आपण आपल्या घरचे, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींसाठी नेहमीच काहीना काही चांगलं करायचा प्रयत्न करत असतो.. तरीही नकळत काहींसाठी करायचं राहून जातं आणि मग पुढे नंतर कधीतरी खंत वाटते.. उमेशच्या बाबतीत असंच काही झालं.. त्याचं नुकतच लग्न झालंय.. तर त्याला व त्याच्या सहचरणीला नव जीवनासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा लेख लिहित आहे.. त्याच्या लग्नाला जाऊ न शकल्याने तो पुण्यात आला की माझ्याकडे बघून घेणार आहे.. त्याचा राग थोडा कमी करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न..
पूर्वी काही दिवस आम्हा थोड्या लोकांची काही दिवसांसाठी magarpatta येथे रवानगी करण्यात आली होती.. तिथे असताना एक दिवस हा उमेश येऊन म्हणाला ' madam ओळखलं का?' मी तुमच्या कॉलेज मधला विद्यार्थी.. hsbc मध्ये येण्याआधी मी माझ्याच कॉलेज मध्ये lecturer म्हणून काम केले होते, मला instru dept चे सगळे विद्यार्थी नीट माहिती होते.. मग हा कोण.. लगेचच तो म्हणाला.. मी 'computer dept ' मध्ये होतो.. तुम्ही आमच्या lab मध्ये practicals घ्यायला यायचा.. तुम्ही मला पाहिलं नसेल पण मला तुम्ही आठवता.. अशा रीतीने आमची ओळख झाली आणि गप्पा सुरु झाल्या.. त्याचा स्वभाव खूप बोलका.. कधी जाता येता त्याची अखंड बडबड चालू असायची.. थोडे दिवसांनी मी त्याला बजावलं madam म्हणू नकोस रे ,एकतर मी तुला शिकवायला कधीच नव्हते आणि आता हे कॉलेज नाहीये.. :)
नंतर आम्ही कल्याणी नगरला आलो.. त्याने त्याच्या एका मैत्रिणीशी ओळख करून दिली,स्मिताशी.. आणि तेव्हापासून आमचा तिघांचा चहाच्या टपरीवर मस्त अड्डा जमायचा.. त्याच्यासोबत चहा प्यायला जाताना मी आणि स्मिताने चुकून कधी wallet पैसे घ्यायचे कष्ट घेतले नाही.. आमच्या तिघांच्या मैत्रीमध्ये एकदम मोकळेपणा आहे.. आम्ही कधीच बाहेर खास भेटलो नाही;कुठे जेवायला नाही गेलो, भटकायला नाही गेलो पण तरी आमची मैत्री निखळ आणि अतूट कधी झाली हे समजलंच नाही.. सगळं श्रेय त्या टपरीवाल्याला द्ययाला हवं.. ;)
वयाने लहान असला तरी कीर्तीने hsbc मध्ये बरंच महान असलेल्या उमेश बद्दल सांगायचं तर तो एक हुशार आणि हरहुन्नरी मुलगा.. कामात त्याचे seniors त्याला मदत मागायचे.. tl तर त्याच्या हाताखालचा होता म्हणे.. hsbc मध्ये सगळ्यात जास्त काम हा करत असावा.. कायम busy.. तरीही कधी हाक मारली की मदतीला कायम धावून यायचा.. sir मध्ये जवळ जवळ २ वर्ष US onsite गेले होते.. त्याला music खूप आवडतं, specially English songs.. त्याचं वाचनही बरंच आहे.. आम्ही खुपदा पुस्तकांवर चर्चा करायचो.. आणि माझे कसलेही mails अगदी वेळ काढून वाचायचा आणि अजूनही वाचतो.. स्मिता आणि मी trekking ला एकत्र असायचो तिथे मात्र उमेश आला नाही कधी.. सिंहगड ला घेऊन जाणार होता आम्हाला,अजून plan च करतोय तो..
उमेश मुळचा बीड चा आहे.. त्याच्या घरच्यांशी मी कधी भेटले नाहीपण तो नेहमी त्यांच्याबद्दल बोलत असतो.. तो त्याचं सगळं मोकळेपणाने नेहमीच सांगतो.. सहसा मुला अशी मनातलं सगळं सांगत नाहीना.. पण त्याला मात्र मी फार खडूस, हट्टी आणि पटकन रागवणारी मुलगी वाटते.. :( त्याचबरोबर त्याला मी सोज्वळ, सुशील, चांगली मुलगी वाटते हा त्याचा एक मोठा गैरसमज आहे..
अशातच त्याचा लग्न ठरलं आणि मला स्मिताला त्याची खेचायला चांगलं कारण मिळालं.. त्याची बायको 'श्रेया' खूप छान असं ऐकलय.. पण तो तिच्याशी आमची ओळख करून द्यायला थोडा घाबरत आहे, आम्ही काय भरवू तिला याची त्याला खात्री नाही वाटत.. hahaha.. या नवीन दाम्पत्याला माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा!!
खरंतर मला मैत्रिणी ढिगाने आहेत आणि मित्र फार मोजके आहेत,पण सगळेच एक से एक.. उमेश शी बोलताना नेहमीच जाणवत की या जगात कोणीतरी आहे ज्याला आपल्याशी बोलावं वाटत, जो आपल्यासाठी थोडा वेळ काढायला कधीही तयार असतो.. प्रत्यक्ष भेट झाली नाहीतरी या भावनेचा खूप आधार वाटतो.. Thanks Umesh!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा