ऋतुपर्ण
माझ्याही मनातील अशी कितीतरी पानं गळू लागली आहेत.. हा उन्हाळा कधी कधी खूप भकास वाटतो.. तरीही कधी ना कधी नवीन पालवी फुटून मनवेल पुन्हा बहरून जाईल एव्हढी अशा मात्र नक्की आहे.. ऋतूचक्र हे फिरतच राहणार,त्यावर स्वतःलाच स्वतःचा तोल सांभाळावा लागतो.. आणि प्रत्येक ऋतूची काहीतरी खासियत नक्कीच असते तिचा आनंद घेणं आपल्या हातात असतं,नाहीका.. सध्यातरी मी गळलेल्या पानांमधली काही खास पाने हृदयाच्या वहीत जपून ठेवायचे प्रयत्न करत आहे.. :)
दुतर्फा उंच उंच झाडी,नागमोडी रस्ता, मध्ये मोठा हिरवगार बगीचा,वेगवेगळी सुंदर फुले,फुलपाखरं ,खारू ताई आणि विविध पक्षी.. निसर्गाप्रेमिसाठी infy best आहे.. आज नेहमीसारखं इकडेतिकडे बघत चालले होते तेव्हा जाणवलं कि झाडांची पाने सर्वत्र पडलेली आहेत.. पिवळसर लालसर अशी वाळलेली पाने.. वरती झाडाच्या शेंड्याकडे लक्ष गेलं तेव्हा पिकलेली कितीतरी पर्णे दिसली.. थोडा वारा आला तरी ती सहज गळून पडत होती.. अरेरे या गर्द सावली देणाऱ्या तरूंचा लवकरच चेहरा बदलेल आता.. इतके दिवस डोलणारी ती पाने एकेक करत गळत असतील तेव्हा त्या झाडांना कसं वाटत असावं.. अन त्या पर्णाना वाईट वाटत असेल का बरं त्यांच्या वृक्षांना सोडून जाताना.. पण नवीन पालवी फुटण्याआधी सुकलेल्या पानांना गळावच लागतं हा निसर्गनियम आहे ना.. कवी गोविंद यांनी म्हणले आहे..
जुनी इंद्रिये, जुना पिसारा.. सर्व सर्व झडणार हो..
नव्या तनुचे, नव्या शक्तीचे.. पंख मला फुटणार हो..
सुंदर मी होणार..
माझ्याही मनातील अशी कितीतरी पानं गळू लागली आहेत.. हा उन्हाळा कधी कधी खूप भकास वाटतो.. तरीही कधी ना कधी नवीन पालवी फुटून मनवेल पुन्हा बहरून जाईल एव्हढी अशा मात्र नक्की आहे.. ऋतूचक्र हे फिरतच राहणार,त्यावर स्वतःलाच स्वतःचा तोल सांभाळावा लागतो.. आणि प्रत्येक ऋतूची काहीतरी खासियत नक्कीच असते तिचा आनंद घेणं आपल्या हातात असतं,नाहीका.. सध्यातरी मी गळलेल्या पानांमधली काही खास पाने हृदयाच्या वहीत जपून ठेवायचे प्रयत्न करत आहे.. :)
जो भी लिखा है दिल से जिया है..
ये लम्हा फ़िल्हाल जी लेने दे..
ये लम्हा फ़िल्हाल जी लेने दे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा