंगतं
शेवटी माझ्यापासूनच परकं होऊन जातं..
म्हणून हल्ली मी मनाला एकटं कुठे सोडत नाही..
1 टिप्पणी:
वृंदा..छान लिहितेस हा :-)
माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/
टिप्पणी पोस्ट करा